सुश्मिता, दादागिरी आणि जिंदगी
By admin | Published: June 3, 2016 12:25 PM2016-06-03T12:25:05+5:302016-06-03T12:25:05+5:30
ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हा आमच्यापैकी अनेकजण जन्मलेही नव्हते, मग तरी सध्या तिची यंग गॅँगला का क्रेझ वाटतेय?
Next
>गेल्या आठवडय़ात सुश्मिता सेननं इन्स्टाग्रामवर आपले ‘हॉट’ फोटो टाकत एक कॅप्शन लिहिली. तिचा सारांश असा की, मी चाळीस वर्षाची झालेय, आणि हे ‘मोठं होणं’ मी कमावलेलं आहे, आणि एक दिवस जास्त किंवा एक दिवस कमी करणं माङया वयातून हे मला मान्य नाही.
जिथं बायका वय लपवतात तिथं सुश्मितानं कसं डॅशिंग स्टेटमेण्ट केलं हे सांगायला हे रामायण मी लिहित नाहीये. कारण ते फारच टिपिकल आणि गेल्या जमान्यातलं झालं. आता काही मुली आपलं वयबिय लपवत नाही. एज इज जस्ट अ नंबर हे आमच्या पिढीनं कधीच मान्य करून टाकलं आहे.
आणि चाळिशीची सुश्मिता काही यंग आयकॉन नाही, की तिच्याशी आम्ही रिलेट करावं. ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हा आमच्यापैकी अनेकजण जन्मालाही आले नव्हते.
22 वर्षापूर्वीची ट्रेण्डसेटर, त्यामुळे आजच्या तरुण गॅँगनं पागल व्हावं असं काही नाही.
मग तरीही इन्स्टाग्रामच्या तिच्या (हॉट होते म्हणून नव्हे फक्त) फोटोंनी आमच्या जगात का चर्चा व्हावी?
तर त्याचं कारण एकच की, ती ‘बोल्ड’ आहे, आणि जे मनात येईल ते करते. आणि कुणालाही खुलासेबिलासे न देता ठामपणो करते. ती म्हणाली ना अलीकडेच की, ‘ज्याच्याकडे मान वर करून पाहता येईल अशी कुणी व्यक्ती, माङयापेक्षा उंच असलेली भेटली तर करीनही लग्न !’
हे असं मान वर करून जगणं जे तिच्याकडे आहे ना, त्याचं सॉलिड अप्रूप वाटतं आम्हालाही. ना ती बोलघेवडी आहे, ना अटेन्शन सिकर, ना वाचाळपणा करते, ना अतीच ग्यान देते. ती जमलं तर तिचं काम करते नाहीतर तिच्या जगात असते.
हे असं ‘बिइंग प्रॅक्टिकल’ जास्त महत्त्वाचं वाटतं आम्हाला. कुणी आपल्या आयुष्यात नाही म्हणून रडतबिडत बसत नाही. तिनं तिचं आयुष्य स्वत:च लीड केलं, खरं तर डिक्टेट केलं.
ही अशी लाइफमधली दादागिरी आपल्याला जमली पाहिजे असं वाटतं तिच्याकडे पाहून !
तेवढं जमलं तर अजून काय पाहिजे?
- अल्पना परदेशी