सतत प्रयत्नांची एक यशस्वी गोष्ट
By admin | Published: September 3, 2015 09:10 PM2015-09-03T21:10:55+5:302015-09-03T21:10:55+5:30
युपीएससी परीक्षेत देशात तिसरी आलेल्या निधी गुप्ता आपल्या आयुष्याला थोडय़ा वेगळ्य़ा वळणावर नेवून ठेवणारी. स्ट्रेट फॉर्वर्ड विचारांची.
Next
- निधी गुप्ता
युपीएससी परीक्षेत देशात तिसरी आलेल्या निधी गुप्ता आपल्या आयुष्याला थोडय़ा वेगळ्य़ा वळणावर नेवून ठेवणारी. स्ट्रेट फॉर्वर्ड विचारांची. एक व्हिडिओ पाहून तिने प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. काय असेल असं या व्हिडिओत?
कोणी आयडॉल की एखाद्याचं प्रेरणादायी भाषण?
तर तसं नाही. तो व्हिडीओ होता एका आजारी माणसांचा. जेव्हा एखादी व्यक्ती आजारपणामुळं अंथरूणावर खिळून राहिलेली असते, तेव्हा तिच्यासमोर आयुष्यातील अनेक घटना येतात. आपण आयुष्यात काय चांगले-वाईट केलं ते दिसायला लागतं,असं त्या व्हिडिओत दाखविण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहून माङयात खुप सकारात्मक बदल झाला. मी आयुष्याची दिशाच बदलण्याचं ठरवलं. लोकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनात येण्याचा निश्चय केला असं 27 वर्षांची निधी सांगते, तेव्हा तिच्या डोळ्यात काम करण्याची एक वेगळी तगमग आपल्यालाही सहज दिसते.
निधी सांगते,
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दिल्लीची. आयएएस होण्यासाठी मला पाचवेळा परीक्षा द्यावी लागली. नोकरी करत असतानाच तयारी सुरू केली. त्यामुळं अभ्यासाला सलग वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पहिल्या तीन प्रयत्नात यश दुरच राहिलं. पण नंतर गंभीरपणो अभ्यास करण्याचा निर्णय घेतला अन् नोकरी सोडली. त्यामुळं पुढच्याच म्हणजे चौथ्या प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली. यावेळी ‘आयआरएस’मध्ये संधी मिळाली. ‘कस्टम्स अॅन्ड सेंट्रल एक्साईज विभागात सहाय्यक आयुक्त हे पद मिळालं. पण आयएएस होण्याचं ठरविलं असल्यानं आयआरएसचं प्रशिक्षण सुरू असताना त्याचा अभ्यास सुरू केला. पण नोकरीमुळे दिवसदिवस अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. तरीही जेवढं शक्य होईल, तेवढा प्रयत्न केला. जेव्हा अभ्यास केला तेव्हा पूर्ण चित्त एकवटून केला. निराश झाले नाही. त्यामुळंच पाचव्या प्रयत्नात यश मिळालं.
वेळात वेळ काढून दररोज किमान चार ते पाच तास अभ्यास केला. परीक्षेसाठी चार प्रयत्न केल्यामुळं अनुभव पाठिशी होताच. त्यामुळे लेखनाचा फारसा प्रयास करावा लागला नाही. पण या परीक्षेत मी टॉपमध्ये येईल अशी काही अपेक्षा नव्हती. होती ती फक्ट कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा. प्रशिक्षमामुळं मुलाखतीचीही तयारी करता आली नाही. पण तिथंही माझा आत्मविश्वास महत्वाचा ठरला. मुलाखत घेणारे जो प्रश्न विचारतील त्याला धीरानं सामोरं जायचं, स्पष्टपणो आपलं म्हणणं मांडायचं, प्रामाणिकपणो उत्तर द्यायची, हे मनात ठरवलं होतं. परीक्षेची तयारी करताना कोचिंग क्लास लावला नाही. फक्त ऑपशनल विषय असलेल्या फिजिक्ससाठी मदत घेतली. सेल्फ स्टडीवरच अधिक भर दिला. अभ्यास करताना ती संकल्पना तुम्हाला समजणं आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेत ते व्यवस्थित मांडू शकत नाही. जे कराल ते प्रामाणिकपणो करा, हेच यशाचं सूत्र असं मला वाटतं!
ग्लॅमरपेक्षा समाधान महत्वाचं!
सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करताना पैसा कमविण्याची, परदेशी जाण्याची संधी जास्त मिळाली असती. पण मला भारतात राहून येथील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करायचं आहे. सर्वसामान्य लोकच माझी प्रेरणा आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यातच मला अधिक आनंद मिळेल. ग्लॅमर, पैसा तर सर्वच क्षेत्रत असतो. पण ज्या गोष्टीतून आंतरिक समाधान मिळेल, ती गोष्ट तुमच्यासाठी ग्लॅमरस असते, असं मला वाटतं. शेवटी आपल्या प्रायॉरिटी आपणच ठरवल्या तर आपले मार्ग आपल्याला सापडतात.
एक नक्की आपला देश बदलतोय. लोक बदलत आहेत. या बदलाबरोबर लोकांची मानसिकताही बदलायला हवी. इतरांनीच नव्हे तर मुलींनीही स्वत:वर विश्वास ठेवायला हवा की, आपण मोठय़ा पदांवर यशस्वीपणो काम करू शकतो!
तो विश्वास हीच आपली ताकद!