तिसऱ्यांची लढाई
By admin | Published: September 30, 2016 10:15 AM2016-09-30T10:15:43+5:302016-09-30T10:15:43+5:30
समलिंगी हा शब्द जरी उच्चारला, तरी आपल्या समाजात तोंडाला कुलुपं लागतात. वयात येणाऱ्या, तरुण ‘एलजीबीटी’ मुलामुलींना काय काय सोसावं लागतं, याची चर्चाही होत नाही. त्यांचे प्रश्न कुणी ऐकून घेत नाही.
Next
- प्रवीण दाभोळकर
समलिंगी हा शब्द जरी उच्चारला, तरी आपल्या समाजात तोंडाला कुलुपं लागतात. वयात येणाऱ्या, तरुण ‘एलजीबीटी’ मुलामुलींना काय काय सोसावं लागतं, याची चर्चाही होत नाही. त्यांचे प्रश्न कुणी ऐकून घेत नाही, त्यांची उत्तरं शोधणं तर दूरच ! त्याहून भयंकर म्हणजे त्यांना होणाऱ्या शारीरिक-मानसिक तक्रारींची दखल घेतली जात नाही. या साऱ्यावर जनजागृती हा उपाय असला, तरी त्याचा वेग कमी आहे. मात्र हळूहळू गोष्टी बदलतील अशी आशाही आहेच. ‘दारवठा’ या मराठी शॉर्टफिल्मने अलीकडेच बरेच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स गाजवले. नुकताच एक आयरीश पुरस्कार जिंकत
या विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली. आणि दुसरीकडे गेल्याच आठवड्यात केरळमध्ये एक घटना बातमीचा विषय ठरली. कोझीकोडेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन केली. ती कमिटी एलजीबीटी कम्युनिटीच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर कारवाई करेल, असं जाहीरही केलं.. देशातली अशी ही कदाचित पहिलीच कमिटी असेल. अवतीभोवती हे सारं घडत असताना, एलजीबीटी तरुण-तरुणींच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? ते कसे झगडत आहेत हे शोधण्यासाठी या चार दोस्तांशी गप्पा मारल्या.. स्वत:चं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यातले प्रश्न बाजूला ठेवून समाजाासाठी काम करणाऱ्या या चार दोस्तांची ही एक विशेष भेट...
शैलेश भूटका , मानवाधिकार विषयात पदव्युत्तर पदवी, एम.एस.डब्ल्यू.
आपल्याला पुरुषांमध्येच आकर्षण असल्याचे शैलेशला जाणवू लागले होते. आपण ‘गे’ आहोत हे त्यानं मान्यदेखील केलं. तरीही लोक का तुच्छ भावनेने आपल्याकडे बघतात? समाज, घरचे आपल्याला का स्वीकारत नाहीत? आपण काही जगावेगळे आहोत का? - असे प्रश्न त्याला भांबावून सोडायचे. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने आयुष्य संपविण्याचा विचार त्याच्याही मनाला शिवला होता. पण आपल्यासारखे अनेक जण या परिस्थितीतून जात असतील, त्यांनाही भयानक मानसिक त्रासातून जावे लागत असेल हा विचारही शैलेशच्या मनात आला.
कॉलेज लाइफमध्ये कट्ट्यावर बसणं, मित्रांसोबत वेळ घालविणं असं इतरांच्या नजरेत सर्वसाधारण शैलेशचं आयुष्य चाललं होतं. पण कॉलेज लाइफमध्ये पूर्णपणे घरच्यांवर अवलंबून असल्यानं तो छातीठोकपणे आपण गे असल्याचं घरच्यांना सांगू शकत नव्हता.
