वी आर नॉट ‘बबलूज्’ ओके?
By admin | Published: January 2, 2015 03:22 PM2015-01-02T15:22:47+5:302015-01-02T16:13:55+5:30
तमाम मोठय़ा माणसांच्या दुनियेला सध्या ज्या प्रश्नानं ग्रासलंय, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजीचा मुलांच्या आयुष्यातला अतिवापर.
Next
फोन-गॅजेट्सचं एवढं वेड का?
तमाम मोठय़ा माणसांच्या दुनियेला सध्या ज्या प्रश्नानं ग्रासलंय, त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजीचा मुलांच्या आयुष्यातला अतिवापर.
म्हणून मग मुलांनाच विचारलं की, एवढं पागलपण खरंच आहे का?
‘काय पण सिली प्रश्न आहे’ असा लूकच देतात मुलं हा प्रश्न ऐकून ! एक मुलगी तर ताडकन म्हणाली, ‘आपण कपडे वापरतो ते अनावश्यक आहेत असं म्हणोल का कुणी तसंच आणि तितकंच हे महत्त्वाचं आहे.’
किती मुलामुलींना विचारलं की, तुम्ही फोन वापरता, व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरता, आईबाबांशी भांडून फोन घेतलाय का? ते तुमचा मोबाइल चेक करतात का?
प्रश्न अनेक होते, पण अनेक उत्तरांचा सारांश एकावाक्याचा.
गॅजेट्स ही या मुलांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, कम्प्युटर, व्हिडीओ गेम्स, मोबाइल गेम्स हे त्यांना आपल्या जगण्याचाच भाग वाटतं. आपण खातो-पितो-जेवतो-झोपतो, तशी ही गॅजेट्स वापरतो असंच त्यांचं मत.
मात्र तरीही हे इतकं सोपं नाही कारण एक सेकंद फोन बंद किंवा फोनपासून दूर ही कल्पनाही या वयाची अनेक मुलं सहनच करू शकत नाहीत. त्यात मित्रमैत्रिणींकडे जो हॅण्डसेट त्यापेक्षा जास्त ‘स्मार्ट’ फोन किंवा टॅब आपल्याकडे असावा अशी एक अदृश्य स्पर्धा असते. आईवडिलांनी तसा स्मार्टफोन घेऊन द्यायला नकार दिला तर आपण घर डोक्यावर घेतो, भांडतो हे अनेकांनी खाजगीत कबूल केलं.
त्यात घरच्यांनी फोन तपासणं, तुझा फोन काढून घेईल असं म्हणणं हा सर्वोच्च अपमान वाटतो. आणि त्यातून या मुलांना भयंकर अस्वस्थता येते, एक कम्पलसिव्ह अॅडिक्शन होत जातं, कधीकधी ते त्यांनाही कण्ट्रोल करता येत नाही.
त्यातलीच ही काही महत्वाची मतं.
.देन यु आर नॉट एक्ङिास्ट!
> इफ यू आर नॉट युजिंग स्मार्टफोन देन यू आर नॉट एक्ङिास्ट! भारीतला, टॉप मॉडेल, ब्रॅण्डेडच फोन हवा. नाहीतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधे एकदम ‘बबलू’ ठरता !
> फोन लागतो कशाला म्हणजे, आमचं म्हणून काही पर्सनल शेअरिंग असतं की!
> गॅजेट्स कशी वापरायची हे कळतं आम्हाला, त्यात कुणी नाक खुपसायला लागलं की मूड जातो.