ट्रोलधाड

By admin | Published: April 14, 2016 06:04 PM2016-04-14T18:04:59+5:302016-04-14T18:04:59+5:30

इतरांना ऑनलाइन पिडणारी एक टोळधाड, जी स्वत:ला बुद्धिमान आणि ‘मत’वाले समजण्याचा आभास जगतेय!

Trolleyhead | ट्रोलधाड

ट्रोलधाड

Next
>ट्रोल.
सध्या जगभरात हा शब्द हैदोस घालतो आहे. ऑनलाइन जगात कुणाला तरी घेरून त्याची यथेच्छ टवाळी करणं म्हणजे हे ट्रोल किंवा ट्रोलिंग!
पूर्वी ज्या कुचाळक्या आपापसात चालायच्या त्या आता ऑनलाइन चालतात. एखाद्याला घेरून त्याची टर उडवणं, अपमान करणं, टोमणो मारणं आणि धमक्याही देणं हे सारं या ट्रोलमध्ये सर्रास होताना दिसतं आहे.
अलीकडेच विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्यासंदर्भातलं हे टोकाचं ट्रोलिंग आपण सगळ्यांनीच पाहिलं. पाचकळ जोक्स व्हायरल करून त्या ट्रोलिंगला हातभारही लावला. सलग दोन-तीन दिवस अत्यंत ओंगळपणो मेसेजेस आपणही सहज गंमत म्हणून व्हायरल करत होतो.
अर्थात हा झाला एक टप्पा. पण ट्विटरवर हॅशटॅग लावून लावून एखाद्याला घेरणं किंवा फेसबुकवर त्याच्या पोस्टवर किंवा टाइमलाइनवर सतत वाद घालणं, शेरे मारणं हे हल्ली सर्रास होतं आहे.
एखादाच खमका विराट कोहली भेटतो आणि तो एकाच शब्दात, एकाच शॉटमध्ये या सा:या ट्रोलधाडीला गार करतो. पुरून उरतो आणि आरसाही दाखवतो.
पण सामान्य आयुष्यात आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर, फेसबुकवर जेव्हा अनेकजण असे कॉर्नर होत या सा:या ट्रोलिंगला बळी पडतात, तेव्हा जो मनस्ताप होतो, आत्मविश्वास कमी होतो आणि बदनामी होते त्याला आजच्या ऑनलाइन जगातली कुचाळखोर वृत्तीच जबाबदार आहे.
त्या कुचाळखोर वृत्तीनं इतरांना पिडणं हा झाला एक भाग. पण दुसरा भाग म्हणजे, जी माणसं असं करतात ते स्वत:ला  ऑनलाइन जगात (इतरांपेक्षा) बुद्धिमान समजत असतात. आपल्याला ‘मतं’ आहेत, ती आपण सतत व्यक्त करत राहिलं पाहिजे, आणि आपली ती मतं इतरांनी मान्यच करायला पाहिजेत हा त्यातला दुराग्रहही!
या सा:यातून, दुस:याला छळण्या-पिडण्याच्या मनोवृत्तीतून जे जन्माला येतं ते हे ट्रोलिंग.
आज दुसरे त्या जात्यात भरडले जात असतील, तर आपण सुपात आहोत, हे नक्की!
 
- ऑक्सिजन टीम
 
 
 

Web Title: Trolleyhead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.