आवाज, आवाज, आवाज..

By admin | Published: April 25, 2017 05:58 PM2017-04-25T17:58:45+5:302017-04-25T17:58:45+5:30

- या कानठळ्यांनी कानाचे पडदे फाटताहेत.जागतिक ध्वनिप्रदुषण जागरुकता दिनानिमित्त काही कानगोष्टी..

Voice, voice, voice .. | आवाज, आवाज, आवाज..

आवाज, आवाज, आवाज..

Next

 - मयूर पठाडे

 
कानठळ्या बसवणारे आवाज, रस्त्यावरचा गोंगाट, गडबड-गोंधळ, प्रत्येक ठिकाणाहून हरघडी येणारे कर्णकर्कश आणि कंठाळी आवाज.. यामुळे काय होतं ते तुम्हाला माहीत आहे?
 
उद्या दिनांक 26 एप्रिल 2017 रोजी ‘जागतिक ध्वनि प्रदुषण जागरुकता दिवस’ आहे.
 
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या बुधवारी हा दिवस पाळला जातो.
 
आवाज आणि गोंगाटाविरोधात लोकांना सजग करण्याचं काम या दिवशी विविध संस्था आणि संघटना करीत असतात.
 
पण या गोंगाट आणि आवाजाची आपल्याला आता इतकी सवय झाली आहे की, त्याचं आपल्याला काही वाटेनासंच झालं आहे.
 
मात्र जगभरातल्या संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
 
या गोंगाटानं आपल्या शरीराची किती हानी होते हे तुम्हाला माहीत आहे?.
 
1- गोंगाटानं कानाचे पडदे निकामी होतात.
 
2- तुम्हाला कमी ऐकायला यायला लागतं.
 
3- ऐकायला कमी येत असल्यानं साहजिकच आपणही मोठय़ानं ओरडून बोलायला लागतो.
 
4- आपण ओरडतो म्हणून इतरही आपल्याशी त्याच आवाजात आणि त्याच टोनमध्ये ओरडून बोलायला लागतात.
 
5- आरडाओरड करण्याची ही सवय सामाजिक होत जाते.
 
 
6- गोंगाटामुळे झोपेचं खोबरं होतं. 
 
7- सततच्या आवाजामुळे तुमचं ब्लडप्रेशर वाढतं.
 
8- कर्णकर्कश आवाजामुळे आपल्या हृदयावरही विपरित परिणाम होतो.
 
9- आवाजामुळे आपल्या जठरावरही वाईट परिणाम होतात.
 
10- आवाज आणि शारीरिक विकार यांचा खूप जवळचा संबंध आहे हे तर आजवर विविध संशोधनांनी सिद्धच झालं आहे, मात्र आवाजामुळे मेंदूवरही परिणाम होतो.
 
11- सततच्या गडबड-गोंधळामुळे तुमच्या वागणुकीत आक्रस्ताळेपणा येतो आणि तुमच्यात चिडचिडेपणाही वाढतो. 
 
12- गोंगाटामुळे कानांचा बहिरेपणा वाढत जातो आणि ऐकू येण्यासाठी बर्‍याच जणांवर कानाचं यंत्र लावण्याची वेळ येते.
आवाजाची ही पातळी सारखी वाढतच असल्याने बहिरेपणा वाढत जातो आणि यंत्रानं ऐकू येण्याची पातळीही कमी कमी होत जाते.
 
दिवसेंदिवस हे कानठळी आवाज वाढतच जाताहेत आणि आपण त्यावर काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती जणू निर्माण झाली आहे. 
 
कारण यातल्या बर्‍याच गोष्टींवर आपला काहीच अधिकार नाही आणि त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत.
 
तरीही काही गोष्टी आपल्या हातात आहेत. 
 
निदान आपल्यापुरत्या तरी आपण त्या करू शकतो.
 
त्यानं गोंगाटाचं हे स्वरुप निदान आपल्यापुरतं तरी कमी होऊ शकतं.
 
काय कराल त्यासाठी?
 
अगदी छोट्या छोट्या गोष्टी.
 
वाचा इथेच.
 
उद्या.
 

Web Title: Voice, voice, voice ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.