सच्चे.कच्चे.थोडासा बचके.

By admin | Published: January 2, 2015 03:09 PM2015-01-02T15:09:06+5:302015-01-02T16:17:05+5:30

सच्चे.कच्चे.थोडासा बचके.

True. | सच्चे.कच्चे.थोडासा बचके.

सच्चे.कच्चे.थोडासा बचके.

Next

 ‘ऑक्सिजन’ला या प्रवासात ‘वेगळं’ काय दिसलं?

सच्चे.कच्चे.थोडासा बचके.
पराकोटीची ऊर्जा. बेधडकपणा आणि सळसळता उत्साह. सुपीक डोकी, त्या डोक्यात दुनियाभरची लेटेस्ट माहिती. एकदम लॉजिकल बोलणं, अभ्यासात कसूर तर नाहीच पण खेळातही आघाडी. मुलंमुली असा काही भेदही दिसत नाही फारसा डोक्यात उलट दोस्तीच जास्त.
आकर्षण वाटलं परस्परांविषयी तर ते ही खुलेआम सांगण्याची तयारी या मुलामुलींमधे दिसते हे विशेष.
अशा या तारुण्याच्या उंबरठय़ावर उभ्या मुलामुलींशी  गप्पा खूप झाल्या, काही जाहीर, काही गूपचूप, काही सगळ्यांदेखत, काही गुपचूप एकदम ‘कोपचेमें’वाल्या.
त्या गप्पांत कसे दिसले हे मुलं-मुली हे सारं या अंकात मांडलं आहेच, कुठलीही भूमिका न घेता, जजमेण्टल न होता, ब:यावाईटाचे डोस न पाजता, जे दिसलं ते मांडलंय.
तरीही काही ‘लक्षणं’ मात्र इतर तरुण मुलांपेक्षाही खूप वेगळी, धास्तावणारी आणि सुखावणारीही दिसतात. ती कुठली?
 
 बेधडक आणि कॉन्फिडण्ट.
खरं सांगायचं तर छाती दडपून जाते त्यांच्याशी बोलताना. त्यांची निरीक्षण अफाट आहेत, त्यांना कुणी उल्लू बनवू शकतेल असं नाही. कारण बोलताना तेच अनेकदा म्हणतात, मुद्दयाचं, थोडक्यात आणि प्रॅक्टिकल बोला.
ते प्रॅक्टिकल आहेत आणि तितकेच बेधडकही. पण यासा:यात ते हट्टी होत चालले आहेत का, असं वाटावं इतकी काही मुलं आपल्या मतांविषयी आग्रही दिसतात.
त्यामुळे त्यांच्या डोक्यात कन्फ्यूजन कमी आहे. एकदम क्लिस्टर क्लियर विचार, जे हवं ते मिळवण्याची धडपड आहे. वयासोबत असलेल्या इनोसन्सलाही एक व्यवहाराची जाणीव आहे असं वाटतं. 
 
जी लो लाईफ नावाचा अॅटिटय़ूड.
ही मुलं अभ्यास करतात, मनापासून, जागजागून करतात आणि घरच्यांना सांगतातही की, तुम्हाला हवे तेवढे मार्क्‍स आणून दिलेत ना, मग आता मला मजा करू द्या, डिस्टर्ब करू नका.
पाटर्य़ा, सेलिब्रेशन यांची एक प्रचंड क्रेझ अनेक मुलामुलींमधे दिसते.
 
घरवाले बोअरिंग, घरकाम नकोच.
या क्रायसिसमधे अडकलेली अनेक मुलं भेटली. अनेकांना आईनं कुठलंच काम सांगितलेलं आवडत नाही. दळण आणणं, घरं झाडणं, झाडांना पाणी, भांडी आवरणं, चहा करणं, कपडय़ांच्या घडय़ा, इस्त्री करणं, दुकानातून सामान, भाजी आणणं यासारखी तमाम कामं हल्ली आया मुलांना सांगत नाही, कारण ते करत नाही, भांडणं होतात. मुळात मुलांना काहीच काम करायलाही नको असतं, त्यात घरचे ( कितीही स्मार्ट असले तरीही) अनेकांना बोअरिंग वाटतात. ते जाम पिडतात, कामं सांगतात, सूचना करतात असाच अनेकांचा ठाम समज.

Web Title: True.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.