इतना परफेक्शन लाता कहॉं से है?
By admin | Published: April 7, 2017 06:29 PM2017-04-07T18:29:30+5:302017-04-07T18:29:30+5:30
आमीर खानचे सिनेमे आवडतात की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्यातलं धाकड परफेक्शन येतं कुठून?
- आॅक्सिजन टीम
- आमीर खानचे सिनेमे आवडतात की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्यातलं धाकड परफेक्शन येतं कुठून?
भारतीय राष्ट्रगीत आणि तिरंगा असलेले दोन सिन सिनेमातून काढून टाका अशी अट पाकिस्तान सेन्सॉर बोर्डने टाकल्यानं आपण दंगल सिनेमा पाकिस्तानात रिलीजच करणार नाही अशी भूमिका आमीर खानने घेतल्याची बातमी आज सर्वत्र आहेच. त्यावरुन आज ट्विटर आणि फेसबूकवर चर्चेचं तुफान आलंय.
कुणी आमीर खानला राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र देतं आहे तर कुणी त्याच्या कामाचं आणि निश्चयाचं कौतूक करतं आहे. ट्विटरवर यासंदर्भात अनेक रंजक ट्विट्स वाचायला मिळतही आहेत. मात्र त्यापलिकडे जावून एक चर्चा दिसते जी आमीरच्या बाबतीत नेहमी होते,आणि आज पुन्हा एकदा तीच चर्चेत आहे.
ते म्हणजे आमीर खानचं परफेक्शन.
ते परफेक्शन, कामाप्रती त्याची श्रद्धा नाही तर कामच होवून जाणं हे कुठून येतं.
दंगलमधलाच एक सीन आठवा. मुलीच होतात आणि आंतरराष्ट्रीय मेडल कुस्तीत जिंकणं आता शक्य नाही, ते स्वप्न संपलं अशा भावनेनं सिनेमातला महावीरसिंग फोगाट भिंतीवरचं मेडल आणि फोटो काढून पेटीत टाकतो. तेव्हाची भिंत आठवा. बाकीच्या भिंंतीचा रंग आणि फोटो काढला तिथला रंग हे वेगळे दिसतात.
इतकं बारीकसारिक डिटेलिंग आपण आपल्या आयुष्यात तरी करतो का?
I do what I feel is right. I am not scared to walk on the new path and take risk.
असं आमीर खान वारंवार सांगतो. तो म्हणतो, चुका मी ही केल्या पण त्या चुकीच्या सिनेमा निवडीपासून ते काम करण्यापर्यंत मी अनेक गोष्टी शिकलो. फरक एवढाच ती चूक मी परत केली नाही.
आमीर खानच्या कामापासून ते देशभक्तीपर्यंत आणि सत्यमेव जयते ते तुफान आलंय पर्यंतच्या प्रवासाची चर्चा करताना आपण त्याच्याकडून हे परफेक्शन शिकू शकलो तर..