‘वजन’दार

By admin | Published: August 7, 2014 09:39 PM2014-08-07T21:39:25+5:302014-08-07T21:39:25+5:30

ओंकार मूळचा चिपळूणचा. तिसरीत असतानाच तो मामाकडे कुरुंदवाडला रहायला आला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत ड्रायव्हर होते. ओंकार दहावीत असतानाच त्यांचं निधन झालं

'Weight' | ‘वजन’दार

‘वजन’दार

Next
>ओंकार मूळचा चिपळूणचा. तिसरीत असतानाच तो मामाकडे कुरुंदवाडला रहायला आला. त्याचे वडील एका खासगी कंपनीत ड्रायव्हर होते. ओंकार दहावीत असतानाच त्यांचं निधन झालं. ओंकारचा मामेभाऊ प्रशांत ओतारी राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंगचा खेळाडू. त्याचा खेळ पाहून ओंकारनंही हा खेळ शिकायचं ठरविलं. पंकजनं ३00 किलो वजन उचलून आदर्श निर्माण केला होता. त्याचे मामा ज्ञानेश्‍वर आणि विश्‍वास ओतारी यांनी त्याला शिकण्याला प्रोत्साहन तर दिलंच पण त्याच्या कुटुंबाचा सांभाळही केला. ओंकारची आई साड्यांना पिको फॉल करून चरितार्थासाठी पैसे कमवत होती, परिस्थिती हलाखीची पण तिनं ओंकारला खेळण्यापासून अडवलं नाही. दुर्दैवानं २0१२ मध्ये तिचंही कॅन्सरनं निधन झालं. त्या काळात ओंकार अगदी एकेकटा झाला, त्याची मनस्थिती ठीक नव्हतीच पण त्याला त्याची बायको नम्रता प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय माळी, विश्‍वनाथ माळी, रवींद्र चव्हाण, सासरे नंदकुमार दळवी यांनी खूप उभारी दिली. सध्या ओंकार पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत मानधन तत्त्वावर प्रशिक्षक म्हणून काम करतो. पश्‍चिम रेल्वेत मुंबईत तो नोकरीही करतोय.
ओंकारला जंटलमन वेटलिफ्टर म्हणत सगळे व्यायामशाळेत.
२00८ च्या कझाकिस्थानात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं प्रथम भाग घेतला. २00९ च्या मलेशियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये त्यानं रौप्यपदक मिळविलं होतं. २00९ मध्येच बांगला देशात झालेल्या साउथ एशियन फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलं. २0१0 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं भाग घेतला होता. दिल्लीत २0१0 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं ६२ किलो वजनीगटात भाग घेतला. त्यावेळी २६५ किलो वजन उचललं. बॉडीवेटमुळे त्याचं कांस्यपदक हुकलं. 
यंदाही गेले चार महिने ओंकारला  गुडघेदुखीचा त्रास होत होताच. परंतु तरीही त्यानं केवळ मनोबलाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलंच.
जिद्द आणि मेहनत एवढय़ा दोनच गोष्टींच्या जीवावर ओंकार इथवर पोहचला.

Web Title: 'Weight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.