इंग्रजीचं टेन्शन येतं का?

By Admin | Published: January 2, 2015 03:34 PM2015-01-02T15:34:59+5:302015-01-02T16:12:30+5:30

आपल्याला स्टायलिश इंग्रजी बोलता येत नाही. आपण कॉलेजात गेलं की आपली गाडी रखडणार, आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपण मागेच पडणार.

Is there a tension in English? | इंग्रजीचं टेन्शन येतं का?

इंग्रजीचं टेन्शन येतं का?

googlenewsNext
>भेळ-भाषा, टोटल कन्फ्यूजन
 
पंधरा वर्षाच्या ज्या ज्या मुलामुलींशी गप्पा मारल्या, त्यात काही मराठी माध्यमातले, आनंददायी शिक्षणाचा अनुभव मराठी माध्यमातूनच घेणारे,  इंग्रजी माध्यमातले, कॉन्व्हेण्टवाले आणि इंटरनॅशनल बोर्डाचा अभ्यास करणारे हायफाय स्कूलवाले.
चर्चेचा मुद्दा होता, मीडियमचं काय? शिक्षणाचं माध्यम या विषयावर आपल्याकडे कान किटेस्तोवर चर्चा होत असताना आणि तरीही पालक कन्फ्यूजच असताना या मुलांना आपापल्या माध्यमांविषयी काय वाटतं? मराठी माध्यमात शिकणा:या मुलांना आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही याचा न्यूनगंड वाटतो की जे हायफाय इंग्रजी स्कूलवाले त्यांना आपल्या इंग्रजीचा अभिमान.?
हे प्रश्न घेऊन या मुलांच्या जगात गेलो तर लक्षात येतं, त्यांच्या जगात हे प्रश्नच नाहीत. भाषेसंदर्भात त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत आणि त्यांच्यासाठी त्या प्रश्नांना ‘डील करणं’ जास्त अवघड आहे. आणि म्हणूनच या मुलांचं  आपण बोलत असलेल्या भाषांविषयी काही वेगळंच म्हणणं आहे.
 
इंग्रजी माध्यमवाले काय म्हणतात?
 
प्रॉब्लम हा आहे की, आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आईबाबांनी आम्हाला इंग्रजी मीडियममधे घातलं.  पण आम्ही मात्र एकमेकांशी इंग्रजीत कमी हिंदीतच जास्त बोलतो, इंग्रजीचा तडका मारतो. मराठीत बोललेलं तर घरच्यांनाही आवडत नाही. शाळेत टीचरपण मिक्स लॅँग्वेज बोलतात, आमची कुठलीच भाषा पक्की होत नाही, हे कसं कळत नाही. मोठय़ांना?’’
 
मराठी माध्यमवाले काय म्हणतात? ( एक गट म्हणतो.)
 
कधी कधी ना वाटतं की, का आपल्याला आईबाबांनी मराठी मीडियममधे घातलं. आपली लाईफस्टाईल हायफाय नाही, आपल्याला स्टायलिश इंग्रजी बोलता येत नाही. आपण कॉलेजात गेलं की आपली गाडी रखडणार, आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आपण मागेच पडणार.
 
मराठी माध्यमवाले काय म्हणतात? ( दुसरा गट म्हणतो.)
 
मराठी मीडियममधे घातलं म्हणून आम्ही मागे पडलो हे कोण म्हणतं, आम्हाला चांगलं इंग्रजी वाचता-लिहिता येतं. फक्त बोलता येत नाही टमाटमा. पण त्यामुळे आमचं काही अडणार नाही, आमचा पाया इतरांपेक्षा जास्त पक्का आहे, असं वाटतं.
 
इंटरनॅशनल बोर्डावाले हायफाय स्कुलवाले काय म्हणतात?
 
नुस्तं इंग्रजी येऊन काय उपयोग, अॅक्सेण्टवालं इंग्लिश बोलता यायला हवं. एका सर्टन लेव्हलर्पयतचं वाचता-लिहिता-बोलता यायला हवं.  कामचलाऊ इंग्रजी बोललं, मधेच हिंदी आणलं, मराठीवाला टोन आला तर प्रॉब्लम होतो, त्याचा खूप स्ट्रेस येतो.  आमच्याशी कुणी असं भेसळ भाषेत बोललं की, आम्ही ठरवून टाकतो की या माणसाचा काहीतरी आयडेण्टिटी क्रायसिस आहे.  आपला असा क्रायसिस झाला तर काय याचंच जाम टेन्शन येतं. 
 
 
 

Web Title: Is there a tension in English?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.