सोशल मीडियातला शो ऑफ महागात पडतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:46 PM2019-03-28T12:46:47+5:302019-03-28T12:47:11+5:30
सोशल मीडियात आपली इमेज बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.
- नितांत महाजन
आता निवडणूक काळात सोशल मीडियात आपण अनेक प्रचारकी गोष्टी वाचू. अनेकजण आपली इमेज ती तयार करतील. त्यांच्यासारखे आपण काही इमेज मेकिंगसाठी हजारो रुपये खर्च करून पीआर करू शकत नाही. मात्र स्वतर्ची सोशल मीडियात पत तर तयार करू शकतो. मात्र ते करताना आपलं करिअर, जॉब, आपली चारचौघात ओळख हे सारं सुधरलं पाहिजे, आपलं हसू होणार नाही एवढं पाहायला हवं. त्यामुळे सोशल मीडियात आपली इमेज बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.
1) सोशल मीडियात आपले फार फॉलोअर्स आहेत हे दाखवण्यासाठी आपण आली ती प्रत्येक फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारतो. मात्र असे फ्रेण्ड जर आपल्या वॉलवर, पोस्टवर वाट्टेल ते बडबडत असतील किंवा स्वतर्च काहीबाही खरडत असतील तर ते आपली इमेज बिघडवतात.
2) एखादी कमेण्ट कराल तर ती अभ्यास करून लिहा. पाचकळपणा, लूज टॉक करू नका.
3) आपले पर्सनल फोटो, पर्सनल पाटर्य़ातील फोटो, पर्सनल नातेसंबंध याचं प्रदर्शन शक्यतो करू नये.
4) आपलं काम शेअर करा, पण शो ऑफ करू नका. मीच किती भारी, असं चित्र निर्माण करू नये.
5) आपल्या क्षेत्राविषयी, कंपनीविषयी बदनामीकारक गोष्टी लिहू नये.
6) इतरांवर शेरेबाजी करू नये. कुणाचा अपमान करू नये.