UPSC क्रॅकर्स - यशाच्या दिशेनं प्रवास करताना, वाटेत आलेल्या अडचणी त्यांनी कशा पार केल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:40 PM2020-08-06T15:40:21+5:302020-08-06T15:45:12+5:30
UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे याची आम्हाला जाणीव आहे, मात्र वेळ आणि जागा या दोन गोष्टींचा समन्वय साधता या प्रातिनिधिक मुलाखती आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्वाचे अभिनंदन..
शर्मिष्ठा भोसले, सतीश जोशी, संतोष मिठारी
भारतीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा निकाल नुकताच लागला. महाराष्ट्रातून एकूण 80 तरुण-तरुणी यूपीएससी उत्तीर्ण झाले.
दरवर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होणा:यांच्या बातम्या, मुलाखती प्रसिद्ध होतातच. यंदाही होतीलच. मात्र ‘ऑक्सिजन’ने यंदा हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की,
यूपीएससीची तयारी करताना ही यशस्वी झालेली तरुण मुलं कसा विचार करतात? त्यांचा प्लॅन ए नाही तर प्लॅन बी आणि सी ही तयार असतो का?
तो काय असतो? अभ्यासाच्या वेळापत्रकापलीकडे ‘असं’ काय असतं जे त्यांना सतत कष्ट करायला भाग पाडतं? ते अडचणींचा विचार करतात की सोल्युशन्सचा? - त्याविषयीच ही चर्चा. या अंकात 12 यशस्वी तरुण-तरुणींशी प्रातिनिधिक गप्पा मारलेल्या आहेत.
ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे याची आम्हाला जाणीव आहे,
मात्र वेळ आणि जागा या दोन गोष्टींचा समन्वय साधता या प्रातिनिधिक मुलाखती आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्वाचे अभिनंदन..
मंदार पत्की, रँक 22
ध्येय अढळ, नजर पक्की!
मी बीडचा आहे. संस्कार विद्यालयात शालेय शिक्षणानंतर पुणो येथे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. माङो वडील महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. मोठी बहीण रसिका एम.टेक. असून, नोकरी करते. छोटी बहीण रश्मी बीएएमएस (सजर्री)चे शिक्षण घेत आहे. आई गृहिणी आहे. मला लहानपणापासूनच जिल्हाधिकारी या पदाबद्दल कुतूहल आणि आकर्षण होते. माङो वडीलही महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. प्रशासकीय सेवेबद्दल आकर्षण असल्यामुळेच आपणही यूपीएससी परीक्षेत चांगले यश मिळवायचे, असा दृढनिश्चय केला होता आणि अभ्यासाचे अतिसूक्ष्म नियोजन करून ते साध्य केले.
शालेय शिक्षणानंतर पुणो गाठले. मी अभियांत्रिकेची पदवी घेतली होती. नोकरीच्याही संधी आल्या होत्या. परंतु, मी यूपीएससीत चांगले यश मिळवण्याचे निश्चित ध्येय समोर ठेवून त्यासाठी सर्व ते परिश्रम करण्याची तयारी ठेवली होती. माङयाकडे कुठलाही बॅकअप प्लॅन नव्हता. तो असला असता तर हे यश मी निश्चितच मिळवू शकलो नसतो. यश प्राप्तीसाठी आपापल्या आवडीप्रमाणो, क्षमतेप्रमाणो ध्येय निश्चित करूनच परिश्रम करायचे असतात. आपले हे ध्येय कुठल्याही परिस्थितीत डळमळीत झाले नाही पाहिजे.
****
अंकिता वाकेकर, रँक 547 (अनुसूचित जाती गटातून महाराष्ट्रात प्रथम)
मटेरिअल कमी, रिव्हिजन्स जास्त!
मी मूळची औरंगाबादची. पण नाशिकमध्ये वाढले, शिक्षण घेतलं. मुंबईत व्हीजेटीआयमधून बी.टेक केलं.
