स्मार्ट वॉकिंग स्टिक

By admin | Published: January 7, 2016 09:58 PM2016-01-07T21:58:45+5:302016-01-07T21:58:45+5:30

म्हातारी, अपंग, नेत्रहीन माणसं काठी घेऊन चालतात. पण समजा ते तोल जाऊन पडले तर? याच एका प्रश्नानं सिद्धांतला छळलं आणि आपल्या टेक्निकल

Smart Walking Stick | स्मार्ट वॉकिंग स्टिक

स्मार्ट वॉकिंग स्टिक

Next
>सिद्धांत खन्ना 
इयत्ता अकरावी, नवी दिल्ली
 
म्हातारी, अपंग, नेत्रहीन माणसं काठी घेऊन चालतात. पण समजा ते तोल जाऊन पडले तर? याच एका प्रश्नानं सिद्धांतला छळलं आणि आपल्या टेक्निकल हुशारीच्या जोरावर त्याचं उत्तर त्यानं शोधलं.
त्यानं एक स्मार्ट काठीच तयार केली. ती काठी तुम्ही किती पाऊलं चाललात हे मोजते, तोल गेलाच तर इमर्जन्सी अलार्म वाजवते. तिला एक ऑटोमॅटिक टॉर्च आहे. ती औषध घेण्याचं रिमाइण्डर वाजवते आणि काठी ज्याच्या हातात आहे ती व्यक्ती कुठं आहे यासाठी एक लोकेटरही तिच्यात आहे. आईचे वडील, सिद्धांतचे आजोबा जेव्हा म्हणत की मला एकटं बाहेर पडता येत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं म्हणत  सिद्धांतनं या काठीची आयडिया लढवली. आणि एकेक गोष्टीसाठी सेन्सर, अॅप असं सगळं अॅड करत ही काठी बनली.
सिद्धांत म्हणतो, ‘माङया आजी-आजोबांना विचारायचो तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम होतात रोज. त्यांनी सांगितलं की त्याचं उत्तर काठीत द्यायचं असं मी ठरवलं. मला वाटतं, टेक्नॉलॉजीत अनेक अवघड प्रश्नांची उत्तरं आहेत.

Web Title: Smart Walking Stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.