साप आणि शिडय़ा

By admin | Published: May 12, 2016 02:57 PM2016-05-12T14:57:20+5:302016-05-12T14:57:20+5:30

यशस्वी कुणाला व्हायचंय? -आपल्याला! मग त्यासाठी स्वत:च्या सवयी कुणाला बदलायला हव्यात? - आपल्यालाच! त्या बदलता येतात? -अर्थात, येतात!!

Snakes and sheds | साप आणि शिडय़ा

साप आणि शिडय़ा

Next
>करिअरच्या वाटेवर साप भेटतील, तशा शिडय़ाही दिसतील, पण त्यासाठी आपली तयारी पक्की हवी!
 
गांधीजी म्हणायचे की, ‘दुस:या कोणाशीही स्पर्धा करू नका! तुमची स्पर्धा कुणाशी असलीच तर ती फक्त स्वत:शीच आहे.’
आपल्या करिअरच्या बाबतीतही हे खरंच आहे.
तुम्ही काल कसे होता आणि आज कसे आहात, हे महत्त्वाचं आहे. कालच्यापेक्षा आज आपल्यात फरक पडणं  म्हणजेच सुधारणा होणं. त्यासाठी आपल्यातले दोष ओळखायला हवेत. आपल्यातल्या वाईट / चुकीच्या / अधोगतीकडे नेणा:या सवयी जाणीवपूर्वक / कष्टपूर्वक बदलायला हव्यात. 
हे वाचायला तसं सोपं वाटतं पण करणं अवघडच. ते करायचं कसं? 
त्यासाठी काही पाय:या आहेत.
त्या पाय:या चढत गेलो तर एकेक टप्पा ओलांडत आपण स्वत:त बदल घडवू शकतो.
 
तीन प्रकार सवयींचे
 
 ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे, अशा स्वत:च्या पंचवीस-तीस सवयींची यादी करा. त्यांचे तीन भाग पाडा.
1. लगेच बदल हवा आहे अशा सवयी.
2. एक महिन्यात बदल हवा आहे अशा सवयी.
3. कायमस्वरूपी बदल हवा आहे अशा सवयी.
 
आता यानुसार तुमच्या सवयी तुम्हीच ठरवा. याबाबतीत तुम्हाला दुसरं कोणीही मदत करणार नाही. फक्त तुमचा मेंदू मदत करेल. 
तुम्ही तुमच्या मेंदूला अतिशय जाणीवपूर्वक आज्ञा द्या. अशा आज्ञा रोजच्या रोज आणि एक आठवडा द्या. आठवडय़ानंतर ती सवय बदलायला सुरु वात होईल. आज्ञा देत राहा. अजिबात नियम मोडू नका. अशा पद्धतीने आपण आपल्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. 
 
शोधा आपले प्रश्न
 आपले प्रश्न आपणच सोडवायचे आहेत हे एकदाच मान्य करून टाका. त्यासाठी मुळात हा प्रश्न आपला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. काही जणांना आपल्यात काही समस्या आहेत, हेच लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न कधी सुटत नाहीत. उलट ते स्वत:ला कायम गोंजारत राहतात. आपलंच कसं बरोबर हे दुस:यांना आणि स्वत:लाही पटवत राहतात. त्यामुळे त्यांच्यात कधीच सकारात्मक बदल होऊ शकत नाहीत. 
त्यामुळे आपले प्रश्न नेमके कोणते आहेत, हे आपले आपण शोधून मान्य करा.
 
1क्क् पैकी 1क्5
 तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी करत असाल, तर  1क्क् पैकी 1क्5 मार्कमिळविण्याची तयारी ठेवा. हे मार्कतुम्ही स्वत:लाच द्यायचे आहेत. इतरांच्या नाही तर स्वत:च्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवायचं आहे. हे मार्करोजच्या कामात द्या. अभ्यासात द्या. वाचनासाठी द्या. नवी कौशल्यं शिकण्यासाठी द्या. व्यायाम करण्यासाठी, सकस आहार घेण्यासाठी द्या. कॅलेंडरवर किंवा डायरीमध्ये हे मार्कस्वत:ला द्या. सुरु वातीला कमी मार्कअसतीलही कदाचित. ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा.
 
छोटी छोटी शिखरं
एखादा गड चढताना आपल्याला शिखर दिसत असतं. कुठपर्यंत पोहचायचंय हे माहीत असतं. आपली नजर शिखराकडे असते, म्हणून तर पाय झपाझपा चालतात, अवघड जागा पार करतात. अंतर काटतात. त्याचप्रमाणो आपल्याला आपलं किमान एक शिखर माहीत हवं. आयुष्यात एकच एक शिखर नसतं. एक शिखर गाठलं की पुढचं. मग त्यापुढचं. अशी शिखरं ठरवा. एकेक शिखर सर करत राहा.
 
साप आहेत, तशा शिडय़ाही.
 
‘माझं कधीच चांगलं होणार नाही, कारण माङयात खूप दोष आहेत.’ अशी वाक्यं मनात वारंवार यायला लागली की समजा मनात साप फिरायला लागलेत. या सापांना टाळून तुम्हाला शिडी गाठायची आहे. सापाच्या तोंडातून खाली खाली यायचं नाहीये. आणि चुकून सापाच्या तोंडात आलात तरी पुन्हा शिडीपर्यंत यायचं आहे.
यशाकडे जाणं, स्वत:ला सुधारत सुधारत पुढे जाणं, ही एक प्रक्रि या आहे. आपल्याला वाटलं आणि लगेच तसं घडलं असं होत नाही.   करिअरच्या दृष्टीने आपण नव्या जगात पाऊल टाकतो, तेव्हा ‘स्वत:’कडे विशेष लक्ष द्यावंच लागतं. आपल्या वाटय़ाला साप आणि शिडय़ा दोन्ही येतील, हे कायम लक्षात ठेवायचं.
 
एक एक दिवस महत्त्वाचा
आजपासून एक वर्षानी आपण कुठे असणार आहोत?
दोन वर्षांनी कुठे असणार आहोत?
पाच वर्षांनी तुम्ही कुठं असणार आहात? हे आपण स्वत: ठरवायचं आहे. तसं लिहून ठेवायचं आहे.
एका वर्षात 365 दिवस असतात. एक वर्षानी आपण कुठे आहोत हे बघायचं असेल, तर त्यासाठी या 365 दिवसातला एक एक दिवस महत्त्वाचा आहे. असं म्हणतात की साधारण38-4क् वर्षांचे झाल्यानंतर आपल्या सवयी सहजपणो बदलता येत नाही. म्हणून आत्ताच याची सुरु वात करा. 
 
 
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
 
 
 
drshrutipanse@gmail.com 

Web Title: Snakes and sheds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.