पदवी शिक्षणाला असताना एका मुलीने शैलेशला प्रपोज केलं. पण आपल्याला मुलीबद्दल कोणतीच प्रेमाची भावना नाही हे माहीत असल्यानं तो त्या नात्यापासून लांबच राहिला. कुणाला कळलं तर लोक काय म्हणतील या भीतीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. शैलेशचा जन्म एका गुजराती सर्वसामान्य कुटुंबातला. आपला मुलगा गे आहे हे समजल्यावर घरात वादळ आलंच. डोक्यावर परिणाम झाला असेल, मानसोपचारतज्ज्ञाला भेटायला हवं, लग्न करून पाहावं असे प्रस्ताव समोर येऊ लागले. समाज काय म्हणेल ही घरच्यांची भीती शैलेशपासून लपून राहत नव्हती. पर्यायाने आत्महत्त्येसारखे वाईट विचार मनात येऊ लागले. मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढत होती. यातून बाहेर पडण्याचा मार्ग तो शोधू लागला.
दरम्यान, ‘एचआयव्ही झालेल्या गे व्यक्तींच्या जीवनातील सपोर्ट ग्रुपचं महत्त्व’ या विषयावर माहिती गोळा करण्यासाठी शैलेश वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या समलिंगींना भेटला. त्यानिमित्ताने त्यांच्या समस्याही त्याला जाणून घेता आल्या. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. एचआयव्ही असल्याचे समजल्यावर मानसिक त्रासात अधिकच वाढ झालेली माणसं शैलेशला यावेळी भेटली.
योग्य वेळेत सपोर्ट ग्रुपची साथ मिळाली तर चांगले आयुष्य जगता येऊ शक तं या निष्कर्षापर्यंत शैलेश पोहोचला. शिक्षणाची साथ त्यानं सोडली नव्हती. पदवी, मानवाधिकार विषयात पदव्युत्तर पदवी, एम.एस.डब्ल्यू. असे शिक्षण दरम्यानच्या काळात सुरू होते. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी तो जोडला जात होता. आता तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचून तो समलैंगिकतेविषयी जनजागृती करीत आहे. निर्मलानिकेतन महाविद्यालयातील समाजसेवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही तो याबाबत जागृती करीत असतो.
***
‘‘सपोर्ट ग्रुपच्या संपर्कात आल्याने माझी इतर ‘गें’सोबत ओळख झाली. जगात आपण एकटे नसून अनेकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते याची जाणीव झाली. ‘एलजीबीटीआय’बाबत जनजागृती करण्यासाठी एम.एस.डब्ल्यू. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचं काम मी करतोय !’
- शैलेश भूटका
कोनिनिका रॉय , एमए इन कल्चरल स्टडीज
बावीस वर्षांची कोनिनिका रॉय बायोसेक्शुअल आहे. सध्या ती हमसफर ट्रस्टमध्ये कायदेशीर सल्लागार पदावर काम करत आहे. आपल्या जवळच्याच मैत्रिणीसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. आयुष्यभर एकमेकींसोबतच राहण्याचा विचार असला तरीही सध्या स्वत:चे करिअर करण्याकडे दोघींचा कल आहे.
सोफियाने महाविद्यालयातून बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनच्या एसओएस विद्यापीठातून एमए इन कल्चरल स्टडीजचे शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान कॉलेजमध्ये एकत्र राहण्यापासून ते एकत्र अभ्यास, फिरणे, खेळण्यापर्यंत मैत्रिणीची साथ असायची. पण हे सर्व मैत्रीच्या पलीकडचे आहे असं त्यांना जाणवायला लागलं होतं. त्यातूनच अचानक मैत्रिणीने कोनिनिकाला प्रपोज केलं. कोनिनिकासाठी हे अनपेक्षित नव्हतं पण विचार करण्यासाठी तिनं वेळ घेतला. घरातल्यांना कसे समजवायचे हा मोठा प्रश्न समोर होता. लंडनला असताना स्काइपवरून आईशी गप्पा मारताना कोनिनिकाने मन मोकळे केले. मुलीला लंडनला शिकायला पाठवलं आणि ती सांगते की, माझं एका मुलीवर प्रेम आहे, हे घरच्यांसाठीही भयंकर होतं. खूप मोठं वादळ घरात आलंच. घरच्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नव्हती. आयुष्य संपविण्याचा विचारही यावेळी डोकावून गेला.
