स्मार्टफोन तुमचं आयुष्य कमी करतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:29 PM2017-12-20T15:29:40+5:302017-12-21T08:53:14+5:30

आपण जो फोन चोवीस तास बाळगून असतो, तोच आपला वैरी झाला तर?

Is Smartphone Reducing Your Life? | स्मार्टफोन तुमचं आयुष्य कमी करतोय?

स्मार्टफोन तुमचं आयुष्य कमी करतोय?

Next

- मयूर पठाडे

खरंच सांगा, स्मार्टफोनशिवाय तुमचं पान हलतं? फोन नुसता दोन मिनिटं जरी नजरेआड गेला तरी साऱ्या विश्वापासून आपण तुटल्याचा भास आपल्याला होतो. नुसता भास नाही, अनेकांच्या दृष्टीनं ते वास्तवच असतं आणि आहे. अनेक कारणं आहेत, पण आजकाल अगदी कुमारवयीन आणि लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसतो.. अर्थातच या फोनचे अनेक उपयोग आहेत. शैक्षणिक उपयुक्ततेपासून, तर जगाशी कनेक्ट राहण्यापर्यंत. आणि तुमची, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, अनेक गोष्टी या स्मार्टफोननं सुलभ, अगदी सोप्या करून टाकल्य आहेत.

पण कोणतीही गोष्ट एका मर्यादेत असली तरच त्याचा फायदा होतो. स्मार्टफोनच्या बाबतीतही ते खरं आहे. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसे महाभयंकर तोटेही आहेत. हा फोन जसा तुम्हाला जगाशी जोडतो तसाच तो तुम्हाला जगातून उठवूही शकतो.
आयआयटी मुंबईचे प्रोफेसर गिरीश कुमार यांनी स्मार्टफोनच्या वापराचे, विशेषत: कुमार आणि तरु णांवर काय दुष्परिणाम होतात याचा चिकित्सक अभ्यास करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
गिरीश कुमार यांच्या अभ्यासानुसार, स्मार्टफोन कितीही उपयुक्त असला तरीही दिवसभरात अर्धा तासापेक्षा त्याचा जास्त वापर करणं म्हणजे तुमच्या जिवाशीच खेळ होऊ शकतो.

स्मार्टफोनमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं आयुष्य..
स्मार्टफोनच्या वापरामुळे टीनेज मुलांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचं प्रमाण तब्बल ४०० टक्क्यांनी वाढू शकतं. कोवळ्या वयात मुलांची कवटीही तुलनेनं विकिसत झालेली नसते. मोबाइलच्या रेडिएशनचा थेट त्यांच्या मेंदूवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो.आपल्या डीएनएवरही हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते. आपल्या झोपेचं सारं शेड्यूल बिघडतं आणि त्यासंबंधीचे विकार जडतात. अल्झायमर, पार्किन्सन्स आणि मेंदूचे विकार वाढीला लागतात.

 

Web Title: Is Smartphone Reducing Your Life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.