काम मिळण्याची वाट पाहत बसू नका! मिळेल ते काम करा! कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:50 PM2019-11-28T12:50:46+5:302019-11-28T12:51:37+5:30

‘मला हवे ते काम मिळेल तरच मी ते करेन’ असा आग्रह धरण्याची परिस्थिती आज नाही. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ असे म्हटले तर उपाशीच रहावे लागेल! एकच सांगतो, मिळेल ते काम सुरू करा! म्हणजे काय करा? - खरेच मिळेल ते काम करा!! वृद्धांना वर्तमानपत्न वाचून दाखवा, मुलांची नखे कापा, शेतातील तण काढा! वाट्टेल ते करा!

unemployment is big problem, so try & work hard till you get the best job.. why.. | काम मिळण्याची वाट पाहत बसू नका! मिळेल ते काम करा! कारण...

काम मिळण्याची वाट पाहत बसू नका! मिळेल ते काम करा! कारण...

Next
ठळक मुद्देभरपूर काम करा आणि चालू असलेले काम बंद करू नका.

- आनंद करंदीकर

भारतातील बेरोजगारी गेल्या काही वर्षात वाढतेच आहे.   वानगीदाखल र्‍ शेतीत रोजगार मिळवणार्‍या स्रियांची संख्या कमी होत चालली आहे, कारखान्यात काम करणार्‍या  कामगारांची संख्या कमी होत चालली आहे, सेवाक्षेत्नात कायमस्वरूपी रोजगार करणार्‍यांची संख्याही कमी होत चालली आहे. मला याबाबतचे आकडे सांगायची भीती वाटते, कारण एकतर ते कोटींमध्ये आहेत. वेगवेगळ्या सरकारी संस्थांनीच दिलेले असूनसुद्धा वेगवेगळे आहेत आणि मग काही सरकारी भाटांना चर्चा आकडय़ात गुंतवून प्रश्नाचे गांभीर्य नकारायची संधी मिळते!
सध्या केंद्र सरकारचा ‘स्किल इंडिया’ असा मोठा कार्यक्रम चालू आहे. त्याच्या मागे अशी धारणा आहे की खूप रोजगार उपलब्ध आहेत; पण त्या रोजगारासाठी योग्य शिक्षण असलेले, योग्य ते कौशल्य असलेले तरुण शिक्षणव्यवस्थेमधून तयार होत नाहीत. तरुणांचे ‘स्किलिंग’ केले की रोजगाराचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात आवाक्यात येईल. हेही खरे नाही. रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीत. नसलेल्या रोजगारांसाठी आवश्यक स्किल कसे सापडणार? आणि समजा, आज ज्याला मागणी आहे असे तांत्रिक कौशल्य आढळले, ते कौशल्य श्रम करून मिळविले, तर त्या आजच्या कौशल्याच्या आधाराने उद्या रोजगार मिळेल काय? अजिबात खात्नी नाही. अनेक तांत्रिक कौशल्याचे आयुष्यमान आता दहा वर्षाहून कमी झाले आहे. तांत्रिक कौशल्य कालबाह्य होण्याचा वेग माहिती-तंत्नज्ञान क्षेत्नात फारच आहे. 
दोनच उदाहरणे बघा. 
1990 च्या सुमारास मेडिकल ट्रान्सस्क्रिप्टचा व्यवसाय सुरू झाला. अमेरिकेमध्ये मोठय़ा संख्येने डॉक्टरांवर खटले दाखल व्हायला लागले की   ‘तुम्ही रुग्णाच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली नाही म्हणून तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल.’
 तेव्हा अमेरिकेतल्या इन्शुरन्स कंपन्या डॉक्टरांना म्हणाल्या की,  खटल्यांच्या वेळी आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ; पण त्यासाठी तुम्ही परीक्षा काय केली, औषधोपचार काय केले याचे नेमके रेकॉर्ड्स ठेवले पाहिजेत. 
