मन की बात
By admin | Published: June 22, 2016 12:56 PM2016-06-22T12:56:12+5:302016-06-22T12:56:12+5:30
शहरी, श्रीमंत वडील आपल्या मुलाला एका अत्यंत दुर्गम खेड्यात घेऊन जातात. मुलानं गरीबी पहावी, लोकांचे कष्ट पहावेत, आणि आपण किती श्रीमंत आणि सुखी आहोत हे पाहून वडील आपल्याला देत असलेल्या सुविधांचं मोल जाणावं असा त्यांचा उदात्त हेतू होता.

तसं मुलाला खेड्यात नेलं.
चार दिवस राहून ते परत आले.
वडिलांनी मुलाला विचारलं तू काय काय पाहिलंस?
मुलगा म्हणाला, ‘बाबा, आपल्या घरात स्विमिंग पूल आहे, तिथं मुलांना पोहायला मोठी नदी आहे. ते मनसोक्त पोहतात. आपल्याकडे एकच कुत्रा तिथं गल्लीत मुलं अनेक कुत्र्यांसह, मांजरासह खेळतात. आपल्या घरी रात्री इवलुसा मंद लाईट उजळतो, ते ताऱ्यांच्या खाली खुल्या आकाशात झोपतात. आपण धान्य दुकानातून विकत आणतो, ते स्वत: पिकवतात. मला असं श्रीमंत जग दाखवलंत तुम्ही थॅँक्स!’
ते ऐकून बाबांच्या लक्षात आलं की, श्रीमंती फक्त पैशावर ठरत नाही, आपण जगाकडे कसं पाहतो यावरही मनाची श्रीमंती ठरते!
- ऊर्जा