पण मग पुढे?
By Admin | Published: January 14, 2016 09:32 PM2016-01-14T21:32:30+5:302016-01-14T21:32:30+5:30
१३-१५-१६ वर्षांची मुलं.. त्यांच्या हातातली बॅट तळपते, चेंडू उसळतो आणि बातम्यांच्या नव्या ‘व्हायरल’ जगात
१३-१५-१६ वर्षांची मुलं..
त्यांच्या हातातली बॅट तळपते,
चेंडू उसळतो आणि बातम्यांच्या
नव्या ‘व्हायरल’ जगात
ते रातोरात सेलिब्रिटीही होतात.
शालेय स्तरावर विक्रम होतात..
धडाडीनं खेळणारी टॅलण्टेड मुलं दणादण रेकॉर्ड करतात, तोडतातही!
जेमतेम १३-१५-१६ वर्षांची मुलं.. त्यांच्या हातातली बॅट तळपते, चेंडू उसळतो आणि बातम्यांच्या नव्या ‘व्हायरल’ जगात ते रातोरात सेलिब्रिटीही होतात.
पण मग पुढे?
क्रिकेटच्याच परिभाषेत विचारायचं तर त्यांच्या गेमचं काय होतं?
तो नेक्स्ट लेव्हलला पोहचतो की थांबतो यशाच्या त्याच टप्प्यावर!
अपयश तरी अनेकदा नवं आव्हान किंवा जुनी सल म्हणून छळतं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला भाग पाडतं, पण यश?
महापराक्रमी यश मिळाल्यानंतर पुढे काय?
तिथून पुढचा टप्पा गाठतात का अनेकजण?
आणि नसतील गाठत तर त्यांचं नेमकं काय होतं?
याच प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी क्रिकेट कोच असलेल्या तीन ज्येष्ठ प्रशिक्षकांशी बोललं तर त्यातून अनेक गोष्टी समोर येतात.
मुख्य म्हणजे फक्त क्रिकेटच नाही, तर अन्यही क्षेत्रात काम करणाऱ्या आणि डोळ्यासमोर काही ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या दोस्तांसाठीही त्या लाखमोलाच्या ठराव्यात...