अमेरिकेतील डॉक्टरांची स्वतर्‍च्या हाताने भरभर लिहायची सवय कधीच गेली होती! त्यावर त्यांनी उपाय शोधला. ते पेशंट तपासताना त्याची माहिती व्हॉइस रेकॉर्ड करू लागले. पण हे व्हॉइस रेकॉर्डिग लेखी असण्याची गरज होती. त्यासाठी मग हे व्हॉॅइस रेकॉर्डिग जिथे स्वस्तात  कागदावर उतरवून मिळेल तिथे ते पाठवण्यात येऊ लागले. भारतात इंग्रजी येणारे लोक खूप. त्यामुळे मेडिकल ट्रान्सस्क्रिप्टचा धंदा भारतातील आयटी कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात मिळाला. बघता बघता इथल्या आयटी कंपन्यांनी लोकांना घेतले. त्यांना अमेरिकन उच्चार कसे ऐकायचे, मेडिकल टर्म्स काय असतात, याचे प्रशिक्षण दिले आणि मेडिकल ट्रान्सस्क्रिप्ट हे काम मोठय़ा प्रमाणात भारतात सुरू झाले. हजारोंना रोजगार मिळाला. 
..अवघ्या दहा वर्षात व्हॉइस टाइपिंगची सॉफ्टवेअर्स विकसित झाली, उपलब्ध झाली. तुम्ही बोललात की टाइप होते. त्यामुळे हे मेडिकल ट्रान्सस्क्रि प्टचे तंत्न कौशल्य कालबाह्य झाले. मेडिकल 
ट्रान्सस्क्रि प्टचे काम ज्या वेगाने आले, त्याच्या दुप्पट वेगाने ते गेलेही!
1910-1990च्या कालखंडात संगणकप्रणाली लिहिणार्‍यांनी, अनेक प्रणालींमध्ये वर्षे लिहिण्यासाठी दोनच जागा ठेवल्या होत्या, म्हणजे 00 ते 99. त्यांना अंदाज नव्हता की 2000 सालानंतरदेखील या संगणकप्रणाली 
सुरू राहतील. त्यामुळे 2000 साल आले, तर ते शून्य शून्य वाचले जाईल. यामधून खूप घोळ निर्माण होतील. विमाने उडताना अचानक वेगळ्या मार्गालादेखील जातील. मग, हे सर्व टाळण्यासाठी एक काम आले. सगळ्या संगणकप्रणाली तपासायच्या. जिथे तारीख लिहायला दोन जागा असतील तिथे चार जागा घालायच्या.. हेच ते वाय टू के! जेव्हा गरज निर्माण झाली तेव्हा भारतातील आयटी कंपन्यांनी हजारो लोकांना वाय टू के प्रवण बनवले! त्यांना भारतातही नोकर्‍या मिळाल्या आणि परदेशातही कामे मिळाली. 2000 सालार्पयत या सगळ्या संगणकप्रणाली सुधारून झाल्या. मग ते काम गेले.
नव्या कामांच्या संधींचे जाणे-येणे हे आता अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे.
काय केले पाहिजे?
सगळ्यात कळीचा प्रश्न हा एकूण रोजगार वाढवण्याचा आहे. जर रोजगार नसतीलच तर ते मला मिळणार की दुसर्‍या कोणाला मिळणार, हा प्रश्न वृथा आहे. एकूण रोजगार वाढवण्यासाठी सरकारवर आणि समाजातल्या सत्ताधीशांवर दबाव आणणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे विविध उत्पादन क्षेत्नातील गुंतवणूक वाढवले पाहिजे. जिथे नफा दिसतो तिथे तात्पुरती गुंतवणूक करणे हा जागतिक वित्तीय भांडवलाचा अंगीभूत गुणधर्म आहे. त्यातून भांडवल इकडून-तिकडे, या उद्योगातून त्या उद्योगात, या देशातून त्या देशात, फिरत राहते; पण रोजगार निर्माण करणार्‍या उत्पादक क्षेत्नात ते गुंतून राहत नाही. या उडाणटप्पू वित्तीय भांडवलाला वेसण घालून काबूत आणून उत्पादक कामाला लावले पाहिजे.  
