विचारांच्या वाटेवरची खमकी पाऊलं..
By admin | Published: August 13, 2015 03:05 PM2015-08-13T15:05:41+5:302015-08-13T15:05:41+5:30
अनिष्ट रूढी, परंपरा, जुनाट धारणा आणि माणसाला माणूसपणानं जगणंही नाकारणारे नियम, समाजाची जाचक बंधनं आणि त्याविषयी बोलण्याचीही हिंमत न करणारा अवतीभोवतीचा परिसर. अशा वातावरणात ही तरुण मुलं हिमतीनं उभी राहतात. नुस्ते प्रश्न विचारत नाहीत, नुस्ते उपदेश देत नाहीत, फक्त टीकाही करत नाहीत. तर ते लोकांशी ‘बोलतात’
Next
>अनिष्ट रूढी, परंपरा, जुनाट धारणा आणि माणसाला माणूसपणानं जगणंही नाकारणारे नियम,
समाजाची जाचक बंधनं आणि त्याविषयी बोलण्याचीही हिंमत न करणारा अवतीभोवतीचा परिसर.
अशा वातावरणात ही तरुण मुलं हिमतीनं उभी राहतात. नुस्ते प्रश्न विचारत नाहीत, नुस्ते उपदेश देत नाहीत, फक्त टीकाही करत नाहीत. तर ते लोकांशी ‘बोलतात’. त्यांचं ऐकून घेतात. वैज्ञानिक तथ्य सांगतात. त्यामागचं शास्त्र सांगतात. प्रश्न विचारा म्हणतात, त्या प्रश्नांची उत्तरं देतात. डोळसपणो, विचारानं आयुष्याची दिशा शोधतात, शोधण्याचा प्रयत्न करतात. समान जगणं, समान आनंद यांची परिभाषाच उलगडतात.
मात्र त्या वाटेवरचा प्रवास सोपा कसा असेल त्यांचा?
अनेक प्रश्न आहेत, संघर्ष आहेत, समाधान आहे आणि निराशेचे काही क्षणही आहेत. तरी हे तरुण कार्यकर्ते आपला विचार आणि विवेक जिवापाड जपत आपल्या वाटेवर खंबीरपणो चालत आहेत.
अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या राज्यभरातल्या काही निवडक कार्यकत्र्याचे हे अनुभव त्यांच्याच शब्दांत. त्यांच्या नव्या संघर्षाची एक गोष्ट..
आपलं ते खरं नव्हे, खरं ते आपलं!
मी कोल्हापूरजवळच्या धामोड गावचा.
दहावी- बारावीला असल्यापासून अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या कामाची माहिती होती. एक ज्येष्ठ कार्यकर्ते के. डी. खुर्द आम्हा तरुणांना या उपक्रमाची माहिती द्यायचे. त्यातून विसर्जित गणपती दान करा या उपक्रमाची माहिती मिळाली. जेमतेम तीन हजार वस्तीचं आमचं गाव. गावात 25क् गणपती बसायचे. आम्ही घरोघर जाऊन माहिती दिली, पाण्याचं प्रदूषण कसं होतं ते बोललो. आणि त्यावर्षी 11क् गणपती आम्हाला दान म्हणून मिळाले.
तो पहिला प्रयत्न आणि पहिला विश्वास की, आपण चांगलं काम केलं तर लोकं आपल्यावर विश्वास ठेवतात. या उपक्रमासंदर्भात डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कळलं. तरुण मुलांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांनी आम्हाला एक पत्र पाठवलं.
त्यावेळी ते पत्र पाहून भारावून गेलो होतो. ज्यांचे विचार केवळ वार्तापत्रतून वाचत होतो, त्यांनी आपल्याला पत्र लिहावं ही फार मोठी गोष्ट होती. तिथूनच काम करण्याची खरी प्रेरणा मिळाली. आता साधारण पंधरा वर्षे झाली, मी जसं जमेल तसं काम करतोय.
