सुरसुरी आणि भुईनळं

By Admin | Published: October 27, 2016 03:59 PM2016-10-27T15:59:34+5:302016-10-27T15:59:34+5:30

दिवाळीत सुरसुरी लावतो आपण.. गोलगोल.. सरसर.. फिरवतो.. ती तडतडते.. सुरसुरते.. पांढरी प्रकाशफुलं उधळते.. आणि क्षणात विझून जाते.. तेच त्या प्रकाशाच्या झाडाचंही.. उंच जातं सुरसुरत.. पाऊस पाडतं प्रकाशाचा..

Surasuri and Bhuyanal | सुरसुरी आणि भुईनळं

सुरसुरी आणि भुईनळं

googlenewsNext


दिवाळीत सुरसुरी लावतो आपण.. गोलगोल.. सरसर.. फिरवतो.. ती तडतडते.. सुरसुरते.. पांढरी प्रकाशफुलं उधळते.. आणि क्षणात विझून जाते.. तेच त्या प्रकाशाच्या झाडाचंही.. उंच जातं सुरसुरत..
पाऊस पाडतं प्रकाशाचा..
आणि मग हळूच निवतं..
जमिनीच्या पोटाशी लागतं..
आणि शांत होतं..
***
क्षणभराचा सारा प्रकाशखेळ..
पण आपण हरखून जातो..
लहानपणापासून पाहतो
त्या तडतडीला, सुरसुरीला
पण तिचं चांदण्या उधळणं
दरवर्षी हवंहवंसं वाटतं..
***
आपण तिला विचारतो का,
किती वेळ उजळलीस?
आकाशदिव्यासारखी
खूप वेळ का नाही
प्रकाशात रंगली?
***
प्रत्येकाचा प्रकाश
त्याच्यापुरता असतो..
कुणाचा कमी, कुणाचा जास्त नसतो..
ज्याची त्याची आपापली 
खासियत असते
आणि म्हणूनच
दिवाळीत
आकाशदिव्याइतकीच
सुरसुरी महत्त्वाची असते..
**
रॉकेट, डबलबार
की आकाशदिवा
लवंगी लड की
आपटबार
याची तुलना कशाला?
आनंदाच्या तागड्यात
प्रकाशाचं माप कशाला?

 

Web Title: Surasuri and Bhuyanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.