ट्रॅडिशनलला स्टायलिश तडका
By admin | Published: October 16, 2014 06:38 PM2014-10-16T18:38:20+5:302014-10-17T09:11:51+5:30
दिवाळी आली आणि कपडे घेतले असं कधी होतं का? कपड्यांनी कपाटं भरून वाहिली तरी दिवाळीत आपण नवे कपडे घेतोच.... पण नेहमीचा अवघड प्रश्न घ्यायचं काय? जे ट्रेण्डी असेल, ट्रॅडिशनलही, फंक्शनलही आणि फॅशनेबलही! त्यासाठीच तर हा एक फॉर्म्युला... मुली आणि मुलांसाठीही.
- प्राची खाडे (स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)
‘तिनं’ काय घ्यावं?
फुललेन्थ अनारकली मस्टच !
तुम्ही नेहमीप्रमाणं पंजाबी ड्रेसच घेणार असाल तर फार विचारबिचार न करता फुललेन्थ अनारकली घेऊनच टाका.
उत्तम फिटिंग असेल तर काहीशा ठेंगण्या मुलींनाही हा ड्रेस मस्त खुलून दिसतो. अनारकली पॅटर्नमुळे मुली आहे त्यापेक्षा अधिक उंच वाटतात. पोट थोडं सुटलं जरी असेल तरी त्यात ते आपोआपच लपून जातं. लांब केसांची उंच पोनी, कानात झुमके आणि अनारकली पॅटर्नचा ड्रेस हा लुक अत्यंत क्लासी दिसतो. लांब बाह्यांचा अनारकली असेल तर हातात बांगड्या घालायचीसुद्धा काही गरज नाही.
प्रिंटेड सिल्क साडी
क्रे झी डिझाईन्स असलेल्या डिजिटल प्रिंटेड क्रे प साड्यांची सध्या फॅशन जगतात चलती आहे. काहीशा चित्नविचित्न असलेल्या या साड्या मुलींना खूप शोभून दिसतात.
अशी एखादी प्रिंटेड सिल्क साडी, त्यावर हॉल्टरनेक ब्लाऊज किंवा बॅकलेस फुलस्लीव्हज ब्लाऊज असं कॉम्बिनेशन एकदम हॉट. एकदम ट्रेण्डी.
मस्त ब्राईट चुडीदार-कुर्ता
गडद रंगांचे कुर्ता आणि त्यावर कॉन्ट्रास्ट कलरचा चुडीदार हे कॉम्बिनेशनही दिवाळीसाठी मस्त लुक देऊ शकतं. अशा कुर्त्यावर दुपट्टा घेण्याऐवजी जर मोठा नेकपिस घातला आणि त्याबरोबर एखादी सिल्कची क्लचबॅग हातात घेतलीत तर एकदम स्मार्ट लुक कॅरी करता येईल. किंवा कॉन्ट्रास्ट कलर किंवा प्रिंटचे शॉर्ट, क्र ॉप्ड जॅकेटदेखील शोभून दिसेल.
लॉँग स्कर्टस
घेरदार घागरा किंवा घेर असलेला लॉँग स्कर्ट आणि टॉप किंवा टी-शर्ट असं कॉम्बिनेशनही एकदम हटके दिसू शकतं. त्यावर स्लीव्हलेस जॅकेट किंवा दुपट्टा आणि एथनिक ज्वेलरी घाला, सगळ्या गर्दीत तुम्ही वेगळ्या दिसाल.
‘त्यानं’ काय घ्यावं?
बंडी
बंदगळ्याचे स्लीव्हलेस जॅकेट वा नेहरू जॅकेट सध्या इन आहे. कुर्ता किंवा जिन्सवरदेखील हे तुम्ही घालू शकता. जिन्सवर फॉर्मल शूज , ज्यूट किंवा लेदरच्या स्टायलिश मोजड्या, सँडल्सदेखील घालू शकता.
पठाणी
गडद रंगाचा पठाणी ड्रेस, रोलअप केलेल्या स्लीव्हज या कपड्यात तरुण काहीसे उंच वाटतात. सुटलेलं पोटही त्यात दिसत नाही.
लीनन जॅकेट
एखादा कुर्ता, जिन्स किंवा धोती आणि त्यावर लिननचे जॅकेट, और क्या चाहिए?
गो ट्रॅडिशनल
सर्वात बेसिक स्टाईल म्हणजे प्लेन सिल्क वा कॉटनसिल्कचा कुर्ता आणि
त्यासोबत घातलेली चुडिदार किंवा जिन्स हा लुक कायमच ईन. पण एक लक्षात ठेवा जिन्सवर एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता घालू नये, ते वाईट दिसतं.