दरम्यान, शिक्षण पूर्ण करून मी प्राथमिक शिक्षक झालो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावात सात वर्षे नोकरी केली. तिथंही असं जाणवत होतं की, आपण काही काम करावं. वर्गात मुलांशी, गावक:यांशी बोलत होतो. अनेक चुकीच्या प्रथा समोर दिसत होत्या. पण आपण ‘बाहेरून’ आलेलो, त्यामुळे फार काही करता येत नव्हतं.
तिथे जवळच शिरंबे नावाचं गाव होतं. त्या गावात अशी प्रथा होती की, कुणाला सर्पदंश झाला तर दवाखान्यात न्यायचे नाही. गावातल्याच एका मंदिरातल्या खांबाला बांधायचे. मग ढोल वाजवायचे. तो ढोल चांगला वाजला तर माणूस जगेल, नाही तर नाही अशी ही धारणा.
एकदा शाळेची साफसफाई करताना एका मुलीला सर्पदंश झाला. त्या मुलीच्या घरची आर्थिक स्थितीही वाईट. सगळ्या शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला की, तिला चिपळूणला दवाखान्यात न्यायचं. मात्र गावची रीत आड येत होती. तिची आईपण घाबरत होती. मुलीचं काही बरंवाईट झालं तर? पण सगळ्या शिक्षकांनी जबाबदारी घेतली, आईला समजावलं, सगळ्यांनी औषधोपचाराचा खर्च उचलला. ती मुलगी दवाखान्यात आठ दिवस अॅडमिट होती, बरी होऊन घरी आली.
गावातला तो भगत वैतागला. त्यानं लोकांना चिथवलं. पण गावातल्या शिकल्यासवरल्या लोकांनी मग सगळ्यांना समजावलं.
हे एक उदाहरण, की शिकलेसवरलेले लोकही चटकन हिंमत दाखवत नाहीत, गावात बोलत नाहीत; पण हिंमत केली तर बदल होऊ शकतात.
तिकडून बदली होऊन 2009 मधे मी कोल्हापुरात आलो. आधी जे काम व्यक्तिगत स्तरावर करत होतो, ते संघटना म्हणून करू लागलो. डॉ. दाभोलकर नेहमी सांगत शिक्षक समाज बदलू शकतो. त्या विचारानं कामाला लागलो.
आम्ही कॉलेजच्या तरुणांसाठी 31 डिसेंबरच्या निमित्तानं ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ हा उपक्रम राबवतो. कॉलेजच्या मुलांना दूध देत, व्यसन टाळण्याची माहिती दिली. तेच फटाकेमुक्तीचंही. गेल्या वर्षी मुख्याध्यापक संघाच्या मदतीनं जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधे जाऊन दिवाळीत फटाकेमुक्तीचं महत्त्व मुलांना समजावून सांगितलं. मुलांनीही मान्य केलं की फटाके उडवणार नाही. त्यातून अंदाज केला तर साधारण एक कोटी दहा लाख रुपये फटाक्यांपोटीचे वाचले असतील असा अंदाज आहे. समजा सगळे नसतील वाचले तरी किमान पन्नास-साठ लाख रुपये तरी वाचलेच असतील, तेही काही कमी नव्हेत!
माझा अनुभव आहे की, शाळेत मुलांशी बोललं, त्यांना समजावलं तर ते उत्साहानं ऐकतात. बदल करायला तयार असतात. आणि मुलंच कशाला, प्रयत्न केले तर मोठेसुद्धा ऐकतात.
