तुमच्या डोक्यातल्या किड्यांचं काय?
By admin | Published: May 9, 2014 12:17 PM2014-05-09T12:17:33+5:302014-05-09T13:32:56+5:30
वाचलात सगळा अंक? एकदम भन्नाट वाटलं? लगेच फोन हातात घेऊन आम्हाला फोन करणार असाल आणि विचारणार असाल की कुठं भेटतील ही माणसं?
Next
>वाचलात सगळा अंक? एकदम भन्नाट वाटलं? लगेच फोन हातात घेऊन आम्हाला फोन करणार असाल आणि विचारणार असाल की कुठं भेटतील ही माणसं? कुठं मिळतं प्रशिक्षण? मला काम मिळेल का तिथं.? - तर त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणार्या या काही गोष्टी आधी प्लीज वाचाल?
१) ही सगळी नवीन कामं आहेत, त्यांचे धडाधड कोर्सेस अजून काही फार सुरू झालेले नाहीत.
२) मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या गरजा जोखून या तरुण मुलामुलींनी स्वत: ही कामं सुरू करण्याचं डेअरिंग दाखवलंय. आपलं डोकं चालवून संधी उघड्या डोळ्यांनी पाहत, त्यातून कामं शोधली आहेत.
३) हाताला काम देतील अशा गरजा तुम्हीही अवतीभोवती पहाव्यात, थोडं डोकं वापरून अशी कामं आपणच सुरू करावीत आणि ट्रेण्ड सेटर बनावं हे चांगलं. तसं बनता येतं, नवीन कामं करणार्या माणसांची गरज निर्माण होते आहे याचंच उदाहरण तर या अंकात जागोजागी वाचतोय.
४) आपण उत्साही, शोधक नजरेनं पाहिलं तर अशी बरीच कामं अवतीभोवती दिसतील, कमीत कमी पैशात ती सुरू करता येतील.
५) त्यासाठी जिद्द, कल्पनाशक्ती, लोकांशी गोड बोलण्याची कला, प्रचंड मेहनतीची तयारी मात्र हवीच.
६) रेडिमेड वाटा, उत्तरं, करिअर कुणालाच यशाच्या शिखरावर घेऊन जात नाही, नव्या वाटांवर चालण्याची धमक हवी हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्यही लक्षात ठेवलेलं बरं.
७) तसं झालंच, तर नवीन काम कदाचित तुमच्याही हाताला गवसेल.