मुली एकतर्फी प्रेमात पडतात तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 07:20 AM2019-09-19T07:20:00+5:302019-09-19T07:20:02+5:30

मुलींच्या एकतर्फी प्रेमाची कहाणी कट्टय़ावरच्या चर्चेत उलगडतेही आणि तोंड बांधून मार सहनही करत राहते.

a story of a girls onside love affair.. | मुली एकतर्फी प्रेमात पडतात तेव्हा.

मुली एकतर्फी प्रेमात पडतात तेव्हा.

googlenewsNext
ठळक मुद्दे मुलं एकतर्फी प्रेम करतात, आणि मुली?

- साहेबराव नरसाळे

शीतल आणि आझाद़ दोघंही एकाच वर्गात. एकमेकांकडे पहायचे. हसायचे. तिला वाटायचं आपली लव्ह स्टोरी बहरतेय. ती त्याच्या प्रपोजची वाट पाहत राहिली. वर्ष संपत आलं़ पण त्याचा प्रपोज आला नाही़ शेवटी कंटाळून तिनेच त्याला लव्हलेटर लिहिलं. आझादने तिला उत्तर पाठवलं, ‘माझं महत्ताचं वर्ष आहे. मला ते बर्बाद करायचं नाही.’ 
बर्बाद?
तिच्यापुढे एक मोठा प्रश्न गोलगोल फिरू लागला़ प्रेम बर्बाद करतं का?
त्याचं प्रेम मिळवायचं असेल तर त्याचा पुरुषार्थ डिवचला पाहिजे, असं तिचं मन तिला सांगत राहायचं़ तिनं ठरवलं़ पुन्हा त्याला चिठ्ठी लिहायची़ तिने त्याला एक पाकीट पाठवलं. त्यात डझनभर बांगडय़ा, हळदी-कुंकू, ब्लाउझ आणि एक चिठ्ठी़ चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘बांगडय़ा भर’. 
ते वाचून तिच्या आयुष्यातून तो कायमचाच निघून गेला अन् ती जळत राहिली एकटीच़ हे एकटेपण तिला असह्य होत होतं़ चारचौघात रडताही येत नव्हतं़ मैत्रिणींना सांगावं तर आपणच टिंगलीचा विषय होऊ, असं वाटायचं़ दिवसेंदिवस तिला भूक लागत नव्हती़ ती मनाला खात राहायची - तिनं केलं ते चूक की बरोबर? तिलाही ठरवता येत नव्हतं़
हा कोंडमारा किती दिवस सहन करायचा़ कधीतरी तुंबलेल्या भावनांचं चेंबर उघडावंच लागेल, हा विचार करून शेवटी तिनं धाडस केलं आणि त्याच्या एका मित्राकडे मन मोकळं केलं़ त्यानं ते इतरांना सांगितलं़ एकाच्या तोंडी ते दहाच्या तोंडी़ तिच्या विस्कटलेल्या प्रेमाची कहाणी गावभर झाली़ तिच्याविषयी तर्‍हेतर्‍हेच्या चर्चा रंगल्या़ तिच्या घरार्पयत पोहोचल्या़ घराण्याचं तोंड काळं केलं, म्हणून तिचं बाहेर जाणं बंद झालं़ शिक्षण थांबलं़ शेवटी आई-वडिलांनी शहरात एका नातेवाइकाकडे शिक्षणासाठी पाठवलं़ आता शिकतेय़ पण अबोल़ मोजक्याच मैत्रिणी़ तिच्या बोलण्यात एकदा आझाद आला अन् मैत्रिणीने खोदून खोदून तिला बोलतं करायचा प्रय} केला. पण तिनं जास्त काही सांगितलं नाही.
बोलता बोलता तिनं एक मोठ्ठा सुस्कारा सोडला. ओढणी सावरली आणि उठून तडक निघून गेली. दुखावरच्या खपल्या काढून जखम चिघळावी, अशी तिची अवस्था झाली असावी.
****
एकतर्फी प्रेमात जळणारी ती एकटीच नाही़ तिच्यासारख्या अनेकजणी कॉलेजचे कोपरे आवतून बसलेल्यात़ मुलाचं एक बरं असतं की त्यांनी प्रेम व्यक्त केलं तरी त्यांना फार कोणी बोलत नाही़ त्यांच्या इज्जतीची लक्तरं अशी गावभर हिंडत नाहीत़ पण मुलींच्या वाटय़ाला आलेल्या डागण्या धड जगूही देत नाहीत अन् मरूही देत नाहीत. बोलायची तर अजिबात सोय नाही.
- शीतलची मैत्रीण सांगत होती.
मुलीने प्रपोज केला तर तिच्याविषयी अनेक गैरसमज होतात. ती अशीच असेल. अगोदरही तिनं चार-पाच मुलांना प्रपोज मारून सोडले असेल.  जरी तिनं प्रपोज केलं तरी तो स्वीकारेल का? अशा विचारांनी मुली मुलांना प्रपोज करण्याचे टाळतात.
दुसरं अजून एक की मुलगी प्रपोज करते म्हटल्यावर ती गळ्यातच पडणार हे मुलांचे आणखी एक गृहीतक. त्यामुळेही नकोच तो प्रपोज. त्याची वाट पाहत रहायची. आपण त्याच्यावर प्रेम करतोय याची जाणीव त्याला होईल, अशा पद्धतीने स्माईल द्यायची. त्याची आवड जपायची.
हे असं किती दिवस टोकत राहणार? 
कट्टय़ावरच्या चर्चेतला हा प्रश्न मन टोकरून जातो़
कट्टय़ावरच्या चर्चेतून मुलींच्या एक एक भावना पुढे राहतात़ त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती.
ही भीती असते तो सोडून जाण्याची, नातेवाइकांमध्ये आपलं बिंग फुटण्याची़ अनेकदा मुली या भीतीमुळे प्रपोज करणं टाळतात़ पण तो समोर आल्यानंतर चेहर्‍यावर एक वेगळंच तेज येतं़ भान हरपतं़ 
शीतल सांगत होती - प्रेम ही काही प्रदर्शनाची गोष्ट नसत़े ती आपली असत़े वैयक्तिक असत़े चारचौघांच्या तोंडातल्या वाफेवर उडत रहावं, एवढंही प्रेम हलकं नसतं़ ते नसावंही़ पण मुलं इथंच चुकतात़ गावभर सांगत सुटतात आणि मुलींना जी प्रायव्हसी हवी असते तीच संपून जात़े प्रेम हे फक्त आपलंच असतं़ त्यावर फक्त आपलाच हक्क असतो़ समोरच्याने ते स्वीकारलं नाही म्हणून ते फेल गेलं असं नसतं़ आपण आपल्या परीने जिवापाड प्रेम करून मोकळं व्हावं. भले त्याला कोणी जळणं म्हणतील़ मला ते जळायला आवडतंय आता़ मैत्रिणी म्हणतात तुझ्या डोळ्याभोवती काळी वतरुळं व्हायला लागलीत. त्यांना कस सांगू की ती माझ्या प्रेमाची निशाणी हाय. एकतर्फी प्रेमाची!



(साहेबराव लोकमत अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)
 

Web Title: a story of a girls onside love affair..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.