घट्ट चमकिले मोठ्ठे प्रिण्ट्स - नको !!

By admin | Published: November 27, 2015 09:20 PM2015-11-27T21:20:03+5:302015-11-27T21:20:03+5:30

काय घातलं तर आपण जरा बारीक दिसू? जाडजूडपणा लपेल

Stunning big prints - no !! | घट्ट चमकिले मोठ्ठे प्रिण्ट्स - नको !!

घट्ट चमकिले मोठ्ठे प्रिण्ट्स - नको !!

Next

 काय घातलं तर

आपण जरा बारीक दिसू?
जाडजूडपणा लपेल
आणि सौंदर्य खुलेल?
 
परदेशाप्रमाणोच भारतातही प्लस साइज्ड स्टोअर संस्कृती आली आहे. पण प्लस साइज असणं म्हणजे सरसकट जाड असणं असं होत नाही. वजनदार व्यक्तींची अडचण वेगळीच असते. कारण त्यातही प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. कोणाच्या कंबरेचा घेर मोठा, तर कोणाची अपर बॉडी मोठी असते.  काहींचे हात बारीक असतात, तर काहींचे पोट जास्त सुटलेले असते. त्यामुळे मोठय़ा साइजचे रेडिमेड कपडेही प्रत्येकालाच व्यवस्थित बसतील असं नाही. त्यामुळे अशा रेडिमेड कपडय़ांपेक्षा आपल्या मापाचे कपडे शिवून घेणं कधीही चांगलं. त्यात भारतात गल्लोगल्ली टेलरिंगची दुकानं आहेत. आपल्या मापाचे कपडे सहज शिवून मिळतात. रेडिमेडपेक्षा ब्लाऊज, ड्रेस शिवून घेऊन अधिक परफेक्ट फिटिंग जमवता येऊ शकतं. तेच तरुणांचंही.  शर्ट, पॅण्ट्स, नेहरू कोट शिवून घालणं हे कधीही जाडजूड व्यक्तींसाठी जास्त उत्तम ठरतं. 
त्यामुळे तुम्ही ‘वजनदार’ असाल म्हणून फक्त कपडे शिवून घेणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाच.
त्यामुळे तुमचे कपडे जास्त उत्तम फिटिंगचे, फॅशनचे आणि ट्रेण्डीही होऊ शकतील!!
 
‘वजनदार’ व्यक्तींनी घालायचं काय?
1. प्लस साइज असलात तरी फोकल पॉइंट्सकडे लक्ष द्या.
2. उदाहरणार्थ, तुमचे डोळे किंवा चेहरा रेखीव असेल, हात किंवा कंबर छान असेल किंवा केस सुंदर असतील तर त्याकडे लक्ष केंद्रित करावे. मायनस पॉईंटकडे लक्ष देऊ नये.
3. मायनस पॉइंट्सना फोकल पॉइंट्सनी आपण हायलाईट करू शकतो.
4. त्वचेचा पोत कसा आहे, कॉम्प्लेक्शन कोणतं आहे हे आधी पडताळून घ्यावे. यानुसार कोणत्या रंगांचे कपडे अधिक खुलून दिसतील याचा विचार करावा.
5. उदाहरणार्थ, ब्राइट रंग तुमच्यावर उजळून दिसत असतील आणि तुमची कंबर शरीराच्या मानाने बारीक असेल तर ब्राइट रंगाचा बेल्ट तुम्ही वापरू शकता. वेस्ट लाइनला एम्ब्रॉयडरी करून इतर अनावश्यक जाडजूड भागांकडे लक्ष जाणार नाही असं करणं म्हणजे फोकल पॉइण्ट्सकडे लक्ष देणं.
6. अपर बॉडी बारीक असेल तर अनारकली ड्रेसच्या वरच्या भागावर संपूर्ण डिझाइन असेल अशा पद्धतीनेही हायलाईट करता येते.
7. डोळे रेखीव असतील तर डोळ्यांचा मेकअप करावा. मात्र त्यावेळी न्यूट्रल लिपस्टिक वापरावी.
8. केस सुंदर असतील तर अधिकाधिक हेअरस्टाईल करून त्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे डबल चिन किंवा गाल मोठे असतील तर त्यावर थोडे केस पुढे घेऊन चेहरा लपवता येऊ शकतो व स्टाईलही छान दिसते.
9. पोट मोठे असेल तर जास्त मोठय़ा प्रिंट्सचे कपडे घालणो टाळावे. यावेळी न्यूट्रल रंगांचे प्लेन कपडे घालावे. हे न्यूट्रल रंग म्हणजे काळा, राखाडी, गडद निळा, ब्राऊन, हिरवा.
10. जास्त मोठी प्रिंट्स वापरली तर तुम्ही अजूनच मोठ्ठे दिसू शकता. यासाठी मध्यम आकाराच्या प्रिंट्सचा वापर करावा. अधिक लहान प्रिंट्सही वापरू नयेत कारण त्यामुळे निगेटिव्ह पॉइंट्स ठळकपणो दिसून येतात.
11. घट्ट कपडे घालणो पूर्णपणो टाळावे. चमकणा:या फॅब्रिकचे कपडे घालू नयेत. न चकाकणा:या किंवा सैल कपडय़ांचाच अधिक वापर करावा. त्याऐवजी क्रेप मटेरियल वापरावे.
12. आपला बॉडी टाइप कळत नसेल तर एकाच रंगाचे, सेल्फ प्रिंटेट किंवा सेल्फ डिझाइन्ड म्हणजेच लखनवी कुर्ता किंवा चिकन करी एम्ब्रॉयडरी असलेले कपडे घालावे. यावर एक्सेसरी घालून ती हायलाईट करावी. दागिन्यांनी फोकल पॉइंट तयार करावा. अपर बॉडी मोठी असेल तर यावर मोठा नेक पीस घालावा. चेहरा छान असेल तर मोठे कानातले घालावे, मात्र यावर गळ्यातले घालू नये. किंवा एखादे ब्रेसलेट घालावे.
13. क्लासिक साडय़ा, बेसिक कुर्ते, टॉप्स नेहमीच फॅशनमध्ये असतात. त्यामुळे लेटेस्ट फॅशनचा अट्टहास न धरता क्लासिक स्टाईलचा वापर करावा.
14. महिलांनी विशेष करून हाय हिल्सचा वापर करावा. त्यामुळे पाय लांब आणि उंच वाटू शकतात. मात्र पेन्सिल हिल्स वापरणं टाळा. ट्रेडिशनल लूकमध्ये हिल्स असलेल्या कोल्हापुरी चपलासुद्धा आता मिळतात.
 
- प्राची खाडे
सुप्रसिद्ध स्टाईलिस्ट

Web Title: Stunning big prints - no !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.