रोजचा सूर्य जिथं नवा असतो..

By admin | Published: October 27, 2016 04:03 PM2016-10-27T16:03:21+5:302016-10-27T16:03:21+5:30

सेलिब्रेशन म्हणजे असतं तरी काय? आनंदाची एक लाट.. जगण्याचे नवे थाटमाट.. नुस्तं नाचणं, धिंगाणा, चांगले कपडे आणि खाण्यापिण्याची चंगळ.. असतंही हे सारं सेलिब्रेशनचा भाग.. पण सेलिब्रेशन इथं थांबत नाही आणि इथंच येऊन संपतही नाही.. तसं कुणी करत असेल तर त्याला सेलिब्रेशन कळलंच नाही.. काय असतं सेलिब्रेशन? पहाटे लवकर उठून डोंगरावर जाऊन बसा..

The sun's day is new. | रोजचा सूर्य जिथं नवा असतो..

रोजचा सूर्य जिथं नवा असतो..

Next

सेलिब्रेशन म्हणजे असतं तरी काय? आनंदाची एक लाट.. जगण्याचे नवे थाटमाट..
नुस्तं नाचणं, धिंगाणा, चांगले कपडे आणि खाण्यापिण्याची चंगळ.. असतंही हे सारं सेलिब्रेशनचा भाग.. पण सेलिब्रेशन इथं थांबत नाही आणि इथंच येऊन संपतही नाही.. तसं कुणी करत असेल
तर त्याला सेलिब्रेशन कळलंच नाही.. काय असतं सेलिब्रेशन? पहाटे लवकर उठून डोंगरावर जाऊन बसा..
डोंगरावर ना सही, घराच्या गच्चीत जाऊन उभं तर रहा..
पूर्वेकडून एक लालसर गोळा..
आकाशात डोकावतो
त्या आधी पाखरं रोज करतात ना,
ते असतं सेलिब्रेशन..
गुलाबीलाल तो चेंडू आकाशाच्या कुशीतून
बाहेर पडतो तसा सारं निळं आकाशच
आपला रंग बदलून टाकतं..
त्याच्यासारखं गुलाबी होतं..
ते असतं सेलिब्रेशन..
आपण काहीक्षण का होईना ‘दुसऱ्यासारखं’ होणं,
त्याच्या रंगात रंगणं,
यात जी असते ना गंमत,
ते खरं सेलिब्रेशन..
उगवतीच्या रंगात रंगलेला त्यानंतरचा गरमागरम चहा
आणि सोबत मस्त नाश्ता हे असतं
दिवस सुुरू करण्याचं सेलिब्रेशन..
वेळ काढून घरच्यांशी भरपूर गप्पा
आणि डोळ्यात पाणी येवोस्तोर खळखळून हसणं
ेहेही असतं सेलिब्रेशनच..
जिवाभावाच्या दोस्तांसोबत बाईक दामटत फिरत राहणं,
भुकेनं खड्डा पडला पोटात तरी गप्पा मारत राहणं..
उगीचंच हसणं, उगीच चिडणं, रुसणं, भांडणं
आणि पुन्हा हसणं हे असतं सेलिब्रेशन..
अशा किती तऱ्हा या सेलिब्रेशनच्या..
रोज रोज करता येणाऱ्या
प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग भरणाऱ्या
कितीतरी गोष्टींच्या..
हे सारं आपण सांगा कधी सेलिब्रेट करतो
आणि केव्हा केव्हा छोट्या गोष्टींसाठी
ैआनंदाची जंगी पार्टी करतो?
सणवार आलेत आता,
ही पार्टीही करायला हवी..
आणि रोजच्या जगण्यात सेलिब्रेशन शोधण्याची
निसर्गाचीच रीत शिकायला हवी..
रोजचा सूर्य तिथं नवा असतोे..
पाखरांचं गाणं नवं असतं..
झिमझिमणारा पाऊस..
ओला-कोरडा सुसाट वारा..
ूउन्हाच्या झळा
आणि थंडीच्या कुडकुडत्या रात्री साऱ्या
हे सारं सेलिब्रेट केलंच आपण तर..
जगणं वेगळं उरत नाही..
सेलिब्रेशनची बातच न्यारी..
पार्टी कधीच सरत नाही..

Web Title: The sun's day is new.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.