बोलतं करणारे सिनियर्स

By admin | Published: April 10, 2015 01:32 PM2015-04-10T13:32:52+5:302015-04-10T13:32:52+5:30

केटी लागणा:या ज्युनिअर्सचे, नापास होणा:यांचे, अभ्यासाने पार दमछाक झालेल्यांचे दोस्त बनलेत त्यांचेच सिनियर्स!

Talking Sinners | बोलतं करणारे सिनियर्स

बोलतं करणारे सिनियर्स

Next
>कोल्हापूरच्या एका कॅम्पसचा अनोखा उपक्रम
 
 
‘हॅलो मी.. एपीएम (अप्लाईड मेकॅनिकल्स) विषयात नापास झालेय  आता पुढे काय करावे काही सुचेना झालंय, खूपच स्ट्रेस आलाय.’
- एकदा रात्री दहा वाजता फस्र्ट इअरच्या एका विद्यार्थिनीने आपली व्यथा कृतिकाला थेट मोबाईलवरून सांगितली. ‘तू काही काळजी करू नकोस, तुङया पेपरच्या फोटो कॉपीज मागवून घेऊ, कदाचित मार्क्‍स वाढतील, चिंता करू नकोस, तू पासही होशील कदाचित.’ कृतिकाचे हे वाक्य ऐकून तिला थोडा धीर मिळाला.
आपला स्ट्रेस कुणीतरी वाटून घेतंय, आपलं ऐकून घेतंय, याचंच बळ मोठं होतं. आणि तेच यश होतं मानस ग्रुपच्या एका उपक्रमाचं!
कृतिका खिवन्सरा. केआयटी (कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या तिस:या वर्षामध्ये शिकते. ती मूळची पुण्याची. माईंड पॉवर कोर्स झाल्यामुळे तिला स्ट्रेट मॅनेजमेंट विषयाची खूपच आवड आहे.
गेल्या जानेवारीमध्ये पन्हाळा तालुक्यातील जाफळे येथे झालेला केआयटी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील मार्गदर्शन निमित्तमात्र ठरल्याचं कृतिका आवजरून सांगते. ‘शिबिरामध्ये काही विद्याथ्र्याच्या चेह:यावरचा ताण जाणवत होता. काहीजण विषय जड असल्यामुळे, तर काहीजण वर्ष विनाकारण वाया जाईल, या भीतीने चिंताग्रस्त होते. त्यातील एका विद्याथ्र्याशी बोलले.  माङया बोलण्याचा त्याच्यावर थोडाफार परिणाम झाला असावा, कारण यावर त्याने मी एमपीएससीचा अभ्यास आता जोमानं करीन असं मला सांगितलं! 
शिबिरात  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाचे कार्यक्रम अधिकारी व सहायक प्राध्यापक अमित वैद्य यांच्यासमोर हा सगळा प्रकार मांडला. ज्युनिअर विद्याथ्र्यासाठी आपण समुपदेशन केलं पा¨हजे, आपणच जबाबदारी घेतली पाहिजे असं त्यांना सुचवल्यावर त्यांनी होकार दिला आणि एक उप्रकम सुरू झाला.  प्रॉडक्शन इंजिनिअरिंगच्या तिस:या वर्षीचा विश्वजित जोशी आणि ‘पर्यावरणशास्त्र’चा सूरज साळुंखेही तयार झाले. यातून आकारास आला ‘मानस ग्रुप’.’
गेल्या 9 फेब्रुवारीला मानस ग्रुपतर्फे पहिल्या वर्षाच्या विद्याथ्र्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला! कोणाला अभ्यासाचे दडपण, कोणाला परीक्षेची भीती, कोणाला टाईम मॅनेजमेंट जमत नव्हते, तर कोणी विषयच समजत नसल्याच्या व्यथा मांडल्या. शंभरावर विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यावेळी हे सिनिअर त्यांचे मित्र बनलो.
विश्वजित पहिल्यापासून टॉपर. तो अशा कामासाठी पुढाकार घेतो. ज्युनिअर असो वा सिनिअर, तो मार्गदर्शन करत असतो. सूरजने तर सातत्याने दोन वर्षे नापास झाल्यामुळे खूपच दडपण सहन केले. त्यातून स्वत:चे ट्रेस मॅनेजमेंट करून तो पुढच्या पाय:या चढत गेला. त्यानेही आपल्यासारखीच इतरांचीही अवस्था होऊ नये यासाठी मोठीच जबाबदारी स्वत:हून स्वीकारली आहे.
आता मात्र काही विद्यार्थी स्वत:हून, तर काही मित्रंकरवी व्यथा मांडू लागले आहेत.  मन मोकळं करण्याचे त्यांना व्यासपीठच मिळालं आहे. काहींनी नापास झाल्याचे घरी कळविलेसुद्धा नव्हते. घरच्यांकडून काय प्रतिक्रिया येतील या दडपणाखालीच ते होते. भीतीने त्यांच्या चुकांमध्ये भरच पडत होती, हे अनेकांच्या अनुभवावरून लक्षात आले. 
दोघा-तिघांच्या घरी जाऊन पालकांना या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यावर या विद्याथ्र्याच्या मनावरील अर्धातरी तणाव कमी झाला. त्यांना हायसं वाटलं. या जगात आमची बाजू समजून घेणारं माङया कॉलेजचे कोणीतरी आहेत, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 
आता मात्र ग्रुपच्या सदस्यांत भरच पडत आहे. ज्युनिअरचा एक सी.आर. गौरव परीटने तर वर्गातील काहींचे एपीएम आणि ग्राफिक्स विषय राहिल्याचे सांगून मार्गदर्शनाची विनंती केली. ती मुलं आता मोकळ्या मनाने कोणत्याही दडपणाशिवाय आता अभ्यासाला लागली आहेत. अशा प्रकारे फस्र्ट इम्प्रेशन इतकं छान पडलं की, अनेक विद्यार्थी कधी मोबाईलवरून, कॅम्पसमध्ये, तर कधी वाटेतच अडवून अक्षरश: आपल्या अभ्यासाविषयी अडचणींवर मार्गदर्शनाची गरज व्यक्त करू लागले.
कॅम्पसमधे एका नव्या दोस्तीचा स्ट्रेस फ्री माहौल तयार झाला आहे!
- भरत बुटाले
 
 
‘‘ निकालाच्या दरम्यान अनेक विद्याथ्र्याच्या मनावर मानसिक दडपण असते. अशा प्रसंगी अनेक वेळा निकाल जर नकारात्मक असेल तर विद्यार्थी आत्महत्त्येसारख्या घटनेचा विचार करू लागतो. कधी कधी तर त्या घटनेला तो प्रत्यक्षातही आणतो. अवघ्या काही क्षणामध्ये त्याच्यामध्ये नकारात्मक विचार येऊ शकतो, त्याचवेळी त्याला समजून घेणारा भेटला, तर त्या विद्याथ्र्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. या गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या वरिष्ठ विद्याथ्र्यानी कॉलेजमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखविली आणि त्यातूनच ‘मानस’ संकल्पनेचा जन्म झाला.’’
- अमित वैद्य, 
सहायक प्राध्यापक आणि कार्यक्रम अधिकारी, 
राष्ट्रीय सेवा योजना, केआयटी, कोल्हापूर

Web Title: Talking Sinners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.