वडील एमएससीबीत अभियंता आहेत. आई नायब तहसीलदार आहे. त्यामुळे घरातूनच खूप मार्गदर्शन मिळालं, मानसिकता तयार झाली.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत काहीच अडचण आली नाही. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता. मी साडेतीन वर्षे तयारीला दिली. तिस:या प्रय}ात यशस्वी झाले. दिल्लीत कोचिंग घेतलं. त्यानंतर सेल्फ स्टडीवर भर दिला. डेडिकेशन, हार्ड वर्क आणि पेशन्सला पर्याय नाही. सातत्य, रोजच्या दिनक्रमाला चिकटून राहणं महत्त्वाचं. जसंजसं तुम्ही वाचत जाता तसं काय महत्त्वाचं आणि काय टाळलं तरी चालेल हे कळत जातं. मटेरिअल कमी वापरणो आणि रिव्हिजन्स जास्त करणो हे मी केलं.
तुम्ही अधिकारी बनता तेव्हा पब्लिक सव्र्हण्ट होता. म्हणून या क्षेत्रत यायचं असेल तर तरुणांनी ग्लॅमरला न भुलता मूलभूत काम करण्यासाठी, ग्रासरूटला बदल घडवण्यासाठी यावं. घर-गाडी या प्रिविलेजेसचं आकर्षण ठेवू नये. या परीक्षेत तुमच्या संयमाची परीक्षा होते. यश मिळालं नाही तरी प्रत्यक्ष आयुष्यातही तुम्ही मॅच्युअर बनता.
आशुतोष कुलकर्णी - रँक 44
पंचविशीनंतर कमावते होऊन मगच शिका!
मी पुण्यातच जन्मलो, वाढलो. वडील सी-डॅकमध्ये काम करतात. आई सिंडिकेट बँकेतून निवृत्त झाली. मोठी बहीण यूएसला असते. मी मुक्तांगण शाळेत शिकलो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतलं. चार वर्षे यूपीएससीसाठी दिली. चौथ्या प्रय}ात सिलेक्शन झालं. पहिल्या दोन प्रय}ात इंटरव्ह्यूर्पयत पोहोचलो होतो. तिस:या प्रय}ात प्रिलिमही निघाली नाही. चौथ्या प्रय}ात मी क्लिअर झालो. 2क्18र्पयत चाणक्य मंडल आणि ज्ञानप्रबोधिनीत मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर मी दिल्लीत एका खासगी नोकरीला लागलो. नोकरी करत हे यश मिळवलं. मला हे यश मिळवताना परिस्थिती सगळी अनुकूल होती. फक्त बहुतेकदा मुलाखतीर्पयत जायचो आणि तिथे अडायचं. एक एक्स फॅक्टर काहीतरी कमी पडायचा. यावेळी तो जुळून आला.
प्रशासकीय सेवेविषयी मला इंजिनिअरिंग करत असल्यापासूनच आकर्षण होतं. या क्षेत्रला मी कामाच्या समाधानाचा सोर्स मानतो. या क्षेत्रत आल्यावर तुम्ही चार लोकांच्या आयुष्यात नक्की बदल घडवू शकता. अगदी थेट क्रांती होईल असं नाही. त्याची गरजही नाही. पण विधायक काम नक्की शक्य आहे.
