वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

By admin | Published: April 27, 2017 05:17 PM2017-04-27T17:17:34+5:302017-04-27T17:17:34+5:30

काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो

Wade-Samosa Tea-Coffee - A Derma of the Skin in the Summer | वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

Next

 -ऑक्सिजन टीम

 
 
उन्हाळा आला की नको होतो जीव, तगमग नुस्ती. घाम पुसून अर्धमेली होती त्वचा.  त्यात कोरडी किंवा तेलकट असेल त्वचा तर मग झालंच काम तमाम. त्यात आपल्या चूका. काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो आणि हातपाय तर असे जसे वाळकी लाकडेच!
यावर उपाय काय?
काही गोष्टी केल्या आणि काही टाळल्या तर उन्हाळ्यातही आपली त्वचा रसरशीत आंब्यासारखी मस्त दिसू शकेल.
 
1) भजीवडेसमोसे
उन्हाळ्यात भाजीपोळी नकोच होते. त्यात आपण सुटी म्हणून अरबट चरबट खातो. तेलकट, समोसे, वडे, आणि रस्त्यावरचं चमचमीत काय वाट्टेल ते भरतो. परिणाम म्हणून त्वचा तेलकट होते. जीव पाणी पाणी करतो पण ते ही कमीच पडतं. म्हणून कितीही इच्छा झाली तरी तेलकट पदार्थ टाळा. किंवा कमीत कमी खा.
 
2) कोल्डड्रिंक 
ते तर काय पितोच आपण. पण त्यातल्या अ‍ॅडेड शूगरचं काय? रंगांचं काय? सोडय़ाचं काय? तो एरिएटेड ड्रिंक्स धड पचत तर नाहीच. पण त्यानं कंबरेभोवतीची चरबी हमखास वाढते. त्यात हे पेय सतत प्याल्यानं भूक मरते, अनेकांना अजीर्ण होतं, अपचन होतं. पोट साफ होत नाही. त्यानं चेहर्‍यावर पिंपल्स वाढतात. म्हणूनच शितपेयं, अमूकतमूक मिल्क, तमूक मिल्कशेक, पॅक्ड ज्यूस हे सारं टाळा. फळं खा, ताजे रस प्या फळांचे ते ही वरुन साखर आणि बर्फ न घालता.
 
3) मेकअप
उन्हाळ्यात मेकअप करुन जाणार असाल तर किती करायचा याचं भान ठेवा. होतं काय, त्या मेकअपचे थर आणि घामांच्या धारा हे वाईट दिसंतच. पण त्यातून चेहर्‍याची त्वचा खराब होते ती वेगळीच!
 
 4) जागरण
हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. सुटी आहे म्हणून भरपूर जागरणं केली जातात. आणि त्यानं बॉडी क्लॉक बिघडतं, चहाकॉफीचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनही चेहर्‍याचा नूर पार बदलून जातो.

Web Title: Wade-Samosa Tea-Coffee - A Derma of the Skin in the Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.