लाइक आणि लव्हच्या ठोकाठोकीत खरंच मनापासून काही शेअर केलं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:35 PM2019-11-01T12:35:44+5:302019-11-01T12:36:15+5:30

मस्त आराम करू, मजा करू म्हणता म्हणता दिवस कसे फुर्रकन उडून गेले आणि आता आपण परत रुटीनला भिडायचं असं वाटून जरा सुनंसुनं वाटतंच. पण खरं सांगा, दिवाळीत खातापिताना-सिनेमा पाहताना- मज्जा करताना,  कुणाला भेटताना तरी आपण ते सारं पुरेपूर केलं का?

social media sharing, is it real sharing? | लाइक आणि लव्हच्या ठोकाठोकीत खरंच मनापासून काही शेअर केलं का?

लाइक आणि लव्हच्या ठोकाठोकीत खरंच मनापासून काही शेअर केलं का?

Next
ठळक मुद्देठोको लाइक !

-ऑक्सिजन टीम 

नुकतीच दिवाळी झाली.
अजून खरं तर सरलीही नाही पुरती दिवाळी. अजून दिवाळीचा हॅँगओव्हर बाकी आहे.
दिवाळीत इतकी धमाल केली की अजून मनावरचा आनंदी आळस काही उतरत नाहीये. वाटत नाहीये मस्त कामाला लागावं, उलट असं वाटतं की किती लवकर संपली ही दिवाळी. किती लवकर संपली सुटी.
मस्त आराम करू, मजा करू म्हणता म्हणता दिवस कसे फुर्रकन उडून गेले आणि आता आपण परत रुटीनला भिडायचं असं वाटून जरा सुनंसुनं वाटतंच.
पण खरं सांगा, दिवाळीत खातापिताना-सिनेमा पाहताना- मज्जा करताना,  कुणाला भेटताना तरी आपण ते सारं पुरेपूर केलं का?
की डोक्यात एकच फोटो काढायचा, सेल्फी काढायचा, लिहायच्या खटक्यात दोन-चार ओळी आणि फेसबुकवर तरी टाकायच्या किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर तरी ढकलून द्यायच्या.
आपल्या प्रेमाचं आपण असं जाहीर प्रदर्शन केलं का? 
करायला ना नाही, पण आपण आपल्या माणसांना भरपूर भेटलो, गप्पा मारल्या, डोळ्यात पाणी येईस्तोवर हसलो की आता पहिले फोटो काढू आणि आपली दिवाळी हॅपनिंग आहे ते इतरांना दाखवू असं काही होतं मनात?
शे-सव्वाशे लाइक्स, पाच-पन्नास कमेंट्स, असं इगोला मालिश करून घेतलं की बरं वाटतं का आपल्याला? आपण किती हॅपनिंग आहोत असं दाखवण्यासाठी किती आणि काय काय नुस्ते शेअर करत सुटलं तरी त्यानंतर बरं वाटलं का?
किती वाटलं? की एन्जॉय करण्यापेक्षा आणि हातातल्या स्मार्टफोनकडेच पाहत होतो सारखं? करत होतो स्क्रोल? 
कोण काय करतंय हे पाहत होतो नी ठोकत होतो लाइक फक्त?
जरा विचारू स्वतर्‍ला.
डब्यात कसा तळाला गेलेला आहे चिवडा आता नी तेल नितरुन आलंय तसं हे जरा आपलंच आपल्या मनात काहीतरी नितरत ठेवल्यासारखं शोधू..
आणि सापडलंच काही तर जरा करू स्वतर्‍शीच ताळा. 
एकीकडे आपण खूप शेअरिंग करतो आणि दुसरीकडे मनाच्या दारावर मोठ्ठं कुलूप लावतो. कुणी कितीही प्रय} केले तरी कुणाला आत येऊ देत नाही. डोकावून पाहू देत नाही? कुणाला काही सांगत नाही, असं होतं का? आपलं मनमोकळं करत नाही असं होतं का, तेही जरा शोधायचं का?

Web Title: social media sharing, is it real sharing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.