व्हॅलेन्टाईन्स स्पेशल शॉपिंग करताय? मग हे लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:03 PM2019-02-07T14:03:22+5:302019-02-07T14:04:30+5:30

एक लक्षात ठेवायला हवं की खूप भडक, तडकफडक दिसणं म्हणजे स्पेशल दिसणं नव्हे. आपल्याला व्हॅलेन्टाइन्स डेच्या दिवशी छान दिसायचं असेल तर कपडय़ाच्या रंगापासून ज्वेलरी आणि पर्सर्पयत सर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करायला हवा. आपलं व्यक्तिमत्त्व उठून आणि खुलून दिसणं जास्त गरजेचं असतं.

Valentines special shopping? keep this in mind. | व्हॅलेन्टाईन्स स्पेशल शॉपिंग करताय? मग हे लक्षात ठेवा..

व्हॅलेन्टाईन्स स्पेशल शॉपिंग करताय? मग हे लक्षात ठेवा..

Next
ठळक मुद्देसंध्याकाळी पार्टीला जायचं असेल तर क्लिअर ग्लास हा उत्तम पर्याय. आता त्यातही ट्रान्सपरन्ट, ट्रिन्टेड ब्ल्यू, पिवळा, गुलाबी हे रंग छान दिसतात. 

प्राची खाडे

व्हॅलेन्टाइन्स डे जवळ आला आहे. तयारीचं मनात असतंच काहीतरी, म्हणजे निदान आपण काय घालणार, काय गिफ्ट देणार, पार्टीला जायचं असेल तर काय घालणार, असा ताळा मनाशी चाललेलाच असतो. तर त्यासाठी ही थोडी मदत, शॉपिंग करताना विचार करायला सोपी होतील अशा साध्या गाइडलाइन्स. 
एक लक्षात ठेवायला हवं की खूप भडक, तडकफडक दिसणं म्हणजे स्पेशल दिसणं नव्हे. आपल्याला व्हॅलेन्टाइन्स डेच्या दिवशी छान दिसायचं असेल तर कपडय़ाच्या रंगापासून ज्वेलरी आणि पर्सर्पयत सर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करायला हवा. आपलं व्यक्तिमत्त्व उठून आणि खुलून दिसणं जास्त गरजेचं असतं. व्यक्त्तिमत्त्वाला साजेशा गोष्टी केल्या तर कुणीही छान दिसू शकेल. काय करायचं नि मुख्य म्हणजे काय टाळायचं, हे माहिती असलं की काम सोप्प होतं.
लाल रंगाचा ड्रेस घालणार असाल तर.
प्रत्येक स्पेशल दिवस हा त्याचा रंग घेऊन येतो. तसा व्हॅलेन्टाइन्स डेचा विशेष रंग हा लाल आहे. अर्थात तुम्ही जे घालाल ते लालच असायला हवं असा काही या दिवसाचा आग्रह नाही; पण जर लाल रंग निवडणार असाल तर रेड वॉर्म टोनचे कपडे घालावेत. अर्धा ड्रेस लाल आणि अर्धा गुलाबी किंवा इतर कोणताही रंग छान दिसू शकतो. फक्त लालसोबत पांढरा रंग मात्र टाळायलाच हवा. लाल आणि पांढरं हे कॉम्बिनेशन ािसमसची आठवण करून देतो. त्यामुळे लालसोबत इतर कोणताही रंग निवडलेला बरा.

रोमॅण्टिक दिसायचं असेल तर.
आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पार्टीला किंवा डेटला जायचं असेल तर आपण रोमॅण्टिक दिसायला हवं असं कोणालाही वाटेल. रोमॅण्टिक दिसण्यासाठी विशेष काही करण्याची गरज नसते; पण तसं नाही.  कपडय़ांचे पेस्टल रंग निवडावेत. फेश ब्ल्यू, अ‍ॅक्वा ब्ल्यू, पेन येलो, फ्रेश येलो, लाइट ग्रीन हे फ्रेश पेस्टल रंग छान दिसतात. पांढरा रंग निवडणार असाल तर मग व्हाइट, ऑफ व्हाइट हे रंग छान दिसतात. दिवसा, दुपारी तयार होऊन कुठे जायचं असेल तर या पेस्टल रंगाची मदत घ्या. 
आणि संध्याकाळी पार्टीला जायचं असेल तर आधी आपण लाल रंग घालायचा नाही हे ठरवून ठेवा. काळा, गडद जांभळा, बॉटल ग्रीन हे रंग छान दिसतात. 
हिरवा रंग निवडताना खास काळजी घ्यावी लागते. कारण हिरवा जसा ताजा दिसू शकतो तसा हिरवा हा मंदही (डल) दिसू शकतो. रंग निवडताना रंगापेक्षाही छटा (शेड) खूप महत्त्वाची असते. म्हणूनच हिरवा निवडताना बॉटल ग्रीन घ्यावा. ऑलिव्ह ग्रीन, मॉक ग्रीन या हिरव्या रंगातल्या छटाही टाळायला हव्यात. करडे, तपकिरी, बेज हे रंग यादिवशी टाळायलाच हवेत. कारण नसताना आपण थोराड दिसू शकतो.