मी पुण्यात तयारी करताना शिकवायचोही. तिथे विद्याथ्र्याना सांगायचो, की वयाच्या पंचविसाव्या वर्षी काहीही करून नोकरी धराच. कमावते व्हा. अगदी दहा हजार पगाराची का असेना; पण नोकरी करत सोबत अभ्यास करा. आताचा काळ खूप चांगला आहे. विशिष्ट शहरात जाऊन क्लासेस लावण्याची गरज नाही. कारण आता ऑनलाइन कोचिंग आलंय. इंटरनेटवर सर्च करा, अनेक चांगले पर्याय, विषयांचे फ्री व्हिडिओजही उपलब्ध आहेत. या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
दुसरी गोष्ट, नोट्स बनवणो अनिवार्य आहे. पुस्तकात अंडरलाइन करून किंवा चौकटीत लिहून ठेवून परीक्षेआधी वाचणं कष्टाचं होऊन बसतं. माङया मी नोट्स टॅबमध्ये बनवल्या. सगळा मजकूर क्लाउड मेमरीत स्टोअर केला. त्या एडिट करणं, त्यात भर घालणंही सोपं जातं. एकदा नोट्स बनवल्या की परत पुस्तक उघडायला नको. या नोट्स कॅरी करणोही सोपे जाते. परीक्षेवेळी या बुलेट फॉर्म्समधल्या नोट्स फक्त पुन्हा पुन्हा वाचायच्या. ही पद्धत वापरण्याचा सल्ला मी तरुणांना नक्की देईन.
***
सत्यजित यादव रँक 801
..‘तरच’ इकडे या!
माझं जन्मगाव सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी तालुक्यातील वाळवा गाव. मी पहिली ते चौथी आश्रमशाळेत शिकलो. पाचवी ते दहावी महात्मा गांधी विद्यालय, आष्टा इथे आणि पुढे अकरावी-बारावी पुन्हा त्याच आश्रमशाळेत. दहावीला 6क् टक्के आणि बारावीला 56 टक्के मार्क होते. पुढे मी 7क् टक्के गुण मिळवत बी.एस्सी अॅग्री केलं.
माङो वडील मदन यादव ग्रामसेवक होते. 25 वर्षे आई अंगणवाडी सेविका होती. घरची आर्थिक स्थिती चांगली होती. वडिलांकडे पाहूनच मला प्रेरणा मिळाली. बारावीनंतर स्पर्धा परीक्षा करायची हे डोक्यात होतं. मी परीक्षेची तयारी मुंबईत करायचो. पहिली दोन वर्षे सेल्फ स्टडी केला. पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. त्यानंतर एक क्लास जॉइन केला. वॉचमनचा जॉब करावा लागला तरी चालेल; पण यूपीएससी सोडायची नाही, असा माझा निर्धार होता. मग त्या क्लासमध्येच शिक्षकाची नोकरी करून तयारी सुरू ठेवली.
मी पूर्वीपासूनच माङो सोर्सेस लिमिटेड ठेवले. सरांच्या सांगण्यानुसार मल्टिपल रिव्हिजन्स केले. कायम हे लक्षात ठेवा, की ग्रुप खूप महत्त्वाचा असतो. आमचा छोटासा ग्रुप होता. त्यातले दोघे-तिघे मुलाखतीर्पयत जाऊन आले. आमच्यात होणारी डिस्कशन्स यश मिळवण्यासाठी खूप मोलाची ठरली. पाठांतरापेक्षाही अॅनालिटिकल लर्निगवर आम्ही भर दिला. मेन्ससाठी ते उपयोगी पडलं. तिथे पुस्तकी ज्ञान चालत नाही. कुटुंबाचं महत्त्वही या सगळ्या प्रवासात खूप आहे. सतत पाठिंबा असल्यानेच मी खचलो नाही.
दिल्लीलाच जाऊन यशस्वी होता येतं असं नाही. अनेक क्लासेस नऊ महिन्यात तयारी करून घेऊ अशी आश्वासनं देतात. हे खोटं आहे. पूर्ण तयारीसाठी कमीत कमी दीड वर्ष लागतंच. ग्रामीण भागातल्या विद्याथ्र्याना तर अजूनच वेळ लागतो. भाषेची अडचण, रिसोर्सेस न मिळणो असं सगळं असतं. अनेकदा खूप वर्षे मेहनत करूनही यश येत नाही. तेव्हा स्वत:ला विचारलं पाहिजे, की माझी स्ट्रॅटेजी कुठे चुकतेय का? मग इतरही परीक्षा द्याव्या. मात्र केवळ यूपीएससीच्याच अभ्यासावर त्या परीक्षा क्रॅक केल्या पाहिजेत. त्यासाठी वेगळा अभ्यास नको.
