वेअरेबल्स

By Admin | Published: August 18, 2016 03:44 PM2016-08-18T15:44:23+5:302016-08-18T15:44:23+5:30

तुम्ही किती अंतर चाललात, किती कॅलरी बर्न झाल्या, तुमचा हार्टरेट काय होता, काल रात्री तुम्ही किती झोपलात ... अशा सगळ्या गोष्टींचा पूर्ण ट्रॅक ठेवून क्षणोक्षणी तुम्हाला अलर्ट करणारी

Wearables | वेअरेबल्स

वेअरेबल्स

googlenewsNext
>- अनिल भापकर


माणसाचे श्रम कमी करणे आणि उत्पादन वाढवणे यासाठी मानवाने तंत्रज्ञानाचा शोध लावला. मात्र जसाजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी तंत्रज्ञानाची व्याख्या बदलू लागली. तंत्रज्ञानाचा आवाका एवढा वाढला कि त्याने मानवाचे जीवनच बदलून टाकले . जणू मानवी जीवनावर तंत्रज्ञान राज्य करू लागले . श्रम कमी करणे आणि उत्पादन वाढवणे यासाठीच सुरु झालेला हा तंत्रज्ञानाचा प्रवास करमणूक ,खेळ ,आरोग्य ,इंटरनेट ,स्मार्टफोन आदींपर्यंत कधी येऊन पोहोचला हे कळले देखील नाही. स्मार्टफोनने तर तंत्रज्ञानाची व्याख्याच बदलून टाकली. आता स्मार्टफोन च्या ही पुढे जाऊन एक तंत्रज्ञान तुम्हाला खुणावते आहे त्याचे नाव आहे वेअरेबल टेक्नोलॉजी. म्हणजे अंगावर परिधान करण्याचे तंत्रज्ञान.येणारा काळ हा या वेअरेबल टेक्नोलॉजीचा असेल, असे म्हणताम्हणता अनेकांच्या अंगावर हे ना ते दिसूही लागले आहे. 
स्मार्टवॉच पासून सुरु झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. करमणूक ,खेळ ,आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात वेअरेबल टेक्नोलॉजीचा शिरकाव झालेला आहे. त्यापैकी आज आपण आरोग्याशी संबंधित विअरेबल टेक्नोलॉजी विषयी जाणून घेऊ.

वेअरेबल टेक्नोलॉजी 

वेअरेबल टेक्नोलॉजी हे नावच बरेच काही सांगून जाते. म्हणजे अशी टेक्नोलॉजी ज्या पासून तयार झालेली डिव्हाइसेस तुम्ही अंगावर परिधान करू शकता . जसे की स्मार्टवॉच,फिटनेस ट्रॅकर ,
स्पोर्ट्स वॉचेस ,हेड माउंटेड डिसप्ले,स्मार्ट क्लोथिंग ,स्मार्ट ज्वेलरी आणि या सर्वांच्या पुढे म्हणजे इम्प्लांटेबल्स अर्थात तुमच्या शरीरात सर्जरी करून बसविलेली डिव्हाइस.म्हणजे हे विेअरेबल डिव्हाइसेस तुम्ही सहज सोबत घेऊन वावरू शकता. त्याचे अजिबात ओझे तुम्हाला जाणवणार नाही . एवढेच काय तर तुम्ही सोबत विेअरेबल डिव्हाइसेस घेऊन फिरता आहात हे समोरच्याला कळणार देखील नाही.

वेअरेबल टेक्नोलॉजी आणि हेल्थकेअर

दिवसेंदिवस आरोग्याविषयी जागरूकता प्रचंड वाढली आहे. विशेषत: तरु णांना आरोग्याविषयी फार जागरूकता आलेली आहे. म्हणजे दररोज जिम ला जाणे ,फिरायला जाणे. आज अमुक इतका व्यायाम केला, इतके किलोमीटर फिरलो आदी चर्चा सहज ऐकायला मिळतात. सुरु वातीला स्मार्टफोन वर काही ऐप्स आले जे तुम्हाला तुम्ही किती अंतर फिरले तुमच्या अंदाजे किती कॅलरी बर्न झाल्या असतील अशी माहिती द्यायचे. आजही यााची तरु णांमध्ये प्रचंड क्र ेझ आहे. मात्र वेअरेबल टेक्नोलॉजी मध्ये जे डिव्हाइसेस आहे हे कितीतरी अधिक आणि अचूक माहिती तुम्हाला देतात.
जसे कि तुम्ही किती अंतर चाललात ,किती कॅलरी बर्न झाल्या, हार्टरेट काय होता...याहूनही अधिक माहिती तुम्हाला देतात.त्याचप्रमाणे तुम्ही किती झोपलात याचा पूर्ण ट्रॅक ठेवतात तसेच तुम्हाला वेळोवेळी अलर्ट देखील करतात.

कसे काम करतात ?

वेअरेबल टेक्नोलॉजी डिव्हाइसेस तुमची हालचाल टिपण्या साठी जीपीएस तंत्रज्ञान वापरतात तसेच ब्लु टूथ वापरून तुमच्या स्मार्टफोन ला कनेक्ट होतात. तसेच या वेअरेबल डिव्हाइसेस मध्ये गरजेनुसार वेगवेगळे सेन्सर लावलेले असतात जे सतत तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आणि इंटरनेट तसेच ब्लु टूथ च्या माध्यमातून सर्व डेटा तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप ला पुरवतात . हे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप एका विशिष्ट प्रोग्राम च्या मदतीने तुमच्या सर्व डेटा चे रेकॉर्ड ठेवते तसेच त्याचे ऐनालिसिस देखील करतात . त्यामुळे तुम्ही दिवसभरात किती चाललात ,किती कॅलरी बर्न केली, त्यावेळी तुमचा हार्टरेट किती होता या सर्व बाबी तुम्हाला कळतात. हे झाले निरोगी आणि व्यायाम करणार्या माणसासाठी पण असे काही विेअरेबल टेक्नोलॉजी डिव्हाइसेस आहे जे काही विशिष्ट आजारावर देखील लक्ष ठेऊन त्याचा डेटा कलेक्ट करून रेकॉर्ड ठेवतात ज्याचा वापर डॉक्टर पेशंट ची हिस्ट्री ठेवण्यासाठी करतात आणि त्यानुसार पेशंटवर उपचार करतात. 
 
anil.bhapkar@lokmat.com
 

Web Title: Wearables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.