मन की बात

By admin | Published: March 26, 2015 09:21 PM2015-03-26T21:21:20+5:302015-03-26T21:21:20+5:30

आपले हसरे क्षण हीच आपली पूंजी.ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

Thing of mind | मन की बात

मन की बात

Next
>माणसं आयुष्यात येतात.जातात.
काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;
काही कामापुरती, काही कारणांपुरती!
काम संपलं की, जातात निघून!!
आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.
येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.
आपण त्यांच्या रंगात रंगतो,
त्या मौसमाचेच होऊन जातो!
काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;
आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;
ते येतात आणि आयुष्यभर राहतात.
कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.
पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.
***
निमित्त होऊन आलेली माणसं;
घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.
प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,
मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;
पण प्रवास संपतो,
त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो 
आणि ती माणसं निघून जातात,
अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.
मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत
म्हणून रडून, थांबून कसं चालेल?
उलट विचार करुन पहा;
ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?
इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला
थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?
कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?
आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना
तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?
तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?
**
आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.
पण अशी निमित्तानं आलेली माणसं
आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!
आणि मग निघून जातात.
***
त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.
आपण खूप त्रागाही करतो
स्वत:ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.
आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.
**
असं का करायचं?
आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.
आपल्यासोबत असलेल्या माणसांना 
बांधून घालण्यापेक्षा,
अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.
आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;
किती आनंद मिळाला.
किती सुंदर झाला प्रवास.
***
आपले हसरे क्षण
हीच आपली पूंजी.
ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)

Web Title: Thing of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.