झगडा अजून संपलेला नाही. पण ‘एलजीबीटीआय’ कम्युनिटीसाठी चर्चगेट लिबर्टी थिएटरमध्ये होणाऱ्या ‘कशिश फेस्टिव्हल’ची तिला मदत झाली. त्यातूनच पुढे ती हमसफर ट्रस्टशी जोडली गेली.
‘एलजीबीटीआय’ कम्युनिटीपैकी शोषित घटक मदतीसाठी हमसफर ट्रस्टमध्ये संपर्क साधत असतात. कोनिनिका त्यांना कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन करीत असते.
***
हमसफरच्या माध्यमातून ‘एलजीबीटीआय’ कम्युनिटीला आयुष्यात येणाऱ्या अडचणींसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. आमचा मार्ग सोपा नाही, याची जाणीवही आहेच.
- कोनिनिका रॉय
आशिष शिगवण , एलएलबी
वयाच्या सातव्या वर्षी त्याला कळलं की आपल्याला पुरुष आकर्षण आहे. बोलण्यातला फरक, छातीचा आकार, चेहऱ्याची ठेवण, ‘स्त्री‘चा जन्म असल्याची जाणीव, १४ ते १८ वर्षामध्ये होत असलेले हार्मोनल बदल त्याला जाणवले. आपण ट्रान्सजेंडर आहोत हे मान्य करायला खूप वर्षे गेली. पण शिक्षणाची कास त्यानं सोडली नाही. असा आशिष शिगवण. मुंबई विद्यापीठातून बी.ए. केल्यानंतर त्याने वकिलीचे शिक्षण घेतले. सध्या असंघटित कामगारांच्या शिक्षणासाठी तो ’प्रयास’ ही सामाजिक संस्था चालवतोय.
ट्रान्सजेंडर असण्याला घरातूनच विरोध असल्याने २००७ साली १७ व्या वर्षी आशिषने घर सोडले. एव्हाना लोकांकडून शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक पुरेपूर झाली होती. एक मानसिक रुग्ण म्हणून समाजाने केव्हाच शिक्का मारला होता, पण फायदा घेणे सोडले नव्हते. सरतेशेवटी आपल्या आयुष्यात फक्त अवहेलनाच आहे म्हणून गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवायचा त्याचा प्रयत्न फसला आणि जगण्याचा खरा अर्थ त्याला उलगडत गेला. मरून प्रश्न संपणार नाहीत हे त्याला उमजले. प्रश्न संपवायचे असतील तर उभे राहावे लागेल, लढावे लागेल हे आशिषने मनाशी पक्के केले. स्वत:च्या अस्तित्वाला मान्य केल्यावरच बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ट्रान्सजेंडर असण्याची कोणतीच लाज त्यानंतर त्याला वाटली नाही.
शिक्षण घेत असताना आपल्याबद्दल आपण बोलले पाहिजे याची जाणीव आशिषला झाली. आजही ट्रेनमधून ये-जा करताना पुरुषांच्या डब्यात टवाळखोरांकडून मुद्दाम धक्काबुक्की करणे, छातीला हात लावणे, हिजडा, छक्का म्हणत चिडवले जाणे हे प्रकार होतात. पण लोकांची विचार करण्याची पद्धत, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल यावर त्याचा विश्वास आहे. तृतीयपंथींनी शिक्षण घ्यावे, त्यांच्या कुवतीनुसार नोकरी मिळू शकेल हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सध्या तो असंघटित कामगारांच्या ७५० लहान मुलांना सक्षम करण्यात मदत करतोय. चिमुरड्यांच्या आई-वडिलांचा विश्वास, आदर आणि आशीर्वाद त्याला मिळत असतात.
