दहा दगडांवर दोन पाय
By admin | Published: July 16, 2015 06:57 PM2015-07-16T18:57:30+5:302015-07-16T18:57:30+5:30
आज की नारी म्हणजे मल्टिटास्किंगमध्ये फारच चपळ! नोकरी आणि घर ही तारेवरची कसरत ती प्रचंड लवचिकतेने आणि सहजतेने निभावून नेते.
Next
>समिंदरा सावंत-हर्डीकर
आज की नारी म्हणजे मल्टिटास्किंगमध्ये फारच चपळ! नोकरी आणि घर ही तारेवरची कसरत ती प्रचंड लवचिकतेने आणि सहजतेने निभावून नेते. इतके की, घरातील इतरांना ती किती गोष्टी आणि कशा कशा मॅनेज करते, याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही! परंतु हे करता करता तिची अनेक वेळा त्रेधातिरपिट उडते हेही तितकेच खरे. केव्हातरी हा स्ट्रेस अती होतो आणि त्या स्त्रीला विलक्षण कोंडल्यासारखे वाटू लागते.
हे मल्टिटास्किंग आपल्याकडे बायकांना जास्त करावं लागतं हे खरं असलं, तरी हल्ली सगळ्यांसाठीच मल्टिटास्किंग हा परवलीचा शब्द झाला आहे.
ऑफिसमधे, घरी सगळीकडेच अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मल्टिटास्किंगशिवाय काही पर्यायच उरत नाही.
पण हे मल्टिटास्किंग चांगलं जमलं नाही तर मात्र एकही गोष्ट धड जमत नाही आणि सगळंच फसतं.
तसं होऊ नये म्हणून उत्तम मल्टिटास्किंग जमवणं ही आपली गरज बनते.
फार अवघड नसतं ते, साध्यासोप्या गोष्टी असतात. त्या शिकल्या तर आपण मल्टिटास्किंगही पूर्ण फोकससह करू शकू.
जमवायचं कसं हे मल्टिटास्किंग?
* आठवडाभराचं एक वेळापत्रक बनवा. एकदा रुटीन लावलं की त्यात ब:याच गोष्टी सहज होऊन जातात. रुटीनमुळे आपल्याला तसेच घरच्यांनादेखील एक साचा मिळतो, एक आराखडा मिळतो. कधी काय करणं अपेक्षित आहे याचं चित्र डोळ्यासमोर असतं.
* थोडंसं प्लॅनिंग करा. प्रायोरिटी ठरवा, जे करणं महत्त्वाचं ते आधी करून मोकळे व्हा. नेमकं काय करायचं हे आधीपासून योजून ठेवल्यास तुम्हाला अगदी सहज तुमची कामे मार्गी लावता येतील.
* सुपरमॅन किंवा सुपरवूमन बनण्याचा ध्यास सोडा! उत्तम प्रकारे काम करण्याचा ध्यास असावा, पण त्याचा ताण होता कामा नये. जेव्हा तुम्ही एका वेळेला इतकी कामे करता, तेव्हा त्यात केव्हातरी, कुठेतरी चुका होणार. यासाठी मनाची तयारी करा. केव्हातरी घरच्यांना तडजोड करावं लागणार, तर केव्हातरी कामाला! प्रत्येक वेळी आपण मात्र आपल्या परीने सर्व प्रयत्न करावे, एवढी काळजी आपण घ्यावी.
* सगळी कामे मीच आणि मला हवी तशीच केली पाहिजेत असे काही नाही! शक्य तिथे कामं वाटा. ऑफिसातही जे काम इतरांना करता येणं शक्य आहे ते त्यांना करू द्या. सगळ्या दगडांवर आपणच पाय ठेवायची काही गरज नाही.
* स्वत:ची काळजी घ्या. या सगळ्या पसा:यामधे स्वत:ला हरवू नका. आपल्या शरीराची, प्रकृतीची, मानसिकतेची काळजी घेणं ही आपलीच जवाबदारी आहे. असे न केल्यास एवढे सर्व पार पाडणो तुम्हाला फारच कठीण जाऊ शकते.
* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मल्टिटास्किंग करत असलो तरी एकावेळी एकच काम, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. एक ना धड भाराभर चिंध्या असं झालं तर करिअर गडगडणार हे नक्की!
घेऊपाशेरे
आपल्या लक्षातही येत नाही, पण आपल्या अनेक सवयी ऑफिसमधे गॉसिपचा विषय होतात.
तुम्ही मान्य करा अगर करू नका, तुम्हालाही यापैकी काही वाईट्ट सवयी असणारच!
1) ऑफिसात सतत इतरांकडे वस्तू मागणं. पेन, स्टॅपलर, पेन ड्राइव्ह, अगदी कंगवा-रुमालसुद्धा अनेकजण मागतात.
2) दुस:याच्या टेबलावरच्या गोष्टींना हात लावणं.
3) आपल्या डब्यातली भाजी आवडली नाही तर दुस:याच्या डब्यातली भाजी बकाबका खायची.
4) बॉसच्या सतत पुढे पुढे करत राहायचं आणि आपल्याला एक नियम, बॉसला दुसरा आणि लोकांना शहाणपण शिकवायला तिसराच नियम सांगायचा.
5) इतरांच्या पर्सनल लाइफमधे सतत नाक खुपसत राहायचं. गॉसिप करायचं. आणि काहीच नाही जमलं तर मग आपलं दुखडं गात बसायचं.