पण इथे काही झालंच नाही झालं तर अगदीच निराश होऊ नका. यूपीएससीचा अभ्यास तुम्हाला मानसिकदृष्टय़ा सशक्त बनवतो. यश मिळालं नाही तरी या अभ्यासातून जगण्याचे अनेक इतर मार्ग, क्षेत्र, तुमच्यासमोर खुली होतात.
***
सुनील शिंदे, रँक -812
दहा वर्षाचा सरावआणि संघर्ष!
मी मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या लोह्याचा. वडील लोह्याला राज्यशास्नचे प्राध्यापक होते. आई गृहिणी. मी आठवीर्पयत लोह्यातच शिकलो. नववीला अहमदपूरला शिकायला गेलो. दहावी-बारावीला अपंगांच्या गुणवत्ता यादीत पहिला आलो. मी एक वर्षाचा असताना उजव्या पायाचा पोलिओ झाला होता. शारीरिक अक्षमतेवर मात करून इथवर आलो. आज आयएएस केडरसाठी निवड झाली त्यामागे जवळपास दहा वर्षाचा संघर्ष आणि सराव आहे.
बारावीनंतर मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. पुढे ती सोडून वयाच्या 24व्या वर्षी यूपीएससीची तयारी सुरू केली. दुस:या आणि तिस:या प्रय}ात मुलाखत दिली. पण यश आलं नाही. पुढच्या वर्षी माझा भाऊ कॅन्सरने वारला. त्यापुढच्या वर्षी मी लग्न केलं. त्यापुढचीही दोन वर्षे प्रय} केला. पण माझी लिंक थोडी तुटली होती. यश आलं नाही.
दरम्यान, 2क्12 साली डिसेंबरमध्ये आयकर खात्यात इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. ती नोकरी आठ वर्षे करतोय. आता माझं प्रमोशनही आलं होतं. दरम्यान वडीलही निवृत्त झाले.
घरी माझी दोन लहान मुलं, प}ी असताना यंदाची पोस्ट मिळवली. 2क्क्3 पासून दिल्ली आणि मुंबईत नोकरी केली. आता पनवेलला राहतो.
2-3 वर्षे मीही दिल्लीला क्लास केले. त्याचा फायदा झालाच. स्पष्टता आली. पण आताच्या काळात ऑनलाइन खूप मटेरिअल उपलब्ध आहे. ग्रामीण भागातही हे मिळू शकतं. तरुणांनी क्लासेसच्या दिखाव्याला न भुलता डोळसपणो निवड करावी.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखणं. जी परीक्षा आपल्या आवाक्यात आहे तिला पूर्ण वेळ देणो, तीन-चार वर्षे पूर्णवेळ करून इतर नोकरी करत पुढची मर्यादित वर्षे तयारी करणं हे सूत्र ठेवावं. या क्षेत्रतली अनिश्चितता पाहता हाताशी दुसरा एक पक्का पर्याय ठेवलाच पाहिजे.
***
प्रणोती संकपाळ- रँक- 501
डेडलाइन ठरवाआणि ती पाळा!
कोल्हापुरातील नेर्ली हे माझं गाव. पण, पहिलीपासूनचं सर्व शिक्षण शहरात झालं. शाळेत असताना कलेक्टर होण्याचे ध्येय बाळगलं होतं. भारती विद्यापीठातून बीडीएसची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. ही परीक्षाच द्यायची होती मग, बीडीएस का केलंस, डॉक्टर झालीस तर मग ही परीक्षा का देतेस अशा प्रश्नांमुळे काहीकाळ द्विधामन:स्थिती झाली. मात्र, कुटुंबीयांच्या पाठबळावर तयारी केली.
