नूब जेलीचे रेण्ट्स
By admin | Published: November 19, 2015 09:57 PM2015-11-19T21:57:47+5:302015-11-19T21:57:47+5:30
ते बिचारे जगभर धास्तावलेत, त्यांना कळतच नाहीये की, तरुण मुलं काय बोलतात, काय सांगतात आणि आपल्याला का हसतात? ते कोण? रेण्ट्स! म्हणजे पॅरेण्ट्स, तरुण मुलांचे पालक!
Next
- निशांत महाजन
ते बिचारे जगभर धास्तावलेत, त्यांना कळतच नाहीये की,
तरुण मुलं काय बोलतात,
काय सांगतात आणि
आपल्याला का हसतात?
ते कोण?
रेण्ट्स!
म्हणजे पॅरेण्ट्स, तरुण मुलांचे पालक!
आताशा म्हणो मुलं फोनला स्क्रीनलॉक काही करत नाहीत.
कशाला करायचं उगीच?
एकतर ते लॉक केलं, पॅटर्न बदलत राहिलं तरी आईबाबा चिडचिड करणार, फोनला लॉक म्हणून सतत डाफरणार, डाऊट खाणार नी त्यावरून वाट्टेल तेवढं ऐकवणार. अनेक घरांत तर फोन लॉक करून ठेवल्याची शिक्षा म्हणून मुलांचे मोबाइल आईबाबा जप्त करून टाकतात. आणि मग साताठ दिवस मांडवली केल्यावर, हातापाया पडून विनवल्यावर, भरपूर ऐकून घेतल्यावर ‘कंडिशन्स अप्लाय’ म्हणत अटींचा पाढा वाचत तो फोन परत केला जातो.
आता एवढी तकतक कोण करणार?
नाहीतरी बघून बघून काय बघतात फोनमधे पालक?
कुणाशी कितीवेळ बोलतोय. सतत बोलतोय?
कसकसले फोटो जमवलेत?
काय काय चॅट करतोय? किती वाजेस्तोवर करतोय?
आणि मुख्य म्हणजे बोलण्याचा विषय काय?
जितकी सिक्रसी अधिक तितके पालकांचे पहारे जास्त हे न समजण्याएवढे काही मुलं आता उल्लू राहिलेले नाहीत.
त्यापेक्षाही सोपा आणि एकदम सेफ पर्याय त्यांनी निवडला आहे.
आपण जे बोलू ते पालकांनी वाचलं तरी त्यांना काही कळणार नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे ते सांगणार नाही याचा त्यांना विश्वास वाटतो.
म्हणजे उदाहरणार्थ. ‘रेण्ट्स आर हिअर’.
आता या वाक्यातून कुणाला काय कळणार?
पण या वाक्याचा खरा अर्थ असा आहे की, ‘पॅरेण्ट्स आर हिअर’!
आता नवीन भाषेत साधारण सहा ते 18 वर्षे वयोगटातील मुलं पालकांना पॅरेण्ट्स नाही तर रेण्ट्स म्हणू लागली आहेत.
या नव्या भाषेला म्हणतात, ‘टेक्स्टस्पीक’.
म्हणजे टेक्नॉलॉजीतून (न बोलता केवळ) डायरेक्ट लिहितीच झालेली ही भाषा.
आणि त्या भाषेतले शब्द जगातल्या कुठल्याही भाषेपेक्षा अधिक वेगानं बदलतात. वापरले जातात. बाद होतात. आणि तयारही होतात.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही वेगवान भाषा तयार झाली आहे.
आणि त्या भाषेनं धास्तावलेत ते या मुलांचे आईबाबा. इंग्रजी बोलणारेच, पण त्यांना कळत नाहीये की, आपली मुलं नेमकी काय भाषा बोलताहेत. काय लिहिताहेत.
या मुलांच्या भाषेत सांगायचं तर त्यांचे आईबाबा एकदमच ‘ब्लॉण्ड’ आहेत.
