आम्ही दुष्काळीच!
By admin | Published: April 10, 2015 01:31 PM2015-04-10T13:31:24+5:302015-04-10T13:31:24+5:30
आमच्या वाटय़ाला काय जिणं येतंय, याचा शहरी तारुण्याला काही पाचपोच तरी आहे का?
Next
>
जगाचं तसं मस्त चाललंय; आणि त्या जगात माङयासारख्या रडक्या माणसांना स्थान नाही, हे मला माहिती आहे. खरंतर या देशातच आमच्यासारख्या फुटक्या नशिबाच्या, दरिद्री माणसांची गरज नाही.
पण आहोत आम्ही या समाजाचा भाग, आणि दुर्दैव म्हणजे जिवंत आहोत!
मी पुण्यात शिकतो. माङो मित्र सतत एफसी रोडवर पडिक. कुठं पाटर्य़ा, कुठं सेलिब्रेशन, कुठं शॉपिंग!
आणि मी?
माङया मराठवाडय़ातल्या गावात प्यायला पाणी नाही, यंदा दुष्काळ असा की, आमच्याकडची गावंच्या गावं ओस पडत चालली आहेत. काही गरीब घरात तर दोनवेळच्या जेवायची सोय नाही. दुष्काळ अवघड आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जे करावं लागतं ते तर शब्दात सांगता येत नाही. हातात पैसा नाही, पोरींची लगA औंदा अवघड आहेत, कारण पैसेच नाहीत!
पीक नाही, पाणी नाही, घरातले डबडे रिकामे, अशा भागातून आलेला मी, माङो वडील मला जे पैसे पाठवतात ते घेताना, खर्च करताना लाज वाटते, अपराधी वाटतं!
पण इथे पुण्यात कुणालाच त्या दुष्काळाची माहिती नाही, कुणालाच आमच्या वणव्याची जाणीव नाही, मी आपल्याच राज्यातल्या माणसांविषयी बोलतो आहे, यावर मित्र विश्वास ठेवत नाही. काहींचे चेहरे तर असे की, मी काय बोअर मारतो आहे? किती रडगाणी, किती हे वाईट्ट म्हणजे!
काय बोलणार?
अस्वस्थ झालं, म्हणून लिहिलं!
एकच कळकळीची विनंती, या देशात आम्ही आहोत, मरत मरत जगतोय, हे तरी एकदा पहा.
त्यावर उपाय हे तर फार पुढचे झाले!!
-अविनाश वायदंडे