या परीक्षेत प्रय} करून यश मिळालं नसतं, तर पुढे क्लिनिक सुरू करून प्रॅक्टीस करायची आणि पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं, असा माझा बॅकअप प्लॅन होता.
आपल्या क्षमतांचा विचार या क्षेत्रतील यशासाठीच्या तयारीचा आराखडा बनवा. डेडलाइन ठरवा. त्यामध्ये जर, यश मिळत नसेल, तर वेळीच दुस:या क्षेत्रतील करिअरसाठी शिफ्ट व्हा!
***
नेहा देसाई रँक 137
प्लॅन बी हवाच, तो स्ट्राँगही हवा!
मी मूळची कुडाळची. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. बाबा गुंतवणूक सल्लागार आहेत. आई बीएसएनएलमध्ये नोकरी करायची.
बारावीर्पयत मी कुडाळलाच शिकले. पुढे पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुण्यात आल्यावर चार वर्षानी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मी चाणक्य मंडलमध्ये करायचे.
मला माहीत असणारी खूप मुलं आहेत जी माङयाहून जास्त हुशार आहेत, माङयाहून जास्त कष्टही घेतात. पण अजून त्यांना यश मिळालं नाहीय. मला वाटतं, की प्रत्यक्ष परीक्षेवेळी आपण मानसिक ताण कसा हाताळतो यावर सगळं असतं. सोबत थोडासा ‘लक’चाही भाग असतोच. तो या अर्थाने, की नेमकं त्यादिवशी तुम्ही कसं परफॉर्म करता. त्यापलीकडे सतत सराव आणि सुधारणा करत राहणं हेच मी सांगेन.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणं ही प्रक्रिया दीर्घ आहे हे या क्षेत्रत येणा:या प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे. हा माझा चौथा अटेम्प्ट होता. पुढे येणारं नैराश्य टाळण्यासातही प्लॅन बी तयार असणं आणि तो स्ट्रॉँग असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेतलं करिअर वर्क आउट नाही झालं तर आपल्याला जे मनापासून आवडतं ते करावं. सगळं संपलं असं अजिबात नाही. शिवाय ग्रॅज्युएशन कशात करता त्यावर स्पर्धा परीक्षेतलं यश अवलंबून नसतं. उलट प्लॅन बी डोळ्यासमोर जो आहे त्यानुसार ग्रॅज्युएशन कशात करायचं ते ठरवा. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या गोष्टींचा तयारीमध्ये पुरेपूर फायदा घ्या.
***
आकाश आगळे- रँक 313
चुकीच्या माहितीपासून स्वत:ला वाचवणं महत्त्वाचं!
माझं प्राथमिक शिक्षण माहूर तालुक्यातील वानवळा गावी झालं. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी मी नांदेडला आलो. माङो वडील मराठीचे प्राध्यापक आहेत. आई गृहिणी आहे. नांदेडच्या सायन्स कॉलेज इथून अकरावी-बारावी केली. नंतर नांदेडच्याच गुरुगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याचं ठरवलं. दरम्यान भावाचं नांदेड जिल्हा परिषदेत अकाउण्ट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. माझा मधला भाऊ अविनाश आगळे यांचीही मंत्रलयात निवड झाली. या दोन भावांनी मला प्रेरणा दिली.
मी गेली पाच वर्षे तयारी करतोय. पाचव्या प्रय}ात यशस्वी झालो. पहिल्या प्रय}ात मी अगदी पूर्वपरीक्षाही पास नव्हतो झालो. रवींद्र शिंदे माङो मित्र आहेत. त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं. दुस:या प्रय}ात पूर्वपरीक्षा पास झालो. पहिल्या तीन-चार प्रय}ात अपयशी झालो. पण खचून न जाता मी सातत्य ठेवलं. यश मिळवण्यासाठी ते अतिशय कळीचं असतं.
