टर्मरिक लेट्टे - हेल्दी ड्रिंक्सच्या जगात एक नवाच ट्रेण्ड
By admin | Published: June 11, 2016 10:35 AM2016-06-11T10:35:49+5:302016-06-11T10:35:49+5:30
नेहमी पिझ्झा, बर्गर अशा जंक फूडवर ताव मारणारे आपण आजारी असलो की मात्र चुपचाप आई जे सांगेल ते ऐकतो. हळदीचे गरमागरम दूध नाक मुरडत का होईना पितो
Next
>नेहमी पिझ्झा, बर्गर अशा जंक फूडवर ताव मारणारे आपण आजारी असलो की मात्र चुपचाप आई जे सांगेल ते ऐकतो. हळदीचे गरमागरम दूध नाक मुरडत का होईना पितो. हळद-दुध हे कायम सर्दी-खोकला झाला की नाक दाबून प्यायचं हा अनुभव आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचाच.
कधीकधी तर रोज पिवळी पिवळी ती हळद घातलेली भाजी खाऊनही कंटाळा येतो. पण आई-आजीच्या सल्ल्यानुसार तर हळद ही फार पौष्टीक. म्हणून तर कितीही कंटाळा आला असला तरी ते दूध, भाजी मुकाटय़ानं शरीरात पचवावीच लागते.
पण सध्या याच हळदीचं जगभरात महत्व एकाएकी खूपच वाढत चाललं आहे. एवढंच नाही तर गुगलवर स्पाईस असं सर्च केलं तर हळद आणि तिचं महत्व शोधणा:यांची संख्या सर्वाधिक आहे.
सध्या जगभरात एक नवीनच खूळ आलंय.
ज्याची आपण कल्पनाच करु शकत नाही.
परदेशात ( विशेषत: अमेरिकेत) कोल्डड्रींक्सप्रमाणो हळदीचं बाटलीबंद दूध विकत मिळायला लागलं आहे.
परदेशात हेच दूध टर्मरिक लेट्टे (turmeric latte) नावाने मिळतं आहे. आरोग्यास अत्यंत उत्तम म्हणून तरुण जनताही अगदी आनंदानं हे टर्मरिक लेट्टे पीत आहे. याशिवाय ज्या पदार्थात हळद वापरली जात नाही त्यातही आता थोडीशी हळद घालून तो पदार्थ करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. बर्गरच्या पॅटीसमध्ये इतर भाज्या आणि मसाल्यांबरोबर हळद घालण्याकडे आजकाल ब:याच हॉटेलांचा ओढा आहे.
हळदीच्या पदार्थाबरोबरच हळदीचे सूपही लोकप्रिय आहे. थाई क्युङिानमध्ये केल्या जाणा:या या सूपमध्ये नारळाच्या दूधात हळद पावडर आणि भाज्या मसाले घालून सीम टॉम टॉम थाई सूप केलं जातं. हळद आणि नारळाच्या मिश्रणामुळे या सूपची लच्चत खूप छान लागते.
हळदीमध्ये अनेक शक्तीवर्धक गुणधर्म असल्यानं तसेच ती अॅण्टीऑक्सीडीन असल्यानं आता नव्यान लोकांना तिचं महत्व आता खूप पटायला लागले े हळदीचा प्रभाव गेल्या काही वर्षात खूप वाढत असल्याचं आहारतज्ज्ञ कांचन पटवर्धन सांगतात.
लोकांनी कितीही आधुनिक पद्धतीचा आहार स्वीकारला असला तरी पारंपारिक गोष्टींचं महत्व लक्षात घेता आता पुन्हा जुनं ते सोनं म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे उद्या हेच टर्मरिक लेट्टे आपल्याकडेही बाटलीत मिळायला लागलं आणि त्याची क्रेझ आली तर चकीत होऊ नका.
-भक्ती सोमण