मळणी यंत्र
By admin | Published: January 7, 2016 10:08 PM2016-01-07T22:08:53+5:302016-01-07T22:08:53+5:30
शारीरिक शिक्षण हा दीपांकरचा अभ्यासाचा स्पेशल विषय. आईवडील शेतकरी. अभ्यास सांभाळून शेतात काम करायला जाणं तसं नेहमीचंच.
Next
>दीपांकर दास
इयत्ता बारावी, दिगलीपूर, अंदमान आणि निकोबार बेटं
शारीरिक शिक्षण हा दीपांकरचा अभ्यासाचा स्पेशल विषय. आईवडील शेतकरी. अभ्यास सांभाळून शेतात काम करायला जाणं तसं नेहमीचंच. छोटीमोठी उपकरणं तयार करून शेतीचं काम सोपं कसं होईल, याचे प्रयोगही त्याचे सतत सुरूच. रात्रपहाट एक करून हा मुलगा सतत काहीतरी उपकरणं तयार करण्याच्या प्रयत्नांत हरवलेलाच. त्याची आई रोज पहाटे तीनलाच उठून कामाला लागते. शेतात कामं जास्त असली की तिची धावपळही जास्तच. त्यात दीपांकरला जाणवलं की, सोंगणी, मळणीच्या काळात आईबाबांचं काम जरा जास्तच वाढतं. भाडय़ानं मिळणारी, विजेवर चालणारी मळणी यंत्र त्यांना परवडायची नाहीत. त्यामुळे हातानंच झोडून, मळणी करून डाळी साफसूफ करून पोती भरेर्पयत कामाला पूर. कष्ट अफाट. हे काम कसं सोपं होईल याच्या प्रयत्नात दीपांकरला एक आयडिया सुचली. सौरऊर्जेवर चालणारं मळणी यंत्र बनवलं तर? तो कल्पनेच्या मागेच लागला. वर्षभर तो या यंत्रवर काम करत होता. हिरवे मूग, काळे मूग, चवळी, कुळीथ यांसह भाताची मळणी करू शकेल असं सोलर मळणीयंत्र त्यानं बनवलं.
दीपांकर म्हणतो, ‘आजवर मी खूप लहानमोठी उपकरणं बनवली. पण माझा एक ध्यासच आहे, शेतक:यांचे कष्ट कमी होतील अशी अवजारं मला बनवायची आहेत. माझं विज्ञानाचं ज्ञान प्रत्यक्षात उपयोगात आलं पाहिजे असं मला वाटतं!’