मन की बात
By Admin | Published: June 23, 2016 05:28 PM2016-06-23T17:28:38+5:302016-06-23T17:28:38+5:30
तेव्हा हा इटुकला मासा म्हणतो की, जेव्हा माझ्याकडे छोटंसं का होईना मुक्त तळं होतं, तेव्हा मी ते पुरेपूर उपभोगलं नाही. सतत मोठ्या समूद्राची स्वप्न पाहिली.
>एक इवलासा मासा असतो, एका छोट्या तळ्यात पोहणारा..
मजेत. आनंदात.
मात्र त्याला रोज वाटायचं की, इथं काय तेच ते खायला मिळतं. इटुकलं तळं, कितीसं पोहणार,
त्यापेक्षा मोठ्या समुद्रात जावं..
पण जाणार कसं?
आणि तिथं गेल्यावर मोठ्या माशानं आपल्याला खाऊन टाकलं तर?
या जरतरमध्येच तो फार अडकतो..
तळ्यात एकदा काही लोक मासेमारीला येतातच, त्यात हा इटुकला मासा अडकतो..
आणि पोहचतो कुठं तर थेट कुणाच्या तरी घरच्या फिश टॅँकमध्ये..
हा मासा खूप रडतो..
सोबत असलेला दुसरा मासा त्याला विचारतो की, काय झालं?
तेव्हा हा इटुकला मासा म्हणतो की, जेव्हा माझ्याकडे छोटंसं का होईना मुक्त तळं होतं, तेव्हा मी ते पुरेपूर उपभोगलं नाही. सतत मोठ्या समूद्राची स्वप्न पाहिली..
पण फक्त पाहिली, त्यासाठी हिंमत करुन कधी समुद्राची वाट शोधली नाही..
आणि आता माझ्या वाटेला हा फिशपॉण्ड आलाय..
जे असतं आपल्याकडे त्याची कदरच न केल्याचा हा परिणाम..
आणि काहीच न करता नुस्ती मनोराज्य करत बसल्याची शिक्षाही..
आता ही कैद हेच माझं आयुष्य!
-ऊर्जा