मनाच्या आजारावर मायेचे उपचार
By admin | Published: January 29, 2016 01:27 PM2016-01-29T13:27:30+5:302016-01-29T13:27:30+5:30
जे स्वत:सह आपलं कुटुंब, घरदार विसरले त्या माणसांना पुन्हा ‘शहाणं’ करणारी तरुणांची एक संस्था
Next
>अहमदनगरमधल्या अमृतवाहिनी संस्थेचं काम करणा:या तरुण दोस्तांची धडपड.
राहुरी बसस्थानक़ सकाळची वेऴ प्रत्येकाची बसमध्ये चढण्याची लगबग़ बस भराभर भरतात आणि आल्या वेगाने निघून जातात़ तेथेच एका कोप:यात तिशीतली एक वेडसर बाई बसलेली़ अंगावरचे कपडे काळेकुट्ट मळालेले आणि फाटलेल़े दोन मुले तिला बिलगलेली़ एकाचा कान फुटलेला, तर दुस:याच्या पाय जखमांमुळे सडलेला़ त्या जखमांवर माशा घोंगावतात़ त्यांचा उग्र वास सुटलेला़ पंचविशी ओलांडलेला एक तरुण हे दृश्य पाहतो़ त्याला त्या बाईची कीव येत़े तो तिला मित्रांच्या मदतीने रुग्णालयात नेतो़ उपचार करतो़ दवाखान्याच्या बिलासह सर्व खर्च स्वत: करतो़ महिलेसह दोन्ही मुलं ठणठणीत होतात़ नंतर त्या महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर तो या मायलेकरांना पोहोचवतो़ सिनेमात शोभावा असा हा प्रसंग दहा वर्षापूर्वी घडला़ हीच घटना बेवारस मनोरुग्णांसाठी काम करण्याची प्रेरणास्नेत बनली आणि सुरू झाली अमृतवाहिनी!
अहमदनगरमधील तरुणांनी बेवारस मनोरुग्णांसाठी सुरू केलेली अमृतवाहिनी ही संस्था़ या संस्थेत सध्या वीस मनोरुग्ण आहेत़ दिलीप गुंजाळ नावाच्या एका तरुणाच्या प्रय}ानं हे काम सुरू झालं. समाजकार्य या विषयात शिक्षण घेत असताना नगरमधीलच करंदीकर बालसदनमध्ये नोकरी करून त्यानं कौटुंबिक जबाबदारी पेलली़ नोकरी करीत असताना साईबाबांच्या दर्शनाला चाललेल्या दिलीपला राहुरी बसस्थानकात एक मनोविकलांग महिला दिसली़
प्रत्येकजण नाक दाबून, मार्ग बदलून निघून जात होता़ पण तिला जेवण्यापुरते पैसे देण्यासाठी खिशात घातलेला हात तसाच रिकामा बाहेर काढला़ आणि मित्रंच्या मदतीने त्या मायलेकरांना रुग्णालयात दाखल केल़े स्वखर्चाने तिघांवरही उपचार केल़े महिलेसह दोन्ही मुले ठणठणीत झाली़ त्या महिलेने सांगितलेल्या तिच्या घरी दिलीप त्यांना घेऊन गेला़ तिच्या कुटुंबासाठी हा सुखद धक्का होता़ पण या महिलेसारख्या अनेकांचं काय होत असेल असा प्रश्न दिलीपला पडला आणि त्यानं मनोरुग्णांसाठी काम करण्याचा संकल्प केला़ ‘अमृतवाहिनी’ संस्थेची सुरुवात अशी राहुरी बसस्थानकावर झाली़ 2क्क्6 साली भाडय़ाच्या खोलीत शाळकरी मुले, समाजसेवेची आवड असणा:या मुलांना सोबत घेऊन दिलीपचे काम सुरू झाल़े याच तरुणाईने आतार्पयत 1क्8 मनोविकलांग रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबात पोहोचविल़े
अमृतवाहिनीच्या माध्यमातून दिलीप गुंजाळ, सिराज शेख, रवींद्र कानडे, बाळू घुंगरे, विशाल गायकवाड, डॉ़ संदेश बांगर, डॉ़ अनय क्षीरसागर, पंचशीला बागुल, महादू सोनवणो, आकांक्षा ढोरजकर, प्रीती बनसोडे, सागर विटकर हे मनोरुग्णांच्या संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचे काम करत आहेत.
मनोरुग्णाची माहिती मिळाल्यानंतर किंवा संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर अमृतवाहिनीची रेस्क्यू टीम संबंधित पोलीस ठाण्याला लेखी कळवितात़ त्या मनोरुग्णाला संस्थेत दाखल करून त्याच्यावर उपचार करतात़ उपचारादरम्यान समुपदेशनही केले जात़े ती व्यक्ती सामान्य जीवन जगू लागल्यानंतर हळूहळू त्याच्याकडून त्याच्या नातेवाइकांची, कुटुंबाची माहिती काढून घेतली जात़े पुन्हा सुरू होतो त्याचे घर शोधण्याचा प्रवास़ कधी हा प्रवास नगर शहरातच संपतो, तर कधी हा प्रवास कर्नाटक, बिहारच्या खेडय़ापाडय़ात जाऊन थांबतो़ त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबात पोहोचविले जात़े तो रुग्ण कुटुंबात परतल्यानंतरही दोन वर्षार्पयत त्या व्यक्तीला गरजेनुसार औषधे पुरविण्याची जबाबदारी संस्था घेत़े
नागापूर एमआयडीसीच्या सह्याद्री चौक परिसरातील आनंदनगरमध्ये अमृतवाहिनी संस्थेचे कार्यालय हे मनोरुग्णांचे हक्काचे निवास झाले आह़े
- साहेबराव नरसाळे
सहायक उपसंपादक, लोकमत, अहमदनगर