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रत स्वत:ला आजमावताना प्लॅन बी असलाच पाहिजे. त्यातून एक बॅकअप मिळतो. धास्ती कमी होते. स्वत:ला अपु:या, चुकीच्या माहितीपासून वाचावा. भांबावून-बावरून जाऊ नका.
काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगेन, की पूर्वी झालेल्या चुका टाळा आणि त्यातून गरजेच्या गोष्टी शिका.
कायझन ही एक जपानी पद्धत आहे. ती सतत, छोटय़ा-छोटय़ा टप्प्यांनी सुधारणा, विकास कसा करावा हे सांगते. हे मी प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना शिकलो. लहान-लहान यशाचे टप्पे खूप महत्त्वाचे असतात.
***
गौरी पुजारी-किल्लेदार, रँक ..275
दोनदा अपयशानंतरचे कष्ट आणि यश
मी कोल्हापूरची. आजी-आजोबा निवृत्त मुख्याध्यापक आणि वडील मेकॅनिकल इंजिनिअर आणि प्राध्यापक अशी शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबाने पाठबळ दिले. बी.ई. मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रय}ात यश मिळाले नाही. पण शेवटचा प्रय} करायचा हे ठरवून जोमाने तयारी केली. पुणो येथे राहून दिवसाकाठी आठ ते दहा तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य राखले. मुलाखतीची तयारी दिल्ली येथे राहून केली. तिस:या प्रय}ातही यश मिळाले नसते, तर मात्र बी.ई. मेकॅनिकल पदवीच्या माध्यमातून प्राध्यापक म्हणून काम करण्याचा बॅकअप प्लॅन होता.
****
कुणाल चव्हाण, रँक 211
बाजाराला भुलू नका, स्वत:चे ‘आयकॉन’ निवडा!
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात खरदडी तांडा हे माझं मूळ गाव. जन्म आणि शालेय शिक्षण परभणीत झालं. महाविद्यालयीन शिक्षण लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये घेतलं. पुढे मी इंजिनिअरिंग केलं. 2क्12ला पास आउट झालो. अडीच वर्षे नोकरीही केली.
कुटुंब मध्यमवर्गीय म्हणता येईल असं. वडील भूमिअभिलेख खात्यात अधिकारी होते. आता निवृत्त झाले. आई गृहिणी. तीन बहिणी आहेत. एक बहीण पोलीस खात्यात आहे. एक डॉक्टर आणि एक चित्रकार आहे.
हा माझा पाचवा अटेम्प्ट होता. मुलाखतीर्पयत मी तीनदा गेलो. यावेळी यशस्वी झालो.
दिल्लीला येऊन तयारी करता येईल हे आर्थिक कारणाने शक्य नव्हतं. 2क्18-19ला मला दिल्लीला तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची दोन वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली. यातून गोष्टी थोडय़ा सोप्या झाल्या.
यावर्षी जानेवारीत मी एका दुस:या परीक्षेअंतर्गत यश मिळवून केंद्र सरकारतर्फे हैदराबादला इपीएफओ खात्यात अकाउण्ट्स ऑफिसर म्हणून रुजू झालो होतो.
मी यूपीएससीत यश मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमाचा चांगला उपयोग केला. ऑनलाइन मोजके व्हिडिओ पाहिले. यातून पैशांची खूप बचत झाली. अभ्यास करताना सॉफ्ट कॉपी स्वरूपातच नोट्स काढल्या. या नोट्स अगदी टू द पॉइंट, स्पष्ट अशा होत्या. चुकांचं विेषण करत राहिलो. लिखाणाचा स्पीड वाढवण्यासाठी सतत सराव केला.
तरुणांनी सावधपणोच क्लास किंवा स्वत:चा आयकॉन निवडला पाहिजे.