टीशर्टचा उद्योगबिद्योग

By admin | Published: August 27, 2015 06:12 PM2015-08-27T18:12:19+5:302015-08-27T18:12:19+5:30

‘हा नुसता फोटो काढत बसतो, चित्रे काढतो, दिवसेंदिवस कॅलिग्राफीची अक्षरे गिरवत बसतो. अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही.’अशी तुमच्याबद्दल

Tshirt's industry | टीशर्टचा उद्योगबिद्योग

टीशर्टचा उद्योगबिद्योग

Next

 ऑनलाइन साइट्सच्या मदतीनं उभं राहणारा एक नवा टीशर्ट बिझनेस!

 
‘हा नुसता फोटो काढत बसतो, चित्रे काढतो, दिवसेंदिवस कॅलिग्राफीची अक्षरे गिरवत बसतो. अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही.’ 
- अशी तुमच्याबद्दल तक्र ार केली जात असेल तर तुम्ही आता घरबसल्या पैसे कमवू शकता. तेही भांडवलाविना..
आता प्रगत तंत्रज्ञानामुळे उत्तम दर्जाचे कॅमेरेही आपल्या हातामध्ये येत आहेत. कधीकधी एखादे चांगले वाक्य आपला सहकारी बोलून जातो किंवा आपल्याही तोंडून नकळत एखादे चांगले वचन बाहेर पडते. तेव्हा वाटतं की हे वाक्य टी-शर्टवर छापण्याच्या लायकीचे आहे. पण आपण काहीच करू शकत नाही. आता मात्र तुम्ही काढलेली छायाचित्रे, तुम्हाला आवडलेले संदेश, कॅलिग्राफी टीशर्टवर छापून ते विकताही येऊ शकतात. तुम्ही घरबसल्या तुमच्या छंदावर आधारित एका स्टार्टअप उद्योगाचे मालकही होऊ शकता.
फ्रीकल्चर, जॅक ऑफ ऑल थ्रेड्स अशा कंपन्यांच्या माध्यमातून टी-शर्टची निर्मिती तसेच त्याची ऑनलाइन विक्र ी करणो अत्यंत सोपे झाले आहे. आपण काढलेला एखादा फोटो, चित्र किंवा संदेश कंपनीला पाठवायचा, ते छापलेल्या टी-शर्टचे मूल्यांकन करायचे आणि नंतर त्याची विक्री झाल्यावर नफा मिळवायचा इतकी साधी ही कल्पना आहे.
टी-शर्टचा ऑनलाइन स्टार्टअप कसा असतो..
काही ऑनलाइन कंपन्या तुम्ही बनवलेले टीशर्ट विकून देतात. त्यापैकी एखाद्या कंपनीशी ऑनलाइन संपर्क करावा लागेल. त्यानंतर तुम्ही तयार केलेले टी-शर्टचे डिझाइन किंवा फोटो पाठवायचे. त्यानंतर या टीशर्टच्या विक्र ीसाठी एक उद्दिष्ट ठरवायचे. आपण ठरविलेल्या किमतीमधून टीशर्टचे उत्पादनमूल्य वगळून आपल्याला नफा दिला जातो. 
शिकत असताना जरा डोकं लढवून पैसे कमवण्याचीच ही एक नवी उद्योजकता आता तरुणांमधे मूळ धरते आहे. ब:याचदा आपल्या कार्यालयाची, कॉलेजची किंवा ट्रेकिंग वगैरेच्या ग्रुप्सची विशेष ओळख सांगणारे शर्ट्स बनविले जातात. त्यासाठी आता असे पर्सन्लाईज्ड शर्ट बनवले जातात. त्यातून ही एक नवीनच उद्योजकता आता आकार घेते आहे.
कसं चालतं हे काम?
  ऑनलाइन शर्ट विक्री करणा:या वेबसाइटला तुम्ही काढलेले फोटो पाठवा.
 फोटो किंवा डिझाइनमध्ये बदल करण्यास मदत हवी असल्यास तीसुद्धा तिथे मिळू शकते.
 त्यानंतर विक्र ीचे उद्दिष्ट ठरवा. उदा. पन्नास शर्ट्स. आपल्या शर्ट्सची किती विक्र ी होऊ शकते हे लक्षात घेऊनच उद्दिष्ट ठरवा.
 विक्रीचा कालावधी ठरवा. यामध्ये तुम्ही एक आठवडा, दोन आठवडे असा कालावधी निवडू शकता. त्या कालावधीतच ग्राहकांना शर्ट खरेदी करता येतात.
 यापुढच्या टप्प्यात शर्टची किंमत ठरवता येते. म्हणजे शर्ट बनवायला किती खर्च येणार आणि विकत घेणारे त्यापायी किती पैसे मोजू शकतील याचा अंदाज घ्यायचा. फार स्वस्त नाही, फार महाग नाही अशी किंमत ठरवली तर खर्च वजा जाता उरलेले पैसे तुमचा नफा.
 पण अपेक्षित शर्ट विक्री झालीच नाही तर? अशा शंका मनामध्ये येऊ शकतात. पण येथे हा धोका नाही. कारण ऑर्डर आल्याशिवाय कंपनी त्याचे उत्पादनच करत नाही. त्यामुळे कोणाचेच नुकसान होत नाही. कदाचित आपण दिलेल्या फोटोपेक्षा किंवा नक्षीपेक्षा आणखी चांगले काहीतरी आपण पुढच्या वेळेस द्यायला हवे, हे शिकण्याची उत्तम संधी त्यामुळे मिळेल.
* लोकांपर्यंत शर्ट्स कसे जातात? ऑनलाइन शर्ट्सची ऑर्डर आल्यानंतर त्यांचे उत्पादन करून कंपनीच ते शर्ट ग्राहकांच्या घरी घरपोच पोहोचवते. फक्त ते पोहोचविण्याचा कालावधी ग्राहकाच्या अंतरावरून आणि कंपनीच्या नियमानुसार बदलू शकतो. तरीही दोन आठवडय़ांच्या आत शर्ट्स पुरविण्याचा कंपन्या प्रयत्न करतात.
 ऑनलाइन विक्र ी करून तुम्ही शर्ट्स विकले म्हणजे इन्कम टॅक्सचा तुमच्याशी संबंध येणार नाही असे मात्र नाही. या व्यवहारातून मिळालेले पैसे तुम्हाला आयकर खात्याला कळवावेच लागतात. कंपनीने मिळविलेल्या नफ्याबाबतचा कर भरायचे कंपनी पाहून घेईल.
तुमचा स्वत:चा ब्रॅण्ड
तुमच्या फोटोज्ना आणि तुमच्या टीशर्ट्सना मागणी येऊ लागली की तुमचे नावही आपोआपच प्रसिद्ध होऊ लागेल. तुमच्या चाहत्यांमध्ये तुमचा स्वत:चा असा एक ब्रॅण्ड  निर्माण होऊ शकतो. हे सगळे केवळ तुमच्या कलेच्या जोरावर आणि कौशल्यावर अवलंबून आहे. तुमच्या शर्ट फॅन्स क्लबचे एक पेजही तयार करता येईल. तुमचे नवे फोटो, नवी डिझाइन्स त्यावर टाकून त्याची जाहिरात होईल. आणि चाहत्यांमुळे नेहमीचे ग्राहकही तयार होतात.

Web Title: Tshirt's industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.