आज फिर जिने की तमन्ना है..हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 05:00 AM2017-10-19T05:00:00+5:302017-10-19T05:00:00+5:30

हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत, हे माहिती नसतं का आपल्याला? मग तरी का असं गृहीत धरतो वेळेला? आणि ती वेळच सरली तर..

Today, there is a desire to live again. These gurudvidas will never be exposed in our lives | आज फिर जिने की तमन्ना है..हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत

आज फिर जिने की तमन्ना है..हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत

googlenewsNext

My favorite things in life don't cost any money. It's really clear that the most precious resource we all have is time.
- हे वाक्य द ग्रेट
स्टीव्ह जॉब्जचं.
तोच तो,
ज्याच्या अ‍ॅपलचे
आपण दीवाने आहोत..
हा स्टीव्ह जॉब्ज सांगतो की,
माझ्या आयुष्यातल्या
सगळ्यात आवडत्या,
मोलाच्या वस्तूंना
काही पैसे नाही लागत..
आणि त्यातली
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ !
आपण करतो का कदर?
स्वत:ची? स्वत:च्या वेळेची?
वेळेच्या नावानं बोटं मोडतो..
कधी वेळच पुरत नाही म्हणतो..
कधी मेरा वक्त ही खराब है म्हणतो,
कधी म्हणतो,
नशिबानं काय वेळ
आणली पहा माझ्यावर..
कधी म्हणतो,
इक दिन मेरा भी वक्त आयेगा,
फिर एक एक देख लूंगा..
आठवून पहा, आपले तमाम डायलॉग..
मात्र या साºयात
एक महत्त्वाचं वाक्य
आपण विसरून जातो,
जो वक्त की कदर नहीं करता,
वक्त उसकी कदर नहीं करता..
किती खरंय हे!
आपण का वेळ/काळाला
असं गृहीत धरतो..
एकतर काल काय झालं
याचा विचार करत बसतो
नाहीतर उद्या काय होणार
याची चिंता करत बसतो..
आणि आज?
आजवर कधी प्रेम करतो आपण?
आज वायाच घालवतो..
नुस्त्या विचारांच्या भुश्यात
पुरून टाकतो आज,
आजच्या दिवसातली ऊर्जा,
कामासाठी आवश्यक वेळ..
आपण या दिवाळीत
विचारू स्वत:लाच..
मी घाबरतोय का आजला?
आज काही करायचं म्हटलं की,
पोटात खड्डा पडतो का आपल्या?
शेवटचं कधी भिडलो होतो
आपण ‘आज’ला?
आपल्या चालूू वर्तमान काळाला?
जे ठरवलं ते आजच करू,
आत्ता करून टाकू पटापट
हे असं का वाटत नाही आपल्याला?
घरात पसारा पडलाय,
आवरू नंतर,
चहाचे कप वाळत पडलेत
विसळू नंतर..
व्यायाम?
करू उद्या सकाळपासून!
पहाटे उठायचंय?
उद्यापासून!
कॉलेजात वेळेवरच पोहचायचंय
तेही उद्यापासून!
सगळा अभ्यास मन लावून करायचाय,
तोही उद्यापासून!
कुणीतरी दुखावलंय आपल्यामुळे,
सॉरी म्हणायला हवं,
आजच?
म्हणतो आपण?
नाही.
सांगतो, स्वत:ला उद्याबिद्या म्हणू..
हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात
कधी उजाडणारच नाहीत,
हे माहिती नसतं का आपल्याला?
मग तरी का असं गृहीत धरतो वेळेला?
आणि ती वेळच सरली तर..
त्यापेक्षा आज आत्ता,
थेट ‘आज’ला भिडू,,
आणि या दिवाळीत सांगू स्वत:ला,

आज फिर जिने की तमन्ना है..

Web Title: Today, there is a desire to live again. These gurudvidas will never be exposed in our lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.