आता हा शब्द वाचूनही आईबाबांनी डिक्शनरी पाहिली तरी त्यांना जो अर्थ सापडेल तो या मुलांना अपेक्षित आणि अभिप्रेत असेलच असं नाही. कारण या नव्या भाषेनुसार ब्लॉण्डचा अर्थ होतोय अडाणी. (खरं तर इंग्रजीत लॅक ऑफ इंटिलिजिन्स. म्हणजे निबरुद्धच म्हणायचं!)
हा त्रस इतका वाढला की, अनेक आईवडील उघड चिंता व्यक्त करू लागलेत की, आमची मुलं काय म्हणतात आम्हाला काही कळत नाही.
त्यावर उपाय म्हणून ब्रिटनमधल्या लॅक्स्टर विद्यापीठातील डॉ. क्लॅरी हार्डकर या प्रोफेसरसाहेबांनी एक डिक्शनरीच तयार केली आहे.
ज्यात आजची तरुण पिढी सर्रास वापरत असलेले शब्द, त्याचे त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ, स्थळकाळ परिस्थिती यानुरूप बदलणारे अर्थ हा सारा तपशील या डिक्शनरीत सापडेल!
ही अशी डिक्शनरी बनवावी लागली ही तरी बातमी आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की, घरोघर संवादातले इतके दुरावे वाढलेत की, आपली मुलं काय बोलतात, कशाला काय म्हणतात हेदेखील पालकांना कळेनासं झालंय!
दुस:या बाजूला मुलं, त्यांच्या पथ्यावरच पडतंय आपली भाषा आपल्या पालकांना न कळणं!
त्यामुळे संवादातले दुरावे वाढण्यास दोन्ही बाजू जबाबदार आहेतच.
आणि ही परिस्थिती फक्त विदेशातली नाही तर आपल्या देशातही हीच अवस्था आहे.
आणि वर्तमानात जरी या सा:याची गंमत वाटत असली तरी भाषेअभावी दुरावलेली नाती जर दुभंगत राहिली तर त्याला जबाबदार कोण असू?
आपणच ना?
टेक्स्टस्पिक म्हणजे काय?
पूर्वी आपण बोलायचो ना, तोंडानं?
आता आपण बोलतो, पण टुकटुकत. लिहून बोलतो.
एकमेकांना टेक्स्ट पाठवतो. इतके की आपलं फोनवर बोलणंही तुलनेनं कमी झालेलं आहे.
अगदी शेजारी बसणा:यालाच काय पण घरातल्या घरातही टेक्स्ट करणारे, लिहून बोलणारे आज अनेकजण सापडतील.
त्यातून ही नवीन भाषा निर्माण झाली आहे आणि होतेच आहे. तिचं नाव आहे टेक्स्टस्पिक.
या भाषेनं जगभरातल्या माणसांना घेरलंय. इतकं की अनेकजण फक्त लिहून बोलतात, आणि लिहिलेलंच ऐकतात.
या सा:या भाषिक वर्तनाचे आपल्यावर काय परिणाम होणार आहेत, याचा अभ्यास सध्या भाषातज्ज्ञ करत आहेत.
सध्या तरुणांच्या तोंडी
तुफान लोकप्रिय असलेले काही शब्द.
1) रेण्ट्स- म्हणजे पॅरेण्ट्स. पालक. आईबाबा.
2) नूब- म्हणजे न्यूबी. म्हणजे खरंतर नवखा. ज्याला काही कळत नाही असा. उदा, डय़ूड यू आर सच अ नूब.
3) जेली- म्हणजे जेलस. म्हणजे मत्सरी. शी इज सच जेली, असं सहज म्हटलं जातं.
4) डब- म्हणजे डंब. म्हणजे मूर्ख.
5) रॅटचेट - म्हणजे गुड. ओके, कुल, ऑसम. फन. असे वाक्यागणिक या शब्दाचे वेगळे अर्थ निघतात.