मन की बात
By admin | Published: June 13, 2016 09:08 AM2016-06-13T09:08:50+5:302016-06-13T09:13:24+5:30
एक मेसेज कालपासून व्हॉटसअॅप वर फिरतो आहे. तुम्हालाही आला असेल? एक तरुण हॉस्टिलमध्ये आहे, सगळ्या शरीरात नळ्या खुपसलेला, अत्यावस्थ. आणि फोटोखाली लिहिलंय की, याचे फेसबुकवर दोन हजार मित्र आहे. पन्नास व्हॉट्सअॅप ग्रूप आहेत. पण आत्ता या दवाखान्यात फक्त त्याच्या घरचे म्हणजे आईवडील, भाऊ-बहीण आणि एक जिवाभावाचा मित्र एवढेच उभे आहेत.
Next
>

आणि पूर्वी फोनमध्ये डोकं खुपसून बसलेलं असताना याच माणसांशी बोलायला याला वेळ नव्हता.
**
इथंच हा मेसेज संपतो.
पण तो वाचून आपण जरा तपासूया की,
आपलं असं काही होतं आहे का?
आपण ‘आपल्याच’ माणसांशी बोलणं बंद करतोय का?
एकदा स्वत:शी आणि मग घरच्यांशी बोलून सापडेल, या प्रश्नाचं उत्तर?
-ऊर्जा