बहिणींचं म्हणणं काय?

By admin | Published: August 27, 2015 06:27 PM2015-08-27T18:27:20+5:302015-08-27T18:27:20+5:30

बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना

What are the sisters? | बहिणींचं म्हणणं काय?

बहिणींचं म्हणणं काय?

Next

 बहिणींचं म्हणणं काय?

नका ना करू आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.बहिणींचं म्हणणं काय?
नका ना करू 
आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.

Web Title: What are the sisters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.