अलीकडचीच एक घटना. धनगर समाजातल्या एका महिलेस तिच्या सासू आणि नव:यासह जात पंचायतीनं बहिष्कृत केलं होतं. समाजाचा निवडणुकीला उभं राहायला विरोध असताना 2क्क्1 मधे त्यांनी निवडणूक लढवली म्हणून त्यांना जातीबाहेर काढलं होतं. 2क्क्8 मधे तिच्या नव:याचं निधन झालं. पण वारंवार मागणी करूनही तिला जातीत घेतलं जात नव्हतं. आर्थिक दंड भरण्याची तिची ऐपत नव्हती. तिनं आमची मदत मागितली. पोलिसांच्या मदतीनं आम्ही जातीतल्या प्रमुख नेत्यांशी बोललो. त्यांची समजून घातली. कायदा-नियम काय ते समजावलं आणि समाजानं तिला परत सन्मानानं सामावून घेतलं. त्या बाईंनी साखरच वाटली सगळ्यांना!
अशा अनेक घटना सांगता येतील ज्या बळ देतात. मी आता राज्याचा युवा कार्यवाह म्हणून काम करतोय. तरुणांशी बोलतो आहे. त्यातून माङयाच लक्षात येतं की मला जे विचार वयाच्या 18-19 व्या वर्षी पटले होते, ते काम करताना, इतरांना सांगताना अधिक दृढ होत आहेत. कुठलाही आर्थिक मोबदला न देता व्यक्तिमत्त्व विकास करून घेण्याची ही चळवळ म्हणजे एक कार्यशाळाच आहे.
डॉक्टर दाभोलकर नेहमी म्हणायचे, ‘आपलं ते खरं म्हणण्यापेक्षा, खरं ते आपलं म्हणा!’
ते खरं शोधण्यासाठी मग प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. लोकांशी संवाद असला पाहिजे. हे असं काम करायला पैसा लागत नाही, तर लोकांशी असलेला संवाद, त्यातून बदलणा:या गोष्टी याच फार मोलाच्या ठरतात. चारचौघात बोलायला कचरणारा मी आता लोकांसमोर भाषण देतो, शाळा-कॉलेजातल्या मुलांशी उत्तम संवाद करतो आणि विचारानं जगतो हे समाधान कितीतरी मोलाचं आहे.
आपल्या अवतीभोवती विचारानं, विवेकानं चालणारी माणसं असावीत असं वाटून काम करत राहायचं एवढंच आता ठरवलं आहे.
- कृष्णात कोरे
कोल्हापूर
तोडणं नव्हे, बोलणं महत्त्वाचं!
माझी आई पुरोगामी विचारांची. तिची एक महिला संस्था होती.
त्या संस्थेच्या एका उपक्रमांतर्गत ‘चमत्कारामागे विज्ञान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंनिसचे कार्यकर्ते आणि माङो मित्र असलेले रवि आणि राज यांनी तो कार्यक्रम असा काही सादर केला की त्याचा खूप परिणाम माङया मनावर झाला. तेव्हाच ठरवलं होतं की, असं काही काम करायला हवं. त्याला आता 12 वर्षे झाली. छोटंमोठं काम करत होते. पण आता दोन वर्षे झाली, कुटुंब-नोकरी सांभाळून काम करतेय, उस्मानाबाद शहर अध्यक्ष आहे.
गावोगावी आम्ही जातो, लोकांना समजावून सांगतो. ही एक कृती चळवळ कशी आहे, आपणच काही कसं करायला पाहिजे हे पटवून देतो.
अलीकडेच आम्ही एक उपक्रम केला. त्याचं नाव होतं, ‘हिंसा के खिलाफ - मानवता की ओर’. त्याअंतर्गत आम्ही चार हजार लोकांकडून पत्रं लिहून घेऊन ती राष्ट्रपतींना पाठवली. ‘दाभोलकर के कातील को कब पकडा जाएगा?’ एवढं एका वाक्याचं पत्र. पण आम्ही बसस्टॅँड ते दवाखाने ते शाळा असं सगळीकडे गेलो. लोकांशी बोललो. त्यांच्याकडून लिहून घेतले. हा अनुभवच वेगळा होता. आपण इतक्या लोकांशी बोलून, त्यांना उपक्रमात सहभागी करून घेत काही करू शकतो यातून खूप आत्मविश्वास मिळाला.
