तंबाखू सोडलेलं गाव
By Admin | Published: June 3, 2016 12:18 PM2016-06-03T12:18:49+5:302016-06-03T12:18:49+5:30
शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तंबाखूच्या व्यसनात अडकलेले. सा:यांनी एक दिवस ठरवलं, हे व्यसन सोडायचं.
>चंद्रपुरातील कोरपाणी तालुक्यातील थुट्रा हे गाव. महाराष्ट्रातील पहिलं ‘तंबाखूमुक्त’ गाव म्हणून तीन वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं. ग्रामपंचायतीनं एकत्र येऊन घेतलेल्या सकारात्मक निर्णयानं गावात आता एकही तंबाखू विक्रेता नाही. या गावाचा आदर्श घेऊन शेजारच्या राजुटा तालुक्यातील खैरगुडा आणि मंगीबुजुर्ग तसेच जिवती तालुक्यातील महांगुडा, लोलदे या गावांनीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला.
त्या थुट्रा गावची ही आजवरची गोष्ट. साधारण 75क् लोकसंख्या असलेलं 183 घरांचं गाव. तांदळाची शेती हा प्रमुख व्यवसाय. गाव तसं इतर गावांप्रमाणोच. पण 2क्क्9 साली सलाम बॉम्बे संस्थेनं राज्यातील पहिलं तंबाखूमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानंतर गावाला प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला पुरस्कृत करण्यात आलं. गाव तंबाखूमुक्त होण्याच्या प्रक्रियेला चार ते पाच वर्षे गेली. याआधी गावातील स्त्रिया, शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंबाखू आणि खर्रा खाणा:यांचं प्रमाण जास्त होतं.
पण एका घटनेने गावाचा तंबाखूजन्य पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2क्क्7 च्या दरम्यान अरुण तानाजी जाधव हा गावकरी कॅन्सरने दगावला. तंबाखूच्या अतिसेवनाने तोंडाच्या कॅन्सरचा त्रस गावक:यांनी जवळून बघितला. दरम्यान, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि अंबुजा सीमेंट फाउंडेशन यांनी तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी आक्रमक पाऊलं उचलली.
गावचे सरपंच वामन भिवपुरे यांनी स्वत:चं तंबाखूचं दुकान बंद करत चळवळीत पुढाकार घेतला. गाव तंबाखूमुक्त होण्याची गरज ओळखून ग्रामसभा बोलवत प्रत्येक गावक:यार्पयत हा विषय पोहोचवला. सरपंच भिवपुरे यांनी स्वत:पासून सुरुवात केल्यानं गावक:यांनाही प्रेरणा मिळाली. शाळांमधून तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती सुरू झाली. विद्याथ्र्याद्वारे तंबाखूमुक्ततेचा संदेश हळूहळू प्रत्येक घरात पोहोचत होता. तंबाखूमुक्तच्या घोषणांचे फलक शाळांप्रमाणोच घरांवरही लागले. गावक:यांनी सेवाभावी संस्था आणि पोलिसांच्या मदतीनं दुकानातील तंबाखूविक्री थांबविली. क ाही तंबाखूविक्रेत्यांनी जेव्हा तंबाखूविक्रीचा प्रयत्न केला तेव्हा गावक:यांनी पोलीस आणि एफडीएच्या मदतीने दुकानांवर कारवाई करवली. तंबाखूजन्य पदार्थमुक्तीच्या ‘कोप्टा 2क्क्3‘ या कायद्याबद्दल गावात जनजागृती होत होती. आरोग्यसखी संकल्पनेअंतर्गत पुष्पाताई चुनारकर यांनी घराघरात जाऊन महिलांची मते जाणून घेतली. महिलांची एक फळी या लढय़ात अग्रस्थानी होती.
थुट्रातील शाळा तंबाखूमुक्त झाली. तंबाखूविक्रेत्यांनी कमाईचे इतर पर्याय शोधले. तरुणांनीही आपल्या तोंडावर ताबा मिळवत तंबाखू, गुटखा यांना नकार दिला.
गावचे सरपंच वामन भिवपुरे सांगतात, ‘आता पुढच्या पिढीला आम्ही अभिमानानं सांगू की, एक मोठं व्यसन आम्ही कायमचं सोडलं. एकटय़ादुकटय़ानं नाही, तर सा:या गावानंच तंबाखू सोडली हे मोठं यश आहे.’
सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ग्रामीणचे सहायक व्यवस्थापक दीपक पाटील, अंबुजा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी कल्पना भेंडे, शिक्षक ए. एस. शिवकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
शाळकरी वयातल्या मुलांसह तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येत सोडलेल्या या तंबाखूची गोष्ट प्रेरणादायी आहे, हे नक्की !
- प्रवीण दाभोलकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)