मन की बात
By admin | Published: June 9, 2016 12:04 PM2016-06-09T12:04:54+5:302016-06-09T12:04:54+5:30
एका गावात एक अगदी साधासा, गरीब पण सज्जन माणूस राहत असतो. गावाला त्याचा काही उपयोग नसतो. आणि तो ही गावाला काही उपदेश करत नाही. लोक त्याची टिंगल करतात, त्याला चिडवतात. पण तो शांत असतो.
Next
>आहे काय तुमच्याकडे?
एका गावात एक अगदी साधासा, गरीब पण सज्जन माणूस राहत असतो. गावाला त्याचा काही उपयोग नसतो. आणि तो ही गावाला काही उपदेश करत नाही.
लोक त्याची टिंगल करतात, त्याला चिडवतात. पण तो शांत असतो. कधी कुणाला दुरुत्तरं करत नाही.
एकदा असाच तो एका टेकडीवर फिरायला जातो. तिथं टारगट तरुण त्याला चिडवतात. डिवचतात. काहीबाही बोलतात. बाकीचे गावकरीही नुस्ते तमाशा बघतात.
हा माणूस मात्र शांत, हसतो. जाताना सगळ्यांकडे पाहत म्हणतो की, सुखी रहा.
आणि चालायला लागतो. गर्दीत उभा एक तरुण त्याला थांबवतो आणि म्हणतो, ते तुला एवढंवाईट बोलले आणि तू त्यांना सुखी रहा असा आर्शीवाद दिला ते का?
म्हातारा हसतो आणि म्हणतो, ‘ आपल्याकडे जे आहे तेच आपण देतो, माङयाकडे जे आहे ते मी दिलं, त्यांच्याकडे जे आहे ते त्यांनी. कुणी काय द्यावं हे आपण नाही ठरवू शकत, आपण काय द्यायचं, हे आपण ठरवायचं.‘