ये दोस्त बडे कमिने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:03 PM2017-08-05T15:03:54+5:302017-08-05T15:06:11+5:30

भगवान मुझे दोस्तो से बचा ले दुश्मनो से मै खुद निपट लुंगा! असं म्हणण्याची वेळ आणणारे मित्र असतील तुमच्या आयुष्यात, तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच!

These friends make big ... | ये दोस्त बडे कमिने...

ये दोस्त बडे कमिने...

Next
ठळक मुद्देजिवाला जीव देणारे मित्र भेटतातही सहज.. पण ‘जीव खाणारे’ मित्र ते कुठे भेटतात.. असतात आपल्याभोवतीच..!आपल्यासाठी आपला एखादा मित्रही असाच असतो. पक्का आपल्या क्रिटीक. निंदकाचे घर शेजारी नाही तर आपल्या डोक्यावर बांधल्यासारखाच तो आपल्याला सतत धारेवर धरतो!

-ऑक्सिजन टीम

आठवतो? शोलेमधला जय? कसला कुजकट. त्या बिचार्‍या विरुचं कसंबसं जमलेलं प्रेम. पण याला मित्राच्या भावनांची काही कदरच नाही. मारे जातो लग्न  जमवायला. पण काय काय सांगतो, मौसीला. विरुच्या खानदानाचा आतापता नाही. तो दारु पितो. जुगार खेळतो. कामधंदा करत नाही. मित्राच्या इमेजची पुरती वाट लावतो. हे सारं कमीच म्हणून त्या बिचार्‍या विरुला आयुष्यभर खोटय़ा नाण्याचा टॉस करुन फसवतो. स्वतर्‍चंच खरं करतो. पण जेव्हा दोस्तीत जीव द्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा हाच जय स्वतर्‍च्या जीवाची पर्वा न करता पुन्हा एकदा टॉस करतो आणि विरुचा जीव वाचवतो. दोस्ताला मागे सारुन स्वतर्‍च्या प्राणांची कुर्बानी देतो. असा कमिना दोस्त ज्याला लाभतो तो खरा नशिबवान. विरुला जय लाभला म्हणून त्यांची दोस्ती अजरामर झाली. असे अजरामर दोस्तीचे किती किस्ते आपण आजवर ऐकले , वाचले आहेत. ज्याला ‘मैत्र’ म्हणतात ते हेच. काहीही न करता अपेक्षा न करता देत राहणं म्हणजे मैत्र, त्या मैत्रीत लहानमोठेपणाच्या भिंती नसतात. कसले आडपडदे नसतात खोटय़ानाटय़ा इगोंचे. खुल्या दिलानं जे जगतात, जगवतात, ते मित्र.

 

मित्राच्या भल्यासाठी, प्रसंगी त्याच्या विरोधातही जो उभा राहतो तो मित्र. तो प्रसंगी मित्राला पाठीशी घालतो पण मित्राच्या चुकांना नाही. उलट जगात आपला सर्वात मोठा शत्रू असल्य तो आपल्याला डिवचतो.. सोलून-फोडून काढतो. सतत चुका दाखतो..

सुधार सुधार म्हणून मागे लागतो, प्रसंगी जीव नको

करतो, वाईटपणा घेतो.

आणि कितीही हिडीसफिडीस केलं आपण तरी

सावलीसारखा आपल्याबरोबर चालतो.

राग-राग येतो त्याच्या दृष्ट वागण्याचा. त्याच्या

अत्यंतिक कठोरपणाचा..!

पण तो मित्र असतो म्हणून आपण तरतो, हे कसं

विसरता येईल.  त्याच्या ‘कमिने’ पणामुळे तर

आपण पाहतो स्वतर्‍ला आरशात. सुधारतो चुका.

आणि आपल्या बदललेल्या अंतर्‍रंगात एक सदैव

साथ देणारी भरवशाची, प्रेमाची प्रतिमा तरळत

राहते ती आपल्या मित्राची..

ज्याला असा मित्र भेटतो तो खरा नशीबवान..!

**

जिवाला जीव देणारे मित्र भेटतातही सहज..

पण ‘जीव खाणारे’ मित्र ते कुठे भेटतात..

असतात आपल्याभोवतीच..!

आपण नाही सचिनने 90 केले तरी वैतागतो

त्याच्यावर. म्हणतो सेंच्युरीची अपेक्षा असताना,

याला सहज शक्य असताना हा असा कसा 90वर आऊट होतो..?

