तेवीसाव्या वर्षीची अक्कल

By admin | Published: June 25, 2015 02:39 PM2015-06-25T14:39:21+5:302015-06-25T14:39:21+5:30

50-55 टक्केवाल्यांच्या सिक्रेट जगात काय चालतं, हे ‘ऑक्सिजन’च्या मागच्या अंकात आपण डोकावून पाहिलं! मात्र प्रचलित शिक्षण पद्धतीवर विश्वास नसलेले आणि स्वत:चं स्वत:च शिकलेले हे दोन दोस्त सांगताहेत, त्यांची शाळेबाहेरच्या शाळेतली गोष्ट..

Twenty-three year old common sense | तेवीसाव्या वर्षीची अक्कल

तेवीसाव्या वर्षीची अक्कल

Next

ती मला शाळा-कॉलेजच्या बाहेरच तर मिळाली!

 
अपूर्वा फडणीस
 
 
स्वत:विषयी लिहिण्याची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. कारण माझं क्वॉलिफिकेशन या जगाच्या एलिजीबिलिटी क्रायटेरियात बसणारं कधी नव्हतंच! आता ते तसं का नव्हतं याचं उत्तर मला माङया 23 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात उलगडत गेलं,  आणि आता शिक्षण संपल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं.
शाळेत असताना माझी ‘शालेय प्रगती’ यथातथाच होती. याचं कारण मला अभ्यास न आवडण्यापेक्षा तो शिकवला जाण्याची पद्धत आणि करून आणि करवून घेण्याची पद्धत कधी आवडलीच नाही.
शाळेत जाणं हा दिनचर्येचा एक भाग आहे या पलीकडे त्याचं माङयालेखी काहीच महत्त्व नव्हतं.
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम आणि तो शिकविण्याची पद्धती हा सबंध शिक्षण संस्थेचा जीव असतो. अभ्यास ही एक प्रक्रिया असते ज्याची परीक्षा ही सीमा असू शकत नाही, या गोष्टीचा उलगडा मला महाविद्यालयीन जीवनात झाला. ‘अभ्यास’ या शब्दाचा अर्थ आणि प्रत्यय आपल्याला शालेय शिक्षणात येतच नाही असं मला वाटतं.
अभ्यास करणं अथवा शिकवणं याचा अर्थ म्हणजे एखादा विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करणं, त्याच्याशी संबंधित संदर्भ शोधणं, त्याविषयी चर्चा करणं आणि त्यातून प्रश्न निर्माण करून ते सोडवणं असा होतो. पण यातलं माङया आयुष्यात कधीच काही घडलं नाही आणि ते ज्या ठिकाणी घडलं तेच माङो खरे विषय आणि खरं शिक्षण होतं.
मला पाचवी-सहावीपासून पक्षिनिरीक्षणाची गोडी लागली. दर आठवडाअखेर अथवा कधी कधी ‘शाळा’ बुडवून जंगलात पक्षिनिरीक्षणासाठी मी जायचे. बाबांनी त्याकरिता मला फिल्ड गाइडही घेऊन दिलं होतं. ते पुस्तक, गळ्यात दुर्बीण आणि हातात डायरी हाच माझा कायम अवतार असायचा. जंगलात बसून निरीक्षण करणं, डायरीत त्याची छोटी-छोटी चित्रं काढणं, निरीक्षणं लिहिणं, पक्ष्याचा रंग, एका पक्ष्याचे अनेक प्रकारचे आवाज, उडायची पद्धत, विणीचा काळ अशा सगळ्या गोष्टींची नोंद त्या डायरीत व्हायची. घरच्या अंगणात घरटं केलेल्या पक्ष्यांच्या सवयी पाहायच्या असं सगळं दिवस-दिवसभर बसून करणं हाच माझा अभ्यास असायचा. अभ्यासाच्या टेबलवर पुस्तकांच्या बाजूला कायम दुर्बीण आणि डायरी असायची. दरवर्षी नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागात मी पक्षिमोजणी करता पक्षितज्ज्ञांबरोबर जायचे. गिधाडांच्या कमी होणा:या संख्येवरून त्यांच्याकरिता केलेल्या संवर्धनाच्या प्रकल्पात दोन ब्रिटिश शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधीही मला मिळाली.
त्याशिवाय मी टेबल टेनिसही खेळायचे. राज्यस्तरीय पातळीवर संघाचं प्रतिनिधित्व करायचे. दहा वर्षे मी झोकून देऊन टेबल टेनिस खेळले. त्याशिवाय गिर्यारोहण, स्विमिंग, सायकलिंग या गोष्टीही मी आपणहून आणि आवडीने करायचे.
आठवीत असताना मी नाशिकमधल्या ‘साहस’ या अॅडव्हेंचर ग्रुपमध्ये व्हॉलिंटिअर म्हणून काम करायचे. त्यात रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, जंगल ट्रेक, कथाकिंग, आर्चरी (धनुर्विद्या), रायफल शूटिंग या सगळ्या अॅक्टिव्हिटीज कंडक्ट करायचे. यात मुलांची जबाबदारी घेणं, प्रतिनिधित्व करणं या सगळ्या गोष्टी शिकणं हे माङया दृष्टीने खरं आणि महत्त्वाचं शिक्षण होतं. आठ वर्षे मी या संस्थेबरोबर काम केलं.
या सगळ्या गोष्टी करताना, शिकताना, अनुभवताना जे शिक्षण, वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची क्षमता देऊन गेलं ते मला शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात आणि त्यातून आलेल्या ‘शैक्षणिक प्रक्रियेत’ कधीच अनुभवता आलं नाही.
आज माझं वय 23 आहे. या काळात मी खूप काही वेगळं अचिव्ह केलं नसलं तरी त्या दृष्टीने प्रवास करण्याची तयारी आणि त्याकरिता लागणारी विचारांची बैठक ही नक्कीच संपादन केल्याचा मला आनंद आहे.
माझं म्हणणं एवढंच की, रूढ शिक्षण पद्धतीतून आणि मार्काच्या स्पर्धेतून किंवा किती टक्के मिळाले यातून हे सारं मिळत नाही!
- अपूर्वा फडणीस
 
 
शिकायचंय का? - बरंsss!
 