याशिवाय दरवर्षी आम्ही संक्रांतीला एक वेगळा उपक्रम करतो. सणवार जर जगण्याचा भाग असतील तर ते जास्त विधायक पद्धतीनं साजरे करावेत असा हा विचार. म्हणून विधवा-परित्यक्ता यांच्यासाठीही आम्ही तिळगूळ कार्यक्रम करतो. तिथं येणा:या अनेकजणी आपलं मनोगत मांडतात. त्यातून त्यांना आनंद तर मिळतोच, पण त्या सणवारात सहभागीही होतात.
हे सारं करताना मला एवढंच कळतं, की आपण जास्तीत जास्त पॉङिाटिव्ह विचार करत राहायला शिकतो. दुस:यांना समजून घेण्याची वृत्ती तयार होते. समोरच्याची बाजू समजून घेण्याची नजर तयार होते. समाजाला तोडून, चिडून गोष्टी बदलत नाही, तर समजून घेऊन, समजून सांगून, बोलून बदल घडू शकतात, तसंच काम करायला शिकावं लागतं हे सारं मी या प्रक्रियेत स्वत: शिकलेय.
शिकतेय !
- भाग्यश्री वाघमारे उस्मानाबाद
जे बोलू नये, ते बोललं तर?
मी पनवेलला रायगड जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. नवरा अंधश्रद्धा निमरूलन समितीचा कार्यकर्ता. लगAानंतर त्याच्या विचारानं प्रभावित होऊन त्याच्या बरोबरीनं काम सुरू केलं.
पनवेलला राहायला आलो तेव्हा काही समविचारी लोक शोधले, कामाला सुरुवात केली. शिक्षिका असल्यानं लक्षात आलं की, वयात येतानाच्या प्रश्नांविषयी मुलींशी मोकळेपणानं बोलायला हवं. महिला-मुलींशी बोललं तर अंधश्रद्धा, जुनाट रीती हे तोडणं सोपं होईल. मग त्यातून शिक्षिकांसाठीही जागर जाणिवांचा हे शिबिर आम्ही घेऊ लागलो. मुलींशी लैंगिक प्रश्नांसंदर्भात मोकळेपणानं बोलणं होऊ लागलं. आणि लक्षात आलं की, मुलींना हक्कानं बोलण्याच्या दोन जागा असतात. एक म्हणजे, शाळेतल्या बाई आणि दुसरं म्हणजे, घरात आई. त्या दोघींनाही शरीरविज्ञान कळावं, लिंग समभाव, स्त्री-पुरुष समानता हे समजावं म्हणून या विषयावर अधिक काम करायला सुरुवात केली. पाचवी ते सातवीच्या मुली, सातवी ते दहावीच्या मुली, कॉलेजात शिकणा:या मुली, बचतगटातल्या महिला यांच्यासाठी शिबिरं घेऊ लागलो. कॉलेजमधे जोडीदाराची विवेकी निवड यावरही संवाद सुरू केला.
हे सारं काम करताना एक लक्षात आलं की, लैंगिक प्रश्नांवर नुस्तं बोलणंही फार अवघड आहे. त्यावर थेट-स्पष्ट आजही बोललं जात नाही. मुली बोलत नाहीत, कुणाला त्यांना सांगताही येत नाही. त्या अज्ञानातून मग गैरसमजुती आणि शोषण सुरूच राहतं. ज्या समाजाला आजही मुलामुलींमधली मैत्री, प्रेम यातला मोकळेपणा खटकतो, जिथे शिक्षकही काही गैरसमजुती धरून ठेवतात तिथं दृष्टिकोन बदलासाठीच काम करायला हवं. लैंगिक शिक्षणाची तर गरज आहेच, पण मोकळेपणानं संवाद वाढण्याचीही गरज आहे. तो संवाद वाढायला हवा. रुजायला हवा!