त्याचबरोबर विषमताही कमी केली पाहिजे. विषमता जितकी वाढते तितके श्रीमंतांकडचे पैसे उडाणटप्पू भांडवलात रूपांतरित होतात. विषमता जितकी वाढते तितकी सर्वसामान्य ग्राहकांची क्र यशक्ती कमी होऊन जाते. मग कोणी उत्पादक क्षेत्नात गुंतवणूक केलीच तर त्यांनी केलेल्या उत्पादनाला मागणी येत नाही आणि असे उद्योग बुडत जातात. मग उडाणटप्पू वित्तीय भांडवलाला अधिक जोर येतो. सर्वसामान्यांच्या संघटित दबावातूनच सरकारला आणि सत्ताधार्‍यांना या उडाणटप्पू वित्तीय भांडवलावर नियंत्नण आणणे भाग पडू शकते. यासाठी संघटित ताकद निर्माण होत असताना ती ‘स्पर्धा परीक्षांचे वय वाढवून द्या’ किंवा ‘आमच्या जातीसाठी राखीव जागा द्या’ अशा दूधखुळ्या मागण्यांतून वाया जात नाही ना, हेही पाहणे गरजेचे आहे. जर रोजगार नाहीत हेच सत्य आहे, तर ते नसलेले रोजगार मला चाळीसाव्या वर्षी का होईना मिळाले पाहिजे किंवा ते मला माझ्या जातीसाठी म्हणून मिळाले पाहिजेत, असे म्हणून काय उपयोग आहे?
आता मला माहीत आहे, की मी लिहिलेले हे सगळे वाचल्यावर बेरोजगार तरुण असे म्हणेल की, ‘हे सर्व ठीक, पण माझ्या रोजगाराचे काय?’ 
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या प्रश्नाला फारसे उपयोगी आणि चांगले उत्तर मला माहीत नाही; पण एक नक्की की, मिळेल ते काम करायला सुरुवात करा. भरपूर काम करा आणि अधिक चांगले काम मिळेर्पयत चालू असलेले काम बंद करू नका. 
 ‘मला हवे ते काम मिळेल तरच मी ते करेन’ असा आग्रह धरण्याची परिस्थिती आज नाही. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ असे म्हटले तर उपाशीच रहावे लागेल अशी परिस्थिती आहे. मिळेल ते काम सुरू करा म्हणजे काय करा? खरेच मिळेल ते काम करा र्‍ वृद्धांना वर्तमानपत्न वाचून दाखवा,  मुलांची नखे कापा,  शेतातील तण काढा! काम मिळण्याची वाट पाहत बसू नका!
- माझा स्वतर्‍चा अनुभव असा आहे जो कोणी मिळेल ते काम करायला लागतो त्याला काम मिळते आणि त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होते.  
काम करत असताना शिकत राहा. शाळेत आणि कॉलेजमध्ये दुर्दैवाने आपण शिकायचे कसे, हे शिकत नाही. काम करताना कामातून शिकायचे कसे हे शिका. नव्या संधी उपलब्ध होतील तेव्हा त्यासाठी योग्य तंत्न शिकण्याची कुवत स्वतर्‍त निर्माण करून ठेवा. शिकायचे कसे हे शिकल्याचा आपल्याला उपयोग होतो. शिकायला शिकणे आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करते. हे शिकणे युवकांना रोजगार मिळवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे.

*********

तुमचा वेळ जाईल, त्यांचे खिसे भरतील


1. मला रोजगार मिळण्यासाठी मी काय करावे, या प्रश्नाला ठोस आणि खात्नीशीर उत्तर नाही. 
2. शाळेत काय शिकू? महाविद्यालयात काय शिकू? 
3. कुठले जास्तीचे प्रशिक्षण घेऊ? कुठला कार्यानुभव घेऊ? 
4. कुठल्या स्पर्धा परीक्षेला बसू? कुठला व्यवसाय सुरू करू? 
5 - रोजगार मिळवण्याच्या संदर्भात यापैकी कोणत्याही प्रश्नाला, ‘आमच्याकडे उत्तर आहे’ असे कोणी सांगत असल्यास सावधान! 
6. तुमचा वेळ जाईल, त्यांचे खिसे भरतील. तुम्हाला नैराश्य येईल हीच शक्यता मोठी आहे!

 

  
 

 
 

Web Title: unemployment is big problem, so try & work hard till you get the best job.. why..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.