दोघांत अनेक ‘सोशल’ तिसरे

By admin | Published: July 25, 2016 01:08 PM2016-07-25T13:08:43+5:302016-07-25T13:25:13+5:30

एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला वॉट्स अ‍ॅपच्या मेसेज केला. ती कामात असल्याने त्यावर नंतर रिप्लाय करता येईल असा विचार करुन तिने तो मेसेज पाहून रिप्लाय केला नाही.

There are many 'social' third among the two | दोघांत अनेक ‘सोशल’ तिसरे

दोघांत अनेक ‘सोशल’ तिसरे

Next
>- राहुल गायकवाड
 
एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला वॉट्स अ‍ॅपच्या मेसेज केला. ती कामात असल्याने त्यावर नंतर रिप्लाय करता येईल असा विचार करुन तिने तो मेसेज पाहून रिप्लाय केला नाही. मात्र आपल्या प्रेयसीने मेसेज वाचून सुद्धा त्यावर रिप्लाय केला नाही याचा त्याला राग आला व  त्याने तिला याचा जाब विचारला. या प्रकारामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण व्हायला सुरु वात झाली.
हे सगळं घडलं ते व्हॉट्स अ‍ॅपमुळे झालेल्या गैरसमजुतीमुळे.
व्हॉट्स अ‍ॅप,  फेसबुक, हाइक, इंस्टाग्राम यासारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून व्यक्ती एकमेकांशी चोवीस तास संपर्कात राहू लागली. काही क्षणात फोटो, व्हिडीओ इकडचे तिकडे पाठवता येऊ लागले. अनेक कामांसाठी या सुविधांचा वापर होऊ लागला. मात्र संवाद जसजसा वाढत गेला तसाच नात्यांमध्ये विसंवाद सुद्धा वाढू लागला .स्मार्ट फोनच्या क्रांतीनंतर साध्या टेक्स्ट मेसेजची जागा व्हॉट्स अ‍ॅप सारख्या वेगवेगळ््या मेसेजिंग अ‍ॅॅपने घेतली. सध्या लोकांचा दैनंदिन आयुष्यातील बराचसा वेळ या मेसेजिंग अ‍ॅपवरच घालवला जातोय. सुरु वातीला व्हॉट्स अ‍ॅप कडे पैसे खर्च न करता मेसेज एकमेकांना पाठवायचं साधन म्हणून बघण्यात आलं. नंतर यावर ग्रुप तयार करता येऊ लागले,त्यात अनेकांना अ‍ॅड करता येऊ लागलं. यातूनच अ‍ॅडमीन नावाचं पद निर्माण झालं. सध्यातर ग्रुपवर एखादा आक्षेपार्ह मेसेज कोणी पाठवल्यास, पाठवणाऱ्या बरोबरच त्या ग्रूपच्या अ‍ॅडमिनलाही जबाबदार धरलं जातयं. इतकं महत्त्व सध्या या पदाला आलं आहे.
या क्रांतीमधील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लास्ट सिन व रिड रिसिप्ट. आपण पाठवलेला मेसेज समोरच्याला मिळाला आहे कि नाही व तो त्या व्यक्तीने वाचला कि नाही त्याचबरोबर ती व्यक्ती कधी आॅनलाईन होती व त्याने शेवटचं हे अ‍ॅप्लिकेशन केव्हा उघडून पाहीलं, याची माहिती यातून मिळू लागली. यामुळे एक प्रकारे समोरच्या व्यक्तीवर कायम नजरच ठेवता येऊ लागली. या सोयींच्या फायद्या ऐवजी तोटाच जास्त झालेला पाहायला मिळतोय. नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्यास या गोष्टी सध्या कारणीभूत ठरतायेत. खास करु न रिलेशनशिप मधील तरुण -तरुणींमधल्या वादाचं हे एक महत्त्वाचं कारण होऊ लागलं आहे.
सातत्याने व्हॉट्स अ‍ॅपवर साधलेल्या संवादामुळे प्रत्यक्ष भेटल्यावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही असं अनेक जण म्हणतात. याचं कारण म्हणजे गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंतच्या प्रत्येक गोष्टींबद्दल व्हॉट्स अ‍ॅपवरुन साधलेला संवाद. कुठली व्यक्ती कुठला डीपी व स्टेटस ठेवते यावरुन ती व्यक्ती कुठल्या विचारसरणीची आहे व ती सध्या काय विचार करत असेल याचे अंदाज बांधले जातात. स्वत:ला व्यक्त करण्यासाठीचं हक्काचं व्यासपीठ तरुणांना या माध्यामातून मिळालेलं आहे . त्याचा पुरेपुर वापर त्यांच्याकडून होतोय. मात्र आपल्या व्यक्त होण्याला संयमाची जोड असणं गरजेचं आहे. अतिपरिचयात अवज्ञा हे संस्कृत वचन इथे आवर्जून नमूद करावसं वाटतं. एखाद्या व्यक्तीचा अतिपरिचय,अतिजवळीक विसंवादाला व भांडणाला कारणीभूत ठरु  शकते. एका ठराविक मर्यादेत साधलेला संवाद हाच खरा हितकारक असतो. आज फेसबूकच्या माध्यमातून तरुण-तरुणी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा सोहळा करु  लागले आहेत. सातत्याने स्वत:चे सेल्फी फेसबूकवर अपलोड केले जातायेत. आपल्या आयुष्यात नेहमीच काहीतरी एक्सायटींग व हॅपनिंग चाललंय हे स्टेटस अपडेट पासून चेक इन च्या माध्यमातून लोकांना सांगितलं जातंय. एखाद्या स्टेटस किंवा फोटो मध्ये एखाद्याचा संबंध नसतानाही त्याला टॅग केलेलं अनेक वेळा दिसून आलयं.
व्हॉट्स अ‍ॅपसारख्या माध्यमांमधून मिळणाया सोयी वैयक्तिक आयुष्यात गैरसोयीच्याही बनू लागल्या आहेत. आणि त्यातून आनंद मिळण्याऐवजी, दु:ख आणि वेदनाही वाट्याला येत आहेत.

Web Title: There are many 'social' third among the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.