लेअरिंग करणार असाल तर.
व्हॅलेन्टाइन्स डेला थोडय़ा का होईना थंडीचा स्पर्श असतोच. म्हणूनच लेअरिंग (एकावर एक) स्टाइलही छान दिसते. यासाठी ज्ॉकेट्स उत्तम पर्याय. अर्थात हे ज्ॉकेट जाडजूड नसावेत. छान हलके असावेत. फुल कव्हरअप ज्ॉकेट्स मिळतात ते घालू शकतात. कुत्र्यावर हे ज्ॉकेट्स छान दिसतात. 
ज्ॉकेट्समुळे ट्रेण्डीही दिसता येतं आणि स्पोर्टी लूकही मिळतो. हल्लीचे तरुण हे फिटनेसविषयी खूपच सजग आहेत. हा उद्देश स्पोर्टी लूक देणारे ज्ॉकेट्स पूर्ण करू शकतात. ज्ॉकेट्सचा समावेश आता स्मार्ट कॅज्युअलमध्ये झाला आहे. एवढी या ज्ॉकेट्सना मागणी आहे. 
टी-शर्ट, टीज हे घालणार असाल तर त्यासोबत जॉर्गर पॅन्ट छान दिसते. अर्थात यात मुलांनी काय घालावं आणि मुलींनी काय घालावं? असा फरक करण्यासारखं काही नाहीये. हल्लीची फॅशन ही युनिसेक्स आहे. कुठे डेटवर वगैरे जाणार असाल तर मुलींनी खास करून उंच टाचेच्या चपला, सॅण्डल्स किंवा बूट टाळायला हवेत. फॅशनेबल दिसायचं असेल तर हायहिल्स घालायला हवेत असं म्हणणारा काळ आता मागे पडला आहे. हल्ली फॅशनमध्ये कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो.  स्निकर्स, स्पोर्टी शूज, वेगवेगळ्या प्रकारचे शूज घालून छान ट्रेण्डी दिसता येतं. शिवाय ते आरामदायीही असतात. यानं समोरच्यावर इम्प्रेशन छान पडतं. आपलं स्वतर्‍चं स्वतर्‍ला छान वाटतं. वावरायचं टेन्शन येत नाही.  शिवाय पार्टी, डेटवर जाताना आपला निम्मा वेळ आणि निम्म लक्ष कपडे अ‍ॅडजस्ट करण्यात, पावलं जपून टाकण्यात जात नाही.
हेअर स्टाइल कशी करणार. 
केस मोठे असतील तर काय हेअर स्टाइल करावी, असाही प्रश्न पडतो. आणि पार्लरमध्ये जाऊन यायला वेळ नसेल तर सरळ केसांच्या झटपट स्टाइल कराव्यात. त्यात केस हाय बन स्टाइलनं बांधल्यास छान दिसतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारे पोनी टेल्स घालता येतात. वेण्यांचेही कितीतरी प्रकार आहेत. त्यातला आवडेल त्या प्रकारची वेणी घातली तरी उत्तम. 

दागिने कमीच घातले तर.

दागिने किंवा अ‍ॅक्सेसरी हे नेहमी आपल्या दिसण्याला मदत करत असतं. ते मुख्य कधीच नसतं. पण तेच जर आपण विचित्र निवडलं तर मात्र ते डोळ्यात भरतं आणि त्याचं कौतुक होण्यापेक्षा त्याला नावंच ठेवली जाण्याची शक्यता जास्त असते. 
जितकं कमी तितकं छान. अंगभर दागिने घालून वावरण्याचा हा काळ नाही तसा हा दिवसही नाही. आपण जे घालू त्यावर उठून दिसेल असा फक्त एखादाच दागिना घालावा. मग कानात आकर्षक झुमके घातले किंवा मोठे टॉप्स घातले तरी छान दिसतील. किंवा मग फक्त गळ्यात एक उठावदार नेकपीस घालावा. किंवा बोटांमधली छानशी अंगठी हा छोटासा दागिनाही आपल्या तयारीत मोठी भूमिका बजावू शकतो. यातलं काहीच नको असेल तर मनगटावर एक ट्रेण्डी वॉच घातली तरी पुरे.
 दुपारी कुठे जायचं असेल तर सनग्लास चालतात; पण जर संध्याकाळी पार्टीला जायचं असेल तर क्लिअर ग्लास हा उत्तम पर्याय. आता त्यातही ट्रान्सपरन्ट, ट्रिन्टेड ब्ल्यू, पिवळा, गुलाबी हे रंग छान दिसतात. 


( सुप्रसिद्ध स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर आहेत.)
शब्दांकन- माधुरी पेठकर

Web Title: Valentines special shopping? keep this in mind.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.