मन की बात
By admin | Published: June 10, 2016 11:31 AM2016-06-10T11:31:14+5:302016-06-10T11:31:14+5:30
रोज दिवस उगवतो. आपल्या श्वासांना परमेश्वर आशीर्वाद देतो. एक दिवस आपल्या स्वाधीन करतो आण म्हणतो घे हे चोवीस तास, मनापासून जग.
Next
>
रोज दिवस उगवतो.
आपल्या श्वासांना परमेश्वर आशीर्वाद देतो. एक दिवस आपल्या स्वाधीन करतो आण म्हणतो घे हे चोवीस तास, मनापासून जग. या को:या रिकाम्या सेकंदाच्या पोकळीत तुला हवं ते चित्र काढ. घडव तुझा दिवस.
पण आपण काही असं नाही म्हणू शकत की, आज नको. आजचा सारा वेळ ठेव तुङया फिक्त डिपॉङिाटमध्ये. माङयामनासारखं सारं घडेल तेव्हा मी हा वेळ वापरेन.
असं होत नाही.
हातातून जाणारा प्रत्येक क्षण पुन्हा कधीच परत येत नाही.
आणि आपल्या वाटय़ाला आलेले श्वास आपण वाया घालवतो. आणि म्हणतो, काय हे माङया मनासारखं काहीच घडत नाही, माझं नशिबच चांगलं नाही.
आपण रोज उठतो, जिवंत असतो, धडधाकट असतो याहून मोठं सुदैव दुसरं काय?
मग कसं म्हणता की, आपण तेवढे लकी नाही?
-ऊर्जा