***
नशिबाला दोष देत राहू नये, असे मला नेहमी वाटते. मी ट्रान्सजेंडर आहे, मला नोकरी कुठे मिळणार? समाजातून मला हीनतेची वागणूकच मिळणार.. अशा गोष्टींचा बाऊ न करता शिक्षण घ्या, नेतृत्व करा, समाजातील इतरांंसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा. ‘एलजीबीटीआय’ आणि इतर समाजाची एक मैत्रीपूर्ण समाजरचना व्हायला हवी.
- शैलेश शिगवण
डॅनिअल फ्रॅन्सिस मेरीमेण्टोस , एम.एस.डब्ल्यू.
मुलगा छक्का म्हणून जन्माला आला म्हणत बाबांनी त्याला ट्रान्सजेंडरला विकले. आईने त्याला घरी आणले, वाढविले. आज तो समाजात इंटरसेक्सविषयी जागृती करतोय. जेथे जन्मदात्या वडिलांनीच नाकारले तेथे समाजाकडून काय अपेक्षा करायची... हे सांगतोय डॅनिअल फ्रॅन्सिस मेरीमेण्टोस. डॅनिअलचा तीन वेळा आत्महत्त्येचा प्रयत्न फसला. हॉस्पिटलमध्ये मृत्यूने हुलकावणी दिली आणि मिळालेल्या नव्या आयुष्यात त्याला जनजागृतीचे खूप काम करायचे आहे.
जन्म पुरुषाचा असला तरी लहानपणापासूनच त्याला मुलींना आवडणाऱ्या गोष्टी आवडू लागल्या होत्या. मुलांची त्याला भीती वाटायची. मित्र, शेजारी बायल्या, छक्का चिडवू लागले होते. सांताक्रूझच्या एका शाळेत प्रवेश घेतला. पण तेथेही असह्य शारीरिक अपमान आणि छळ सोसावा लागला. या मधल्या काळात लंडनमध्ये त्याच्यावर २९ मोठ्या आणि १८ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वर्तक कॉलेजला कला शाखेत प्रवेश घेतला. सुरुवातीला त्रास झाला, पण एक दिवस भरलेल्या वर्गासमोर धीर एकवटवून त्याने स्वत:बद्दल सांगितले.. ‘हो, मी इंटरसेक्स आहे आणि मला यामध्ये काही चुकीचे वाटत नाही. मी कोणाला त्रास देत नाही. मला माणूस म्हणून बघा...’ वर्ग शांत झाला. पण यामुळे चांगले मित्र-मैत्रिणी भेटले. आधीच नृत्याची आवड असणाऱ्या डॅनिअलने डान्स थेरेपी म्हणून कथ्थकला प्रवेश घेतला, त्यातही मास्टरी मिळवली. महाविद्यालयात प्रवेश घेतला. बायबल, कुराण, भगवद्गीता जवळजवळ सर्वच धर्मग्रंथ वाचून काढले. इंटरसेक्स या विषयावर डॅनिअल आता खुलेपणाने बोलू लागला आहे. भार्इंदरच्या पॅरिस पॅस्ट्रोल काउन्सिलमध्ये सचिव पदावर काम करतोय. संडे स्कूल ग्रुपमध्ये नववी, दहावीच्या मुलांना तो बायबल शिकवतोय, नॅशनल काउन्सिल चर्चेस आॅफ इंडियामध्येही तो सक्रिय आहे. सुरुवातीच्या काळात तृतीयपंथी म्हणून ज्या चर्चमधून त्याला हाकलले होते त्याच ठिकाणी जनजागृती करण्यास त्याला बोलावले जातेय.
***
आयुष्यात एलजीबीटीआय सन्मानासाठी काम करायचेय. या कम्युनिटीनेही शिकावे, पुढे यावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातूनच याबद्दल जनजागृती व्हायला हवी. ट्रान्सजेंडरनेही ड्रायव्हर, डॉक्टर, बिझनेसमॅन होण्याची इच्छा बाळगावी.
- डॅनिअल फ्रॅन्सिस मेरीमेण्टोस
लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.

dabholkarpravin@gmail.com