आपण चिडतो त्याच्यावर, प्रसंगी भलंबुरं बोलतो.!

ते कशाच्या जोरावर.?

केवळ आपल्या त्याच्यावरच्या प्रेमाच्या जोरावर

आपल्याला खात्री असते की, जगात तो जे करू शकाते ते दुसरं कुणीच करू शकत नाही. म्हणून

तर अनेकदा त्याची सर्वोच्च खेळीही आल्याला ‘ते’

नाही देत ‘जे’ हवंच असतं.!

आपल्यासाठी आपला एखादा मित्रही असाच

असतो. पक्का आपल्या क्रिटीक. निंदकाचे घर

शेजारी नाही तर आपल्या डोक्यावर

बांधल्यासारखाच तो आपल्याला सतत धारेवर

धरतो! जरा आपलं गाडं घसरलं, जरा इकडेतिकडे गेली नजर की तो वटारतो डोळे.

 

कारण? त्यालाच फक्त माहिती असतं, की मनात आणलं तर आपण काय वाट्टेल ते करू शकतो..!

मित्राच्या क्षमतांवर विश्वास ठेवणारा, त्यासाठी

त्याला निखार्‍यांवर चालायला लावणारा मित्र ज्याला

भेटतो तो खरा नशीबवान..!

 

***

 

माणसाची खरी ओळख त्याच्या मित्रांवरून ठरते..!

तुमचे मित्रच तुमची ओळख सांगतात.

कारण ते तुम्हीच निवडलेले असतात..

त्यांना आयुष्यात आपणच एक खास जागा दिलेली असते! ती जागा कशी वापरायची हे ते ठरवतात..!

पण त्यातून घडत जातो आपण, समृद्ध होत जातो

आपण. आपल्या खाण्या-पिण्याच्या, वागण्या-

बोलण्याच्या सवयी बदलतात. जिभेवर चढून

बसणारे शब्द बदलतात, आपल्या लकबी, स्टाईल

सेन्स, डोक्यातली विचारांची प्रोसेस हे सारं बदलवून टाकण्याचं त्यांना नवीच दिशा देण्याचं काम मित्रच

तर करत असतात.

आपल्याही नकळत ते व्यापून टाकतात आपल्या

जगण्याची एक जागा. आणि मग त्या जागेचा रंग

किती प्रभावी त्यानुसार रंग बदलत जातं आपलं जगणं..!

पण जगण्याचा रंग पालटवताना आपल्याला

आपल्याच रंगात रंगू देणारे, एक नवा समृद्ध आयाम देणारे मित्र भेटणं फार दुर्मिळ..!

गप्पा-टप्पा-ऐश-पाटर्य़ा-सेलिब्रेशन हे तर सारं कुठल्याही मित्राबरोबर होतं..!

्रपण आपल्या जगण्याची दिशा काय हे आपल्याला

अचूक सांगणारा आणि त्या दिशेनं आपण जावं

म्हणून ‘कठोर’ होणारा मित्र भेटणं म्हणजे भाग्य..

ज्याला असा मित्र भेटतो तो खरा नशिबवान..!

 

***

 

सार्‍यांना लाभतात असे दृष्ट मित्र. जे खूप त्रास

देतात. मज्जा करता करता, कामाला लावतात..

आपल्या मित्रासाठी जिवाचं रान करतात..

प्रसंगी स्वतर्‍मागे राहतात; पण मित्र पुढे जावा

म्हणून जीव टाकतात..

आजच्या स्पर्धेच्या काळात मित्र पुढे निघून गेला

म्हणुन अकारण असूया न बाळगता मित्राच्या

आनंदात स्वतर्‍चं मोठेपण शोधतात..

- आता भेटतात असे मित्र..?

काही सुदैवी जीव असतात त्यांना भेटतात असे

मित्र. पण ‘तसे’ सच्चे मित्र भेटले, तर त्यांची कदर करावी लागते..

जपावं लागतं त्यांना प्राणपणानं..

ते लाभले म्हणून असावी लागते मनात एक कृतज्ञ

भावना!  मित्राविषयी असं निर्मळ आणि खरंखुरं प्रेम ज्याला वाअतं, असा सच्चा मित्र ज्याला लाभतो तो खरा नशिबवान..!

तुम्हाला असे मित्र लाभले असतील, तर मनापासून त्यांचे व्हा..

अशी मैत्री जगायला शिकवते.. जगणं सुंदर करते..!

‘आपल्या’ मैत्रीच्या खूप खूप शुभेच्छा.!

Web Title: These friends make big ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.