- आरती नाईक
पनवेल
मीच जेव्हा ‘डोळस’ झालो.
मी अहमदनगरचा.
पुण्याला एसपी कॉलेजात शिकायला गेलो.
तोर्पयत मी प्रचंड धार्मिक होतो. डॉ. दाभोलकरांचा कट्टर विरोधक होतो. ते चांगलं काम करतच नाहीत अशी समजूत करून घेतली होती. पण एकदा कॉलेजात एक शिबिर झालं, ज्यानं माझी उत्सुकता जागी झाली. मग मी अंनिसच्या कार्यकर्ता मीटिंगला गेलो. तिथे जगण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन समजला आणि माझी नजरच बदलली. प्रश्न विचारून, काय ते तपासून मग स्वीकारण्याचा मार्ग कळला.
आणि तिथून पुढं माझा एक वेगळाच प्रवास सुरू झाला.
माङया घरचं वातावरण नुस्तं धार्मिकच नाही, तर व्रतवैकल्य, कर्मकांड मानणारं. काही अंधश्रद्धा जपणारं. घरी कळलं की मी अंधश्रद्धा निमरूलन समितीचं काम करतोय तर खूप विरोध झाला. इतका की माझं शिक्षण थांबवण्यार्पयत प्रयत्न झाले. पण मी जे स्वीकारलं ते डोळस होतं आणि माङयासाठी विचारांची कमिटमेण्ट रक्ताच्या कमिटमेण्टपेक्षा खूप मोठी होती. मी जे स्वीकारलं तो व्यक्तिविकासाचा विचार आहे हे मला कळून चुकलं होतं. त्यामुळे त्या विरोधातही किंवा विरोधामुळेही मी अधिक घट्टपणो या कामाशी जोडलो गेलो. मी माङया घरच्यांच्या श्रद्धा-उपासनांचा आदर करतो, पण अनिष्ट रूढींविषयी मी बोलतोच बोलतो!
आता मी नोकरी करतोय. दुसरीकडे आमच्या नगर जिल्ह्यात बुवाबाजीच्या भांडाफोडीचंही काम करतोय. अलीकडेच एक माणूस आपण स्वामी समर्थ असल्याचा दावा करत होता. त्याला आणि ज्यांनी त्याला आणलं होतं त्या सगळ्या भोंदूंना आम्ही समाजासमोर उघडं पाडलं.
सध्या आम्ही नगर जिल्ह्यात सामाजिक न्यायाची एक मोहीम चालवतो आहे. ते काम आम्ही तीन वर्षे सातत्यानं करणार आहोत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक अॅट्रॉसिटी केसेस नोंदवल्या जातात. जात व्यवस्थेचं आकलन नसणं, परस्परांविषी दुर्भावना असणं व आकस ही सारी त्यामागची कारणं. त्यातून जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून सरपंच, तलाठी, गावातले नेते यांच्यासाठी शिबिर घेतो. लोकांशी बोलतो. शाळा- कॉलेजात जाऊन तरुण मुला-मुलींशी बोलतो. वयात येतानाचे आकर्षण, शरीरविज्ञान समजावतो. प्रेमप्रकरणं, त्यातून निर्माण होणारी तेढ या सा:यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे काम सोपं नाही, पटकन होणारंही नाही. पण सातत्यानं प्रयत्न करणं तरी आमच्या हातात आहेच.
तेच मी करतोय. करतही राहीन!!
- कुणाल शिरसाठे
अ.नगर
संपर्क करायचाय?
हे सारं वाचून आपणही काहीतरी करावं, असं काम करून पाहावं असं मनात आलं असेल.
आणि मनापासून काही शिकण्याची, डोळसपणो काम करण्याची इच्छा असेल तर आपल्या जवळच्या अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क करता येऊ शकेल.
किंवा अधिक माहितीसाठी
राहुल म्हस्के- 8805047391
युवराज झळके- 9921119993
यांच्याशी संपर्क साधता येईल.