एक त्रिकोणी वर्तुळ

By admin | Published: August 6, 2015 04:29 PM2015-08-06T16:29:53+5:302015-08-06T16:29:53+5:30

त्या वर्तुळाला कुठलीच शेवटची बाजू नसते. काही व्याख्या नसते, काही अर्थ नसतो. तरी ते असतं. आणि ते असतं म्हणून आपण असतो! त्या दोस्तीला काय म्हणतात.

A triangle circle | एक त्रिकोणी वर्तुळ

एक त्रिकोणी वर्तुळ

Next
मैत्री..
किती लहान शब्द आहे ना हा? बघा ना, दोनच अक्षरं आहेत. पण अर्थ?
बापरे.. ह्या ‘मैत्री’चा अर्थ सांगणं आणि शोधणं ह्यापेक्षा तो मित्रच्या संगतीनं ‘अनुभवणं’ सोप्पं! 
कधी कधी एका मित्रमुळे अर्थ सापडतो, तर कधी कधी ‘मित्रंमुळे’!  आम्हाला विचारलं ना एखाद्या आमच्याहून मोठय़ा वयाच्या माणसाने, ‘काय रे बाबा? तुझा बेस्ट फ्रेंड कोण? मग आम्ही फार वेळ विचार करून एक नाव घेतो आणि मग आम्ही बेस्ट फ्रेण्डची लिस्टच सांगणं सुरू करतो. फ्रेण्डपासून सुरुवात होते आणि जमतात बेस्ट फ्रेंड्स. 
आणि मग तयार होतो एक ग्रुप ज्याला मी नेहमीच ‘त्रिकोणी वर्तुळ’ म्हणतो! डोण्ट वरी, पुढे त्रिकोणी वर्तुळाचा अर्थ कळेलच.. !
तर शहरात आलो.. नवीन कॉलेज, नवीन शहर.. स्वत:शिवाय कुणालाच ओळखत नव्हतो.. माङया सारख्याच प्रश्नांना घेऊन एकाने मैत्रीचा हात पुढे केला.. त्याने माङया आधी हिंमत दाखवली आणि शिकवलीसुद्धा!  त्यातून मी एक मोठं कधीच न तुटणारं त्रिकोणी वर्तुळ बनवू शकलो. त्याच त्रिकोणी वतरुळात शिकू लागलो. रमू लागलो. इतकंच नाही तर जगूही लागलो. 
त्यात दोन प्रश्नांची उत्तरं कधीच मिळाली नाही. एक म्हणजे, कधी वेळ गेला आणि का वेळ गेला? ग्रुपसोबत तासन्तास चहा-टपरीवर बसणं. गप्पा रंगलेल्या असताना आपण किती चहा पितोय याचं भान नसणं. शास्त्रीय संगीताच्या मैफलीत मस्त सगळ्यांनी अत्तर लावून, झब्बा पायजमा घालून जाणं, समेवर एकमेकांकडे बघून दाद देणं. कविता, गझल कार्यक्रमात कुठे एखाद्या मुलीचं नाव आलं की अमुक अमुक नावानं त्याला चिडवणं. त्यानंतर जिलेबी खायला जाणं, एकमेकांना उगीचच प्रेमाच्या गोडव्याहून कमी गोड जिलेबीचा आग्रह करणं. मग त्या निमित्ताने समोरच्याच्या शरीराला पुसणं..
 हा हा हा ! किती सांगू किती नाही! 
फक्त जगणंच ना हे, दुसरं काय! जगण्याला जशी काहीच व्याख्या नसते अगदी तसंच आहे या ग्रुपमधल्या मैत्रीचं! ही मैत्री तशी बघायला गेले तर काहीच नसते पण भरपूर काही असतेसुद्धा! ती इतकी सुंदर असते की, ग्रुपमध्ये कुणालाच एकमेकांना कधीच सांगावं लागत नाही, ‘मित्र तू माझा फार चांगला मित्र आहेस आणि असाच कायम माझा मित्र रहा’ असं जर कुणी म्हटलंच तर पटकन त्याचा गाल प्रेमाने लाल केला जातो. आणि मग गालाचा प्रेमाचा रंग लालच दिसणार की हो! 
या ग्रुपमधल्या मैत्रीला कधी ‘अहंकाराचा’सुद्धा ‘मोह’ नसतो! 
हेच मित्र बर्थडे बॉयला रात्री बारा वाजता ज्या एक्साईटमेण्टमधे विश करायला जातात ना तेवढय़ाच काळजीने कुणाचा अॅक्सिडेण्ट झाला किंवा कुठे कुणाचा प्रॉबेल्म झाला की जातात. हा ग्रुप, ही मैत्री, हे त्रिकोणी वर्तुळ जोडले जाते, कधीच न तुटण्यासाठी!
कॉलेजनंतर सगळे आपआपल्या मार्गावर जरी गेले तरी महिन्यातून एकदा न चुकता एकमेकांना प्रेमाचे चार शब्द (म्हणजे खरं शिव्या) ऐकवायला आवर्जून भेटतात.
त्यांच्या स्वभावापासून सिगारेटच्या ब्रॅण्डर्पयत काहीच बदललेलं नसतं. म्हणूनच मी ह्या ग्रुपला ‘त्रिकोणी वर्तुळ’च म्हणतो. ज्या त्रिकोणी वर्तुळाला कुठलीच शेवटची बाजू नसते. या त्रिकोणी वर्तुळाला कधीच व्याख्या, अर्थ नसतो. या त्रिकोणी वर्तुळाला माहीत असतं संभाव्य मित्रंना मैत्रीच्या नावानं जगवणं.
आणि ती मैत्रीच खरंतर जगवत राहते. जगण्याला आनंदाचे अवसर देत..
म्हणून सांगतोय, जपा. जपा आपल्या त्रिकोणी वर्तुळाला!
- ओजस कुलकर्णी

 

Web Title: A triangle circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.