बारावीनंतर  वेडा  झालो होतो मी!
 
 
का जायचं शाळेत? अरे शिक्षण घ्यायला. अच्छा? बरं कसलं शिक्षण घ्यायला? अरे जे विषय दिलेयत ते अभ्यासायला. का शिकायचं? अरे वेडय़ा मोठ्ठं व्हायला.. 
बरं पण मग मोठ्ठं का व्हायचं? आणि मोठं होणं म्हणजे काय? ह्याचीच उत्तरं शोधत गणित, विज्ञान, इतिहास ह्यांची कोडी शोधायची राहून गेली. पाचवी ते दहावी रोज पाच तास शाळा, तीन तास क्लास. मग अकरावी-बारावीमध्ये परत 6 ते 7 तास क्लास. इतकी र्वष प्रत्येक शिक्षकाने अभ्यासक्रम शिकवला. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र शिकवलं; पण ते मी का शिकावं हे मात्र कधी सांगितलं नाही, त्याचं शिक्षण कधी दिलं नाही. 
हे विषय दिलेत ना आम्ही ठरवून म्हणून तुम्ही ते शिकायचे हा नियम.  जो दिलाय तो अभ्यास करायचा, हीच शिस्त. 
या सो कॉल्ड शिक्षणाचा आणि मुलांमधल्या सिन्सिअॅरिटीचा मला प्रचंड राग येतो. मी तर म्हणोन की या  98 टक्के, 99 टक्के मिळवणा:या मुलांपेक्षा मी नक्कीच शैक्षणिक वर्षात जास्त उत्तरं सोडवली असतील. फरक इतकाच की, त्यांनी दिलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आणि मी तो का करावा ह्याचा अभ्यास करत होतो. ते एका जागी मन लावून बसणं, चेह:यावर सिन्सिअर असल्याचे भाव आणत गंभीर बोलणं, सतत करिअरबद्दल माहिती मिळवणं हे मला कधीच जमलं नाही. इंजिनिअर किंवा डॉक्टर का व्हायचं? त्यासाठी जास्तच अभ्यास का करायचा? त्यात जास्त अभ्यास करून हव्या त्या कॉलेजला अॅडमिशन मिळवण्यासाठी झटायचं. अॅडमिशन मिळाल्यावर चार र्वष शिव्या घालत, फ्रस्ट्रेशन सहन करत, कुठेतरी मनाला मारून, फॉर्मल कपडे घालून इतकी र्वष घासून पुन्हा का सज्ज व्हायचं? - हे प्रश्न मला फारच त्रस देतात. 
मग करिअर ह्या विषयावर सेमिनार सुरू झाले. एकदा वाटायचं आयला!! मरिन इंजिनिअर लय भारी, पण वाटायचं न्यूरो सजर्न त्याहून भारी.. कधी कधी वाटायचं व्वा! एरोनॉटिकल खूप भारी. पण नंतर कळलं हा सगळा अट्टहास कशासाठी तर पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी! मला प्रश्नच पडत होते.
यादरम्यान मी अक्षरश: वेडा झालो होतो. कॉलेज क्लासचा तुरुंगवासच चालू होता. छंद जोपासण्याकडे जास्त लक्ष होतं. कारण फोटोग्राफी, नाटक हे  त्या तुरुंगवासादरम्यान जगण्याचा आधार झाले होते. मला ते छंद एवढे आवडत होते की त्यांना कायमचं आपलंसं करून त्याच्याकडे पोटपाणी म्हणून बघण्याचा विचार मी करत होतो.
 बारावी संपली तरी काय करायचं अजून ठरलेलं नव्हतं. बारावीत 5क् टक्के मार्क्‍स मिळाले तरी टाळकं  वेगवेगळ्या फ्रेम्स आणि कॅमेरामध्ये अडकलं होतं. एकदा नीट विचार केल्यावर कळलं फोटोग्राफी 24 तास केली तरी ती मी एन्जॉॅय करु शकलो नसतो. थोडक्यात, फोटोग्राफी आयुष्यात मला कला म्हणून हवी होती. पण त्या कलेचं भांडवलात रुपांतर करण्याचा स्वार्थी विचार मी करु शकत नव्हतो. त्या कलेतच करिअर करण्याचा सल्ला मला अनेकजण देत होते पण मी करिअरच्या विषयातून फोटोग्राफी हा विषय पण काढून टाकला. मला असं करिअर हवं होतं ज्यात कुठल्याही प्रकारचा तुरुंगवास नसेल. बंधन नसेल. त्यातून मग मी बीबीए ला अॅडमिशन घेतली. माझा शैक्षणिक तुरुंगवासाचा काळ संपला. आता मला माङया फोटोग्राफीसाठीही भरपूर वेळ मिळतो. 
मी आनंदी आहे, आपल्याला  काय करायचं होतं हे कळल्यानं आकाशात भरारी घेण्याची तयारी करतोय!
- ओजस कुलकर्णी
 

 

Web Title: Twenty-three year old common sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.