मन की बात

By admin | Published: June 17, 2016 07:43 AM2016-06-17T07:43:02+5:302016-06-17T07:43:02+5:30

महत्वाचं काय आहे? कुणी तुम्हाला नावं ठेवतं, रंगरुपावरुन टोमणे मारतं ते, की तुमची आई, जिच्या दृष्टीनं तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर मूल आहात.

Thing of mind | मन की बात

मन की बात

Next


महत्वाचं काय आहे? कुणी तुम्हाला नावं ठेवतं, रंगरुपावरुन टोमणे मारतं ते, की तुमची आई, जिच्या दृष्टीनं तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर मूल आहात.

***
महत्वाचं काय आहे?
तुमच्यावर माया करत तुमच्यासाठी आपल्या घासातला घास बाजूला काढून ठेवणारी बहीण की कॉलेजात तुमच्याकडे पाहत कुजकट हसणारी कुणी मुलगी?

**
महत्वाचं काय आहे?
तुमचे जीवाला जीव देणारे दोस्त की
जिच्याविषयी तुम्हाला आकर्षण वाटतं पण जी तुम्हाला ‘नाही’ म्हणाली ‘ती’ कुणी?

***
महत्वाचं काय आहे?
तुमचं असणं, वाट्टेल करु शकण्याची तुमची जिद्द की
तुम्ही काहीच करू शकत नाही, ढ आहात, असं म्हणणारे तुमचे नातेवाईक?

***
यासाऱ्या प्रश्नात उत्तर आपलं आपण द्यायचं की आपल्यासाठी महत्वाचं कोण आणि काय आहे. जे महत्वाचं, जे जगण्यासाठी आवश्यक ते जपावं आणि बाकीच्याकडे सरळ दुर्लक्ष करावं. आपली जीवाभावाची माणसं, आपण, आपल्यातल्या क्षमता आणि आपले कष्ट हे महत्वाचं बाकी जग काय म्हणतंय हे कसं काय महत्वाचं ठरू शकतं..
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा मन दुखेल तेव्हा विचारा स्वत:ला की,
महत्वाचं काय आहे?



ऊर